नायगाव : कोविड -१९ तिसऱ्या संभावें लाटेचा विचार करून गेल्या वर्षीच्या नियमाप्रमाणेच याही वर्षीचा गणेश उत्सव म्हणजेच दिनांक १० सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या गणेश उत्सवासाठी मागील वर्षीचेच नियम कायम करण्यात आले असून गणेश मूर्ती स्थापना व विसर्जन करताना कसल्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात येऊन नये मिरवणुकांवर प्रशासनाने कोरोनाच्या संकटामुळे बंदी घातली गणेश उत्सव व बैलपोळा हा सण साध्यापनाने साजरा करावा असे मत अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी मांडले
या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ.सिद्धेश्वर धुमाळ व पो.नि.अभिषेक शिंदे यांनी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थितांना शासनाच्या नियमावली प्रमाणेच उत्सव साजरे करा असे बोलतांना व्यक्त केले.तरुण मंडळींमध्ये वर्षभर वाट पाहून मोठ्या जल्लोषात साजरा होणारा गणेश उत्सवावर व वर्षभर शेतक-यांच्या खांद्याला खांदा लावून शेतात राहणा-या बैलाचा आनंदाचा सण म्हणजे बैलपोळा या सणावर कोरोनाचे संकट आले आहे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
ही साखळी तोडण्यासाढी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा व्यापक प्रसार होवू नये, यासाठी खबरदारी चा उपाय म्हणून सण उत्सवावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. असे ही मोरे यांनी सांगितले
दिनांक १० सप्टेंबर पासून उत्सव सुरु होत आहेत त्यानुषंगाने गणेश उत्सव मंडळाने मिरवणूका काढू नये असे आवाहन नायगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी केले. तसेच अगदी साध्या पद्धतीने गणेश उत्सव हा सन साजरा करून समाजात आदर्श निर्माण करावा,अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ही ते म्हणाले,तर शासकीय ग्रामीण रुग्णालय नायगाव च्या वतीने गणेश मंडळाच्या सर्वच सदस्य यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे असे वैदयकिय अधिकारी कांबळे यांनी आवाहन केले व गणेश मंडळानी सॅनीटायजर, मास्क ,तापमापक मशीन वापरुन समाजउपयोगी उपक्रम राबवून गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांनी केले.
यावेळी शांतता कमिटीच्या बैठकीस जिल्हा अतिरिक्तपोलीस अधीक्षक निलेश मोरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ.सिद्धेश्वर धुमाळ , आ. राजेश पवार , कल्याण ,प्रा डॉ.जीवन चव्हाण ,देविदास पाटील बोमनाळे , पञकार तथा जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पांडे , मराठी पत्रकार संघाचे नूतन तालुका अध्यक्ष नागेश पाटील कल्याण , एस. एम मुदखेडकर , माधव मामा कोकुरले , माधव पाटील चव्हाण ,शेख अरिफ ,तालुका कार्यध्यक्ष माधव धडेकर , पत्रकार तथा तंटामुक्ती अध्यक्ष माधव बैलकवाड , शहर अध्यक्ष विश्वांभर वन्ने , केरबा रावते ,विरेंद्र डोंगरे , सुधाकर भद्रे , प्रा. गडमवार , मनोहर तेलंग, गोविंद नरसीकर, गंगाधर गंगासागरे, प्रल्हाद भंडारे ,नागोराव भोसले ,अंकुशकुमार देगावकर ,सरपंच प्रतिनिधी साहेबराव कांबळे , नायगाव शहरासह तालुक्यातील गणेश मंडळाच्या प्रतिनिधींची व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
चौकट =
पांडे यांच्या मागणीवरून मांजरम पोलीस चौकीला तात्काळ तीन कर्मचारी नियुक्त
शांतता समितीच्या बैठकीत पुण्यनगरीचे पत्रकार बाळासाहेब पांडे यांनी असा प्रश्न उपस्थित केला होता कि मौजे मांजरम येथे पोलीस चौकीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन बरेच वर्ष उलटले तरी त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना निवासी राहण्याचा अभाव असल्याचे सांगितल्याने अति.पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी लगेच त्या मागणीची अंमलबजावणी करून त्या पोलीस चौकी मध्ये तीन पोलीस कर्मचारी नियुक्त केले व मुकामी राहण्याचे सांगितले त्यामुळे बाळासाहेब पांडे यांनी त्यांचे आभार मानले.
मराठी पत्रकार संघाचे ता. अध्यक्ष नागेश कल्याण , कार्यध्यक्ष = माधव धडेकर , प्रसिद्धी प्रमुख = संजय चिखले मरवाळीकर

