गुरुवार, नोव्हेंबर १८, २०२१

(Gram Panchayat By Election) : राज्यातील 34 जिल्ह्यातील 4554 ग्रामंपचांतीमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7130 जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

 


मुंबई 18 नोव्हेंबर 2021 : राज्यातील 34 जिल्ह्यातील 4554 ग्रामंपचांतीमध्ये पोटनिवडणुकीचा (Gram Panchayat By Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या ग्रामपंचायतीच्या एकूण 7130 रिक्त जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांसी पत्रव्यवहार केला आहे. इच्छूकांना 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

 राज्यातील ग्रामपंचायतीत विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7130 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुका पारंपरिक पद्धतीने पार पाडल्या जाव्यात, असे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही सूचना करण्यात आल्या आहेत.

नागरिकाच्या मागास प्रवर्गाच्या रिक्त जागा भरण्यापुर्वी त्या ग्रामपंचायतीचे एकूण आरक्षण 50 टक्क्याच्या मर्यादेत ठेवणे. नागरिकाच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण 27 टक्यापर्यत ठेवणे. आरक्षण मर्यादेची अंमलबजावणी करताना ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्य संख्येची गणणा विचारात घ्यावी, आदी सुचनाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, निवडणूक कार्यक्रमानुसार, नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेल्या रिक्त जागांचे सर्व साधारण जागत बदल करण्यासाठी अंतिम प्रभाग रचनेसाठी सुधारणा अधिसूचना 22 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे -

उमेदवारी अर्ज मागवण्याचा व सादर करण्याची मुदत - 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर ( वेळ 11 ते दु.3 वाजेपर्यंत )

अर्ज छाननी - 7 डिसेंबर (सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यत)

अर्ज मागे घेण्याची तारीख - 9 डिसेंबर (दु. 3 वाजेपर्यंत )

निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे - 9 डिसेंबर (दु. 3वाजेपर्यत)

आवश्यक असल्यास मतदानाची तारीख - 21 डिसेंबर (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 )

मतमोजणी - 22 डिसेंबर


Tags : ग्रामपंचायत पोटनिवडणुक


टिप : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत कार्यक्रम जाहीर

दिनांक 18/11/2021 गुरुवार

जिल्हे-34

ग्रा.पं-4554×7 (सरासरी) =31878 एकूण जागा.

ग्रा.पं.रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम-4554× ?=7130

लोकांमध्ये आखरी टप्प्यातील मुदत संपलेल्या कोरोनामुळे निवडणूका घ्यायचे शिल्लक राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याचा लोकांना गैरसमज झाला आहे.लोकसंख्येनुसार ग्रा.प.सदस्य संख्या 7,9,11,17 असते.सरासरी 7 जागा धरल्या तर ग्रा.पं-4554×7 (सरासरी सदस्य) =31878 एकूण जागा होतात.मग वरील प्रमाणे 4554 ग्रामपंचायतीच्या 7130 जा कशा होतात ? म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी ग्रा.प मधील रिक्त झालेल्या 4554 ग्रामपंचायतींची 7130 जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

नांदेड प्राथमिक शिक्षण विभागाचं मोठं दुर्दैव ! २०१७ मध्ये ४ लाख लाच घेताना एसीबीने मुसक्या आवळलेल्या महालाचखोर नांदेड जि.प. ची तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी सविता बिरगे पुन्हा पुर्व पदावर रुजू😡

  • मार्च २०१७ मध्ये एक महिना आधी लाचखोर समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकरवर एसीबीने ट्रॅप केला होता.

नांदेड, 18 नोव्हेंबर 2021 :- दोन शिक्षीकांचे थकीत वेतन काढण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रभारी शिक्षणाधिकारी सविता सिदगोंडा बिरगे यांना ४ लाख रुपयाची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या पथकाने ७ एप्रिल २०१७ रोजी रंगेहात पकडले होते त्या अगोदर काही दिवसापूर्वीच म्हणजे १० मार्च २०१७ ला लाचखोर समाज कल्याण अधिकारी खमितकर याला अटक झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच हा दुसरा एक लाचखोर अधिकारी या सापळ्यात अडकल्याने नांदेड जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली होती.

नांदेड जि.प.शिक्षण विभागांतर्गत सेवा कार्यरत असलेल्या दोन शिक्षीकांची सेवा सन २००६ ते २००८ या कार्यकाळात काही कारणाने खंडीत होती.म्हणून या कार्यकाळातील वेतन व भत्ता अनुक्रमे ६,२२,०००/- व ६,४९,०००/- असे एकूण १२,७१,०००/-रुपये येणे शिल्लक होते. ते अदा करण्यासाठी या दोन महिला शिक्षीकांनी जि.प.माध्यमिक शिक्षण विभाग नांदेड यांच्याकडे रितसर मागणी अर्ज केला होता. हे थकीत वेतन व भत्त्यापोटीची दोघींची एकूण रक्कम काढण्यासाठी नांदेड जि.प.शिक्षण (माध्यमिक) विभागाच्या लोकसेविका प्रभारी शिक्षणाधिकारी ( वर्ग १ ) सविता सिदगोंडा बिरगे हिने दोघींनी प्रत्येकी २ लाख असे ४ लाख रुपये द्यावेत अशी मागणी केली होती.ही रक्कम देण्याचे या दोन शिक्षीकांनी मान्य केले.यामुळे ती खंडीत वेतन व भत्त्याची रक्कम काढण्यात आली.

याबाबद दि. ३० मार्च २०१७ रोजी दोघींनी लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभाग नांदेड यांच्याकडे तक्रार केली.त्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड च्या अधिकारी व कर्मचा-यांनी २ एप्रिल २०१७ रोजी पंचासमक्ष लाच मागीतल्याची खातरजमा केली.यात लाच मागीतल्याची बाब निदर्शनास आली.त्यानुसार ७ एप्रिल २०१७ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड चे पोलिस अधिक्षक संजय लाठकर,उप अधिक्षक संजय कुलकर्णी,उत्तम टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.दयानंद सरवदे,महिला पो.नि.संगीता पाटील,जमादार नामदेव सोनकांबळे,पो.ना.सय्यद साजीद,पो.ना.शेख चाँद,महिला पो.ना.रत्नपारखे,पो.काॅ.विलास राठोड,ताहेर फहाद खान,चालक शेख मुजीब यांच्या पथकाने दि.७ एप्रिल २०१७ रोजी सकाळी जि.प.शिक्षण विभाग कार्यालयात सापळा रचून प्रभारी माध्यमिक शिक्षण अधिकारी सविता सिदगोंडा बिरगे हिला ४ लाख रुपयाची लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले होते.तीला अटक करून वजिराबाद पोलीस ठाण्यात या लाचखोर महिला अधिका-या विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायदा व भ्रष्टाचार अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सविता बिरगे हिच्या साई आशिष,घर नं.७६, छत्रपतीनगर, पुर्णारोड नांदेड येथील निवासस्थानाची ला.लु.प्र.विभाग नांदेड ने झाडा झडती घेतली होती.या कारवाईने जि.प.नांदेड मधील काही भ्रष्ट अधिकारी,कर्मचा-यांचे धाबे दणाणून गेले होते.एसीबीची एवढी मोठी कारवाई होऊन चारही वर्षे झाली नाहीत तर नांदेड जिल्हा परिषदेच्या तत्कालीन लाचखोर प्रभारी माध्यमिक महिला शिक्षण अधिका-याला विभागात किंचीत बदल करून प्राथमिक शिक्षण विभागाची जबाबदारी देऊन पुर्व पदावर बसवल्यामुळे पुर्वीप्रमाणेच शिक्षणाचे तीन तेरा वाजल्याशिवाय आणि वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तितकेच खरे आहे.लाचखोरांना पुर्व पदावर नियुक्ती देताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना मनाची नाही तरी जनाची लाज कशी वाटेना हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडल्याशिवाय राहत नाही.कदाचित लोकांना याचा विसरही पडला असेल.

Tags : जि.प.नांदेड प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे