नियुक्ती : नायगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचे सूत्र ए.जी. पवळे यांनी स्वीकारले
नायगाव,दि ११ जानेवारी २०२१ : नायगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी पदाचा पदभार शिक्षण विस्तार अधिकारी ए.जी.पवळे यांच्या कडे सुदपूर्द करण्यात आला आसून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
पूर्वीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमती लता कोठेकर, शि.वि.अ.नायगाव यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नायगांव ता. नायगांव या पदाचा अतिरिक्त पदभार होता.तो कमी करून संवितरणासह श्रीमती लता कौठेकर यांच्याकडे असलेला गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नायगांव या पदाचा पदभार कमी करून पवळे अशोक गंगाधर शि.वि.अ. यांच्याकडे अहरण व संवितरणासह सोपविण्यात आला आहे.
दि.१० जानेवारी रोजी पवळे यांनी पदभार स्वीकारला असून त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे---कलावंत ,मृदंगाचे बोल जाणणारे, पेटीवादक, गाणे ,भजन ,गवळणी, पद यांचा अभ्यास असणारे आणि विद्यार्थ्यांप्रती प्रचंड तळमळ,कळवळा असणारे एकमेव शिक्षक अशोक पवळे सरांचे नाव प्रत्येकाच्या ओठावर आजही गावा गावांमध्ये आणि परिसरामध्ये आदराने घेतले जाते.
पवळे यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे व पत्रकार रामकृष्ण मोरे यांनी स्वागत केले आहे या वेळी नरसी केंद्राचे मु.अ.कपिलेश्वर नलबलवार ,बारहाळे सर उपस्थित होते.
टिप्पण्या