राजकारणातील राजकीय सोंगाड्याांनी ग्रामीण भागात यात्रेसह कुस्त्यावर बंदी घातली असल्यामुळे प्रशासनावर नामांकित पैलवान चक्रधर शिंदे यांची घोर नाराजी
By : Admin
रुई प्रतिनिधी माधव पवार
नायगाव,दि.14 डिसेंबर 2021 : महाराष्ट्र राज्यातल्या राजकीय नेते मंडळीना मोठ्या प्रमाणात राजकारणाचा छंद झडला असल्यामुळे राजकारणी फक्त कोणत्याही निवडणूका असो लोकसभेच्या असो विधानसभेच्या असो अथवा नगरपंचायतीच्या निवडणूका असो त्याच बरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, असो आमदार असो यांनी निवडणुकीकडे जास्तीचे लक्ष घालून निवडणुकीचा रणसंग्राम घडवून आणतात परंतु अतिशय महत्वाचा खेळ म्हणजे यात्रेतील कुस्त्याचा फडासाठी व यात्रेसाठी परवानगी नाकारून सदरच्या यात्रेवर बंदी घातली असल्यामुळे राजकारणातील राजकीय सोंगाड्यासह प्रशासनावर बरबड्याचे नामांकित पैलवान चक्रधर शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात गावच्या राजकारणात सार्वजनिक उत्सोव म्हणजे गावातील अनेक वर्षा पासून चालत आलेली परंपरा ही आज घडीला नष्ट होत असताना दिसून येत असले तरी समस्त गावकऱ्यानी एकत्र येऊन जत्रा असो कुस्त्या व महापुरुषाच्या जयंत्या असो सार्वजनिक पद्धतीने असे उत्सोव साजरे करण्या ऐवजी गावाच्या राजकारणात जत्रे बोरोबर कुत्याचा फड व रात्रीला वाघ्या मुरळीचा कार्यक्रम खलास होण्याच्या मार्गावर असल्यामुळे सदरचे सार्वजनिक उत्सोव जिवंत ठेवण्यासाठी व पैलवानाच्या कुस्त्याची दंगल पाहण्यासाठी गावकऱ्यानी एकत्र येण्याची गरज ग्रामीण भागात भासत असली तरी प्रशसनावर बरबडा येथील नामांकित पैलवान चक्रधर शिंदे यांनी शासनावर घोर नाराजी व्यक्त केली आहे
राज्यातल्या राजकीय राज्यकर्त्याना कोणत्याही निवडणुका आल्या की उमेदवाराची जुळवा जुळव केल्या शिवाय एकापेक्षा एक चढ सभा घेतात, भाषणे ठोकून राजकीय पुढारी रात्रदिवस झोप नसतात परंतु राज्यकर्त्यांनी फक्त यात्रेवर, कुस्त्यावर बंदी घालून मोकळे होतात तालुक्यातील खेड्यापाड्यात गेल्या दोन वर्षा पासून अशीच बोबं होताना दिसून येत असून प्रशासनाने कोरोना महामारीच्या नावाखाली सार्वजनिक कार्यक्रम व उत्सवाला गेल्या दोन ते पावणे दोन वर्षा पासून परवानगी नाकारली तर ग्रामीण भागातील सध्याची परिस्थिती पाहिली तर गावाच्या राजकारणात कुस्त्या बरोबर यात्रा खलास होताना दिसून येत असून सरपंच व उपसरपंचाचा राजकारणातील खेळ शिगेला निघत असल्यामुळे कुठे तरी राजकारण थांबवून गावच्या कुत्या बरोबर जत्रा वाघ्या मुरळीचे संस्कृतीक कार्यक्रम पार पाडले तर योग्यच परंतु गावची दिशा वळविने हे अत्यंत महत्वाचे आहे
ग्रामीण भागातील यात्रा जवळ आल्या की महिला मंडळासह छोटया छोटया मुलांना अतिशय आनंद वाटत होता व भव्य यात्रेतील कुस्त्याचा जंगी सामना असला की मोठं मोठे पैलवान कुस्त्याच्या फडात लंगोट घालून दंड मारत होते परंतु कुस्त्या व जत्रा वरचेवर हादपार होत असल्यामुळे तब्बल वर्षभर दूध,खारीख, खोबर, तूप, बदाम स्वतःच्या पैशाने खावून गोरगरीब कुटूंबातील छोटे मोठे कुस्तीगीर कुस्तीचा फड रंगाविण्यासाठी जसे शाळेतील विध्यार्थी परीक्षेसाठी अभ्यास करून परीक्षा केंद्रावर परीक्षा देतात तशाच पद्धतीने पैलवान सुद्धा वर्ष पक्कड करुन कुस्त्याच्या जंगी फडात जय हनुमाना सारखे दंड मारून उतरत होते परंतु गावची दिशाच बदल्यामुळे पैलवानाची हिरामोड होताना दिसून येत आहे
महाराष्ट्र शासनाने कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक कार्यक्रमाला व यात्रा म्हटल्या की गावकऱ्यानी भरविलेली कुस्त्याची दंगल गावकऱ्याच्या स्वाभिमानाची बाब म्हणजे जत्रा व कुस्त्या आणि वाघ्या मुरळीचे संस्कृती कार्यक्रम हे गावाच्या करमणूकीचे साधन ग्रामीण भागातील जत्रा व कुस्त्या पाहण्यासाठी अनेक जिल्ह्यासह तालुक्यातुन नागरिक व पैलवान येत होते आणि गावच्या राजकारणात अनेक गावाचं यात्रे बरोबर कुस्त्या ही खलास होताना दिसून येत असल्या तरी महिला वर्गासाठी यात्रेत दुकाने थाटत असून यात बांगडया, खेळण्या, फुगेवाले, पुंग्यावाले, आदी साहित्य घेऊन येऊन व्यापारी वर्ग दुकाने थाटलेले दिसून आले असले तरी जत्रा खलास होत असल्यामुळे पैलवानावर प्रशासना कडून अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया देत
बरबडा येथील रहिवासी असलेले नामांकित पैलवान यांनी नाराजी व्यक्त केली आहेे