मंगळवार, जानेवारी ११, २०२२

नायगाव गटशिक्षणाधिकारी पदी विराजमान अशोक पवळे एक उपक्रमशील शिक्षक-डि.टी जाधव सर

 


 नायगाव,दि ११ जानेवारी : एक स्वच्छ प्रतिमा असलेले व्यक्तिमत्व, निस्वार्थी, निगर्वी, निधर्मी, निष्कलंक, निपुण, निर्णयक्षम, असलेले अनेक मोठ मोठ्या पदावर काम केली. परंतु कोणालाही मी उच्चपदस्थ आहे असे वाटू न देता सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे अन्याय व भ्रष्टाचार या विरुद्ध आवाज उठवणारे क्रियाशील पवळे सर ज्या पदावर काम करतात त्या पदाला न्याय देण्याचे काम आज पर्यंत त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत केले आहे. गटशिक्षणाधिकारी हे पद काटेरी मुकुट असून या पदावर काम करत असताना हे पद जिकीरीचे आहे सगळीकडे बजबजपुरी ने उच्छाद मांडला आहे. यावर मात करून यशस्वी वाटचाल करण्याची जबाबदारी सरांनी स्वीकारली आहे. पवळे सरांनी 28 नोव्हेंबर 1985 रोजी ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात मंगनाळी तालुका कंधार येथून पदार्पण केले आहे. शाळा हेच मंदिर विद्यार्थी हे माझी देवता येईल आकार या चिमुकल्या मनाला, अध्यापनात जीव ही ओतावा असा दृष्टिकोन ठेवून मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी अनेक उपक्रम सरांनी सेवा कालावधीत राबविले यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन यांना सन 2009- 10 ला जिल्हास्तरीय गुरू गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यांनी 27 जुलै 2015 ला गडगा केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला या काळात त्यांनी केंद्रामध्ये अनेक उपक्रम राबवून गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले सरांनी विविध राष्ट्रीय कार्यक्रमात साक्षरता अभियान पल्स पोलिओ वृक्षारोपण कुटुंबकल्याण जनगणना व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान यामध्ये काम केले. तालुकास्तरीय स्वच्छता दूत म्हणून काम करून अनेक गावे निर्मलग्राम करण्यासाठी उल्लेखनीय अशी कामगिरी बजावली आहे. सरांकडे उत्तम संघटन कुशलता असून कमी वयातच भास्कर पतपेढीचे चेअरमन पद भूषविण्याचा मान मिळाला. सध्या ते सहकारी पतपेढी नांदेड चे पाच वर्षे संचालक म्हणून चांगले काम केले आहे. आता याच पतसंस्थेचे चेअरमन म्हणून धुरा सांभाळत आहेत. 8 ऑगस्ट 2019 ला शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाली या काळात चांगले काम केले या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद नांदेड ने पंचायत समिती नायगांव च्या गटशिक्षणाधिकारी पदाची धुरा सोपवली पुढील कालावधीत पंचायत समितीला वैभव प्राप्त करून देण्यासाठी ते सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होतील यात तिळमात्र शंका नाही यासोबतच शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे गुरूगौरव पुरस्कार, दुय्यम सेवा पुस्तिका या सर्व प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्यांच्या काळात नक्कीच प्रयत्न करतील एवढी माफक अपेक्षा व्यक्त करून पंचायत समिती नायगावच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार मिळाल्याबद्दल सर्व संघटना व शिक्षक बांधवांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा

जाधव डी टी स शि मरवाळी, तालुकाध्यक्ष शिक्षक परिषद नायगांव

आबाबाबा ! ११ लाख लाचेची मागणी ? साडेपाच लाख स्विकारताना महालाचखोर उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधानसह लाचखोर सरपंचाच्या एसीबीने मुसक्या आवळल्या

 


कोल्हापूर,दि ०९ जानेवारी : क्रशर विरोधातील तक्रार अर्ज निकालात काढण्यासाठी सरपंचाकरवी साडेपाच लाखांची लाच घेताना राधानगरी प्रांताधिकारी प्रसेनजित बबनराव प्रधान (रा. न्यू पॅलेसनजीक, कोल्हापूर. मूळ गाव- बीड) याच्यासह फराळे गावचा सरपंच संदीप जयवंत डवर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली.

अकरा लाखाची लाचेची मागणी होती. कोल्हापुरात कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कागल-राधानगरी प्रांत कार्यालयात रविवारी सुटी दिवशी दुपारी केली. राधानगरी प्रांताधिकारी व फराळे (ता. राधानगरी) गावचे सरपंच लाचप्रकरणी गजाआड झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली.

राधानगरी तालुक्यातील फराळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत लिंगाचीवाडी येथे तक्रारदाराचे सिलीका वाळू वाशींग प्लॉंट क्रशर आहे. क्रशरच्या वाहतुकीमुळे रस्ते खराब होत आहेत, घरांना तडे गेलेत असे कारण पुढे करुन राधानगरी प्रात प्रसेनजीत प्रधान व फराळे गावचे सरपंच संदीप डवर यांनी प्लॉटला भेट दिली. तो प्लॉंट बंद करावा अशी नोटीस सरपंच डवर यांनी बजावली. सरपंचांच्या नोटिसी संदर्भातून राधानगरी प्रांताधिकारी प्रधान यांनी संबंधित प्लॉटमालकास आणखी दोन नोटिसा बजावल्या.

त्यानंतर तक्रारदार प्लॉटमालकाने प्रांताधिकारी प्रधान यांची भेट घेतली. प्रांतानी त्यांना सरपंचाची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार सरपंचांनी भेटीत, नोटीस रद्द करण्यासाठी प्रातांना १० लाख व आपल्याला दरमहा एक लाख रुपयेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या पथकाने रविवारी सकाळी पडताळणी केली.

त्यात तक्रारदार प्राताधिकारी प्रधान यांना त्यांच्या न्यू पॅलेस परिसरातील वींड गेट अपार्टमेंटमधील निवासस्थानी भेटले, सरपंचांचा निरोप सांगितला, तशी प्रांतानी त्यास संमती दिली. त्यानंतर दुपारी दोन वाजता मुख्य प्रशासकिय इमारतीच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. सरपंचाच्या मोटारीत तक्रारदाराकडून लाचेचे ५ लाख रुपये प्राताधिकारीसाठी व स्वता:साठी ५० हजाराची रक्कम घेताना सरपंच संदीप डवर यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर प्राताधिकारी प्रसेनजीत प्रधान यांना त्यांच्या राधानगरी प्रात कार्यालयात अटक केली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, पोलीस उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. नितीन कुंभार, हे. कॉ. शरद पोरे, अजय चव्हाण, मयूर देसाई, रुपेश माने, अमर भोसले, नवनाथ कदम, विकास माने, सुरज अपराध यांनी सापळा रचून केली.

सुट्टीच्या दिवशी साहेब ‘लाचे’साठी कार्यालयात

रविवार साप्ताहिक सुट्टी असतानाही प्राताधिकारी प्रधान हा दिवसभर मुख्य प्रशासकिय इमारतीतील राधानगरी कागल-राधानगरी प्रात कार्यालयात बसून होते. कार्यालयाच्या आवारात हे सरपंचाकरवी लाच घेण्याचे षडयंत्र सुरु असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ते उधळले.

सरपंचांची अलीशन मोटार जप्त

सरपंच हे पद सेवेसाठी असते, पण त्याचा फराळे गावच्या सरपंचाचा रुबाब हा मोठाच होता. कारवाई झाल्यानंतर त्यांची अलीशान पांढरी मोटार पथकाने जप्त केली.

जिल्ह्यात दुसरा सरपंच गजाआड

लाचेतील दहा लाख प्रांतांना व दर महा एक लाख रुपये लाच सरपंचांना देण्याचे ठरले होते. ते पितळ या कारवाईमुळे उघडे पडले. २०१८ शाहुवाडी तालुक्यातील डोणोली येथील सरपंचालाही लाच प्रकरणी अटक केली होती. त्यामुळे लाचप्रकरणी सरपंच गजाआड होण्याची ही दुसरी घटना होय.

बीड येथे बदली झाल्याची चर्चा

लाचखोर प्रसेनजीत प्रधान यांनी काही दिवस प्रशिक्षणार्थी म्हणून करवीर प्रात पदावरही काम केले. त्यानंतर गेले सहा महिने ते राधानगरी प्रात पदाचा कारभार पहात होते, त्यांची भंडारा येथे बदली झाल्याची चर्चा सुरु असतानाच त्यांच्यावर ही लाचेची कारवाई झाली. त्यामुळे बदलीवेळी जाता-जाता हात मारुन जाण्याच्या त्याचा प्रयत्न असल्याचे उघड झाले

नियुक्ती : नायगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचे सूत्र ए.जी. पवळे यांनी स्वीकारले

 


नायगाव,दि ११ जानेवारी २०२१ : नायगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी पदाचा पदभार शिक्षण विस्तार अधिकारी ए.जी.पवळे यांच्या कडे सुदपूर्द करण्यात आला आसून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

पूर्वीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमती लता कोठेकर, शि.वि.अ.नायगाव यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नायगांव ता. नायगांव या पदाचा अतिरिक्त पदभार होता.तो कमी करून संवितरणासह श्रीमती लता कौठेकर यांच्याकडे असलेला गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नायगांव या पदाचा पदभार कमी करून पवळे अशोक गंगाधर शि.वि.अ. यांच्याकडे अहरण व संवितरणासह सोपविण्यात आला आहे.


दि.१० जानेवारी रोजी पवळे यांनी पदभार स्वीकारला असून त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे---‌कलावंत ,मृदंगाचे बोल जाणणारे, पेटीवादक, गाणे ,भजन ,गवळणी, पद यांचा अभ्यास असणारे आणि विद्यार्थ्यांप्रती प्रचंड तळमळ,कळवळा असणारे एकमेव शिक्षक अशोक पवळे सरांचे नाव प्रत्येकाच्या ओठावर आजही गावा गावांमध्ये आणि परिसरामध्ये आदराने घेतले जाते. 
अनेक गावचे लाडके गुरुजी म्हणून आजही पवळे सरांना नागरिक ओळखातात. साक्षरता अभियान जोरात चालू होतं,तेंव्हा गावागावातून पवळे गुरुजी रात्री-अपरात्री कलापथक घेऊन फिरायचे.. त्याकाळी गावात राहणारा एकमेव शिक्षक म्हणून सरांकडे लोक कुतुहलाने पहायचे.. परिसरात हरिनाम सप्ताह, शिवनाम सप्ताह ,लक्ष्मण शक्ती, प्रवचन , कीर्तन ,भारुड, दिंडी , श्रावण महिन्यात लावलेली पोथी सर आवर्जून हजर राहायचे! पवळे सर म्हणजे एक नितीमूल्यांचा संस्कारदूतच ! आज त्याच्या अंगी असलेल्या नीतिमूल्यांचा विजय होऊन ते एक तालुक्याच्या महत्त्वाच्या गटशिक्षणाधिकारी या पदावर विराजमान झाले आहेत .त्यांच्या कार्यातील अनुभवाचा नकीच फायदा होणार आहे.

पवळे यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे व पत्रकार रामकृष्ण मोरे यांनी स्वागत केले आहे या वेळी नरसी केंद्राचे मु.अ.कपिलेश्वर नलबलवार ,बारहाळे सर उपस्थित होते.