गुरुवार, जानेवारी १३, २०२२

उरण : हनुमान कोळीवाडा पुनर्वसनासाठी जेएनपीटीचा चालढकलपणा ! ग्रामस्थ पुन्हा एकदा जेएनपीटीत समुद्रमार्गे येणारी जहाजे रोखण्याच्या पवित्र्यात

 

  • पोलीसांनी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

उरण,दि 13 जानेवारी 2021 : गावाला लागलेल्या नैसर्गिक वाळवी, अपुरे पुनर्वसन, नागरी सुविधांचा बनवा, नोकरी व्यवसायासाठी होणारी पायपीट या सर्व न्यायहक्काच्या गोष्टी मिळविण्यासाठी गेली ३७ वर्ष हनुमान कोळीवाडयाच्या ग्रामस्थांनी केलेल्या संघर्षाला अखेर यश मिळून रायगड जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नाने जे.एन. पी. टी. कडून अखेर पुनाकरिता २५६ कुटुंबासाठी ७१० गुंठे आवश्यक असणारी जमीन ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात आली होती. दि. २८ नोव्हें २०२१ रोजी सर्व ग्रामस्थांनी या जागेवर श्रीफळ वाहून फटाक्यांच्या आतषबाजीत गगनभेदी घोषणा देत नामफलकाचे अनावरण केले होते. मात्र ध्यानीमनी नसताना शासनाचे अधिकारी आणि जेएनपीटीचे अधिका संगनमताने ग्रामस्थांचा छळ व धोका देण्याचे कटकारस्थान करून जागा देण्यासाठी टाळाटाळ केली असल्याने ग्रामस्थांच्या गगनभेदी घोषणा हवेतच विरल्याने हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून ग्रामस्थ पुन्हा एकदा आपल्या परिवारासह चॅनेल बंद आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

जेएनपीटी बंदरच्या निर्मितीसाठी हनुमान कोळीवाडा हे गाव ३० वर्षांपूर्वी विस्थापित करण्यात आले होते. त्यानंतर या गावाला वळविणे ग्रासले आणि प्रकल्पग्रस्तानी उभारलेली घरे पत्याच्या घरा सारखी कोसळली त्यावेळेपासून ग्रामस्थ हे पुनर्वसनाच्या जागेचा शोध घेत होते. हजारो बैठका, आंदोलने, मोचें, उपोषणे करूनही गेली ३७ वर्षे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना नव्हता ग्रामस्थांच्या एकज्युटीमुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांना फुंडे गावाजवळ कस्टम कॉलनीच्या मागे दि. २४ नोव्हेंबर २९ रोजी राहुल मुंडके उपविभागीय अधिकारी पनवेल, भाऊसाहेब अंधारे तहसीलदार उरण, जेएनपीटीचे अधिकारी राजेश फडके, न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे वपोनी श्री भटे व श्री. मोहिते यांच्या उपस्थितीत शासनाने व जे. एन. पी. टी. ने शासकीय मापदंडानुसार ८६ शेतकरी व१७० बिगर शेतकरी कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी ७१० गुंठे जागा दिली होती.


त्यानंतर मावळचे खा. श्रीरंग अप्पा बारणे यानी केंद्रीय नौका नयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांना प्रत्यक्ष भेटून ८६ शेतकरी व १७o बिगर शेतकरी अशा २५६ कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी शासनाच्या माप दंडानुसार नागरी सुविधा आणि हनुमान कोळीवाड्यांतील सर्व घरांच्या किमती देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्या बाबत १४ डिसेंबर २१ रोजीलेखी पत्र देऊन आणि ३० डिसेंबर २९ रोजी जेएनपीटीच्या कार्यालयात जेएनपीटीचे अध्यक्ष संजय शेठी, उपाध्यक्ष उत्मेष वाघ, उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते यांच्या समवेत बैठक घेऊन वरील अटीशती मंजूर करून घेतल्या होत्या नंतर आराखडा तयार करण्यासाठी आठ दिवसांची मुदत प्रशासनाने घेतली होती. त्यानुसार ५ जानेवारी २२ रोजीपुनर्वसन कमेटीने उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते यांना विचारणा केली असता जेएनपीटीने आराखडा पाठविला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आतषबाजीत व घोषणांच्या जल्लोषात सदरच्या जागेवर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी नामफलकाचे अनावरण केले होते. मात्र ग्रामस्थांचा हा आनंद क्षणभंगुर ठरला. अखेर ग्रामस्थांनी शासन बजेएनपीटी सगनमताने ग्रामस्थांना धोका देत असल्याने सबंधित अधिकाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने भा.द.वी. कलम १६६ १६७ १८८४२०, ४६८, ४७१ आणि सीआरपीसी कलम १९७ नुसार संबधीतांवर कारवाई करण्याची मागणी हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाच्या वतीने केली आहे. 
यात पोलीस प्रशासनाने कुचराई केल्यास या घटनेच्या निषेधार्थ आमच्या हक्काच्या घारापुरी ते मोरा परिसरांतील मासे मारी जमिनीत मासेमारी करून बोटी नागरून बोटीत ग्रामस्थ बायका-पोरांसह वास्तव्यास राहणार असल्याचा एकमुखी निर्णय घेऊन एक अनोखे आंदोलन सुरु करणार असल्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार पालक मंत्री अदिताताई तटकरे, रायगडचे खासदार सुनील तटकरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, पोलीस महासंचालक संजय पांडे, कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय शेठी, नवीमुंबई पोलीस आयुक्त विपीन कुमार सिंग पोलीस उपयुक्त पनवेल शिवाजीराव पाटील, उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. विस्थापित कुटुंबाच्या हातून कोणताही विचित्र प्रकार घडला अथवा कुणी आत्महत्या केली तर त्याची जबाबदारी संबंधीत अधिकाऱ्यांवर राहील असा इशाराही ग्रामस्थांनी लेखी निवेदनाच्या शेवटी दिलेला आहे.


जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मुळे विस्थापित झालेल्या हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन करण्यात प्रशासनाकडून चालढकलपणा करण्यात येत आहे. त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ पुन्हा एकदा जेएनपीटीचा समुद्र मार्ग अडविण्याच्या तयारीत आहेत. हनुमान कोळीवाडा गाव पुनर्वसनाबाबत ३० डिसेंबर २०२१ ला जेएनपीटीचे चेअरमन संजय सेठी, व्हा. चेअरमन उन्मेष वाघ आणि उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सुषमा सातपुते यांच्यात बैठक झाली होती. त्या बैठकीत कस्टम वसाहतीजवळील जेएनपीटीच्या विकसित जमिनीत शासनाच्या मापदंडानुसार ७१० गुंठ्यात २५६ भूखंड व नागरी सुविधा देण्याचे मान्य केले होते.

त्यासाठी आराखडा बनविण्याकरिता प्रशासनाने ग्रामस्थाकडून आठ दिवसांची मुदत मागीतली होती. मात्र आठ दिवसानंतर देखिल उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन यांच्याकडे जेएनपीटीने आराखडा पाठविला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ आता जेएनपीटी प्रशासनाविरोधात परत एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.ग्रामस्थ पून्हा जेएनपीटीत समुद्र मार्गे येणारी जहाने रोखून धरणार आहेत. जेएनपीटीमध्ये ज्या समुद्री चॅनलमधून जहाजे येतात त्या चॅनलमध्ये आपल्या होड्या आडव्या टाकून हे अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.


यापूर्वी या ग्रामस्थांनी २६ फेब्रुवारीला अशा प्रकारचे चॅनल बंद आंदोलन करून जेएनपीटीचासमुद्रातील मार्ग रोखून धरला होता. त्यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्या मध्यस्थीमुळे तसेच रायगड जिल्हा कलेक्टरांनी आणि पोलिसांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे ते आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र वारंवार आश्वासन देवून ग्रामस्थांना शांत केले जाते. १९८४ ला जेएनपीटी बसविण्यात आली त्यावेळेला सर्व २५६ मच्छिमार कुटुंब येथून विस्थापित करण्यात आली तेव्ही पासून हे लोक हनुमान कोळीवाडा गावात बोरी पाखाडी येथे विस्थापित करण्यात आली. मात्र ज्या ठिकाणी त्याचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न झाला ती जागा दुषित असल्याने संपूर्ण गावातील घरे वाळवीने पोखरली गेली. शिवाय हे पुनर्वसन शासनाच्या निकषाप्रमाणे करण्यात आले नव्हते. त्यामुळे हे लोक अनेक समस्यांचा सामना करत आहेत. माजी नौवहन मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे वर्तमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अनेक बैठकी होऊन देखील, लोक न्यायापासून वंचित आहेत.


त्यामुळे शासन व जेएनपीटी प्रशासन ग्रामस्थांविरोधात फसवणूक व कटकारस्थान रचत असून पोलीसांनी या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी नाही तर येत्या आठ दिवसांत पुन्हा एकदा घारापुरी ते मोरा या जेएनपीटीच्या चॅनलमध्ये मासेमारी बोटी नांगरून मुलाबाळांसमवेत शांततेत आंदोलन करण्याचा इशारा हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी दिला आहे.

Tags: #हनुमान कोळीवाडा पुनर्वसन#उरण#जेएनपीटी

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकरचे सुडबुद्धीचे राजकारण, माझ्याविरुद्धची कारवाई एकाधिकारशाही प्रमाणे-तालुकाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे

 


  • पवार साहेब व पक्षश्रेष्ठींवर माझा पुर्ण विश्वास; सुडबुद्धीच्या विचाराचे राजकारण हा आमचा पिंड नाही

नायगाव,दि 12 जानेवारी 2021 : मी पक्षासाठी पूर्णवेळ काम करणारा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. माझा शरदचंद्रजी पवार साहेब व पक्षश्रेष्ठींवर पूर्ण विश्वास आहे. सूडबुद्धीच्या विचाराचे राजकारण करणे आमचा कौटुंबिक पिंड नाही मी जिल्हाध्यक्ष पद मागितले हाचं माझा गुन्हा....! यासाठीचं जिल्हाध्यक्षाचा माझ्या विरोधात चाललेला अट्टाहास आहे...असे मत नरसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत भास्कर पाटील भिलवंडे यांनी मांडले.

राष्ट्रवादीत अनेकजण आले आणि गेले पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक सेक्युलर पार्टी म्हणून राष्ट्रवादी चे सर्वे सर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या विचाराशी जुळवून 2009 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम पक्ष श्रेष्ठी कडून कसलीही अपेक्षा नं करता निरपेक्ष काम करणारा कार्यकर्ता आहे.माझ्याबाबतीत पक्षाने काय आणि कसा निर्णय घेतला यांचा खुलासा माझ्या पर्यंत अजून पोहचला नाही. पण बातमीतील काही अपमानास्पद शब्द व वाक्य यामुळे मी पूर्णपणे दुखावलो आहे. यांचा खुलासा मी काही दिवसात पक्षश्रेष्ठींकडे देणारचं आहे. पण;माझ्यासारख्या पक्षाच्या पडतीच्या काळात पक्षाची ताकत स्थानिक स्वराज्य संस्थेत कायम ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांवर माझी कसलीचं भूमिका समजुन नं घेता टोकाचा निर्णय लादणे कुंठे तरी चुकीचे वाटते. मी तालुकाध्यक्ष असताना देखिल तालुक्यातील निर्णय जिल्हास्तरावरून घेऊन माझी प्रतिमा मलिन करण्याचे कट कारस्थान करून माझ्या दुःखाच्या काळात मदती ऐवजी अडचणीत टाकण्याचा उद्योग कशासाठी? मला कळत नाही? जिल्हाध्यक्ष भोसीकर व वसंत सुगावे  यांच्याकडे वारंवार नायगाव नगरपंचयात निवडणूक लढवण्यासाठी वडिलांचा तेरावा झाल्या दुसऱ्या दिवशी बैठक लावून प्रयत्न केला. 

शिवाय नायगाव शहराध्यक्ष म्हणून संजय चव्हाण यांची निवड करण्यासाठी जिल्हाध्यक्ष भोसीकर साहेब यांना पाठपुरावा केला. हे सोडून चार जिल्हापरिषद व एक नगरपालिका असणाऱ्या 89 गावाच्या तालुक्यात तीन सरचिटणीस एका नरसी गटातून परस्पर जिल्हाध्यक्षानी दिलें यामुळे आवश्यक तेथे दुर्लक्ष नको तेथे अधिकचा भरणा मला येथे अनंत अडचणी ही निर्माण झाल्या. युवक तालुकाध्यक्ष निवडीतील गोंधळ, नायगाव नगरपंचायत निवडणूकितील नकारात्मक भूमिका यामुळे जिल्हाध्यक्षांनी मला एकट्याला कारणीभूत ठरवून कार्यवाही करणे संयुक्तिक वाटत नाही ते ही चुकीचे बिनबुडाचे किळसवाणे आरोप अपेक्षीत नाहीत आम्ही ही पक्ष वाढीसाठी जीव ओतून येथे काम केले आहे त्याची जाणीव तालुक्यातील कार्यकर्ते व जनतेला आहे. सूडबुद्धीच्या विचाराचे राजकारण हा आमचा पिंड नाही.  यामुळेच माझा पक्ष श्रेष्ठी व पक्षाचे सर्वे सर्वा आ.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर पूर्ण विश्वास आहे तेचं माझे बाबतीत योग्य निर्णय घेतील असा विचार नरसी येथील आयोजित पत्रकार परिषदेत तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर पाटील भिलवंडे यांनी व्यंक्त केले.

लाच प्रकरण : गायगोठ्याची वर्क ऑर्डर देण्यासाठी पंचायत समितीच्या लाचखोर कनिष्ठ लिपिकाने लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या

 


*==* *प्रेसनोट*. *==*

*यशस्वी सापळा*

▶️ *युनिट -* जळगाव.

▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-54, रा.शेवगे पिंप्री ता.जामनेर जि.जळगाव.

▶️ *आलोसे-*  

वसंत पंडीत बारी,वय-५३, व्यवसाय-नोकरी, कनिष्ठ लिपीक पंचायत समिती कार्यालय,जामनेर.

रा.शेंदुर्णी ता.जामनेर जि.जळगाव.                                                                                             

▶️ *लाचेची मागणी-* 3,000/-रू.

▶️ *लाच स्विकारली-* 3,000/-रू.

▶️ *हस्तगत रक्कम-* 3,000/-रू.

▶️ *लाचेची मागणी -* दि.11/01/2022 

▶️ *लाच स्विकारली-* दि.13/01/2022

▶️ *लाचेचे कारण -*.  

तक्रारदार यांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरण मंजुर झालेले असुन सदर शेडच्या बांधणीचे काम सुरु करण्यासाठी लागणारी वर्क ऑर्डर मिळवुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष ३,०००/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम स्वतः आरोपी यांनी आज दि.१३/०१/२०२२ रोजी पंचायत समिती कार्यालय,जामनेर येथे आलोसे स्वतः बसत असलेल्या कक्षात पंचासमक्ष स्वीकारली म्हणुन गुन्हा.                  

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

▶ *मार्गदर्शक-* 

*1)* मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. 

*3)* मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

▶ *पर्यवेक्षण अधिकारी-* 

श्री.शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.

▶ *तपास अधिकारी-* 

एन.एन.जाधव , पोलीस निरीक्षक,अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.

▶ *सापळा व मदत पथक-*  

DYSP. श्री.शशिकांत एस. पाटील, PI.श्री.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ.   

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* 

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साो.

जिल्हा परीषद कार्यालय,जळगाव.                                                    

--------------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव 

*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*

*@ मोबा.क्रं. 8766412529*

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

==================