रविवार, जुलै २८, २०२४

नायगावच्या SBI,BOI शाखा व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांच्या खात्याचे अनधिकृत होल्ड लवकरात लवकर काढावे अन्यथा...नायगाव युवक काँग्रेसचा इशारा

 

नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याचे लवकरात लवकर होल्ड काढावे-नायगाव युवक काँग्रेसची मागणी

संपादक संजय चिखले

नायगाव बा,दि.२७/०७/२०२४: नायगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात स्टेट बँक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया या बँकेत खाते असून,या खात्याला शाखा व्यवस्थापकांनी कुठलीही पुर्व सुचना न देता, मोबाईल वर बॅंकेकडून साधा टेक्स्ट मेसेज पाठवण्याची तसदी न घेता होल्ड केल्यामुळे खातेधारक शेतकऱ्यांना विविध कामाकरीता आर्थीक व्यवहार करण्यासाठी अडचणी येत आहेत तसेच शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई जमा रक्कम, पी.एम.किसान योजनेचा खात्यात जमा झालेला हप्ता, दुष्काळी अनुदानाची रक्कम उचलता येत नसल्याने तालुक्यातील पिक कर्ज घेतलेल्या जवळपास सर्वच शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान होत आहे.


सदरील शेकऱ्यांचे शासनाकडून बँक खात्यास होल्ड करण्यात यावे असे कोणते शासन निर्णय असल्यास त्याचा अहवाल शेतकऱ्यांना लेखी स्वरुपात द्यावा.


तसेच शेतकऱ्याचे लकवरात लवकर बँक खात्याचे होल्ड काढण्यात यावे.जेणे करून शेतकऱ्यांना बँकेत व्यवहार करण्यास गैरसोय होणार नाही. अन्यथा बैंक खात्यांचे होल्ड नकाढल्यास गांधी गिरी पध्दतीने यूवक कॉग्रेस तालुका नायगांवच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन सदरील बँकेस कुलूप लावून बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा विनंती वजा इशारा नायगाव युवक काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.