गुरुवार, सप्टेंबर ०२, २०२१

पंचायतराज समितीने साधला लोकप्रतिनिधी, पदाधिका-यांशी संवाद

 


नांदेड : पंचायतराज समितीचे अध्यक्ष आ.संजय रायमुलकर यांनी जिल्हा परिषद पदाधिका-यांची चर्चा करण्यासाठी दि.२ रोजी सकाळी ११ वाजता बैठक बोलविली होती. शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीत खासदार,आमदार व जि.प. पदाधिका-यांनी विविध मागण्यांवर चर्चा केली.मात्र समितीच्या या पहिल्याच बैठकीत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे काहिसे नियोजन बिघडल्याचे दिसून येताच समिती सदस्यांनी अधिका-यांना चांगलेच सुनावले.

पंचायतराज समिती दि.२ ते ४ सप्टेंबर दरम्यान तीन दिवस नांदेड दोै-यावर आली आहे.या दौ-याची जिल्हा परिषदेने जय्यत तयारी केली आहे.नियोजीत दौ-यानूसार पहिल्या दिवशी दि.२ रोजी सकाळी १०. ३० च्या सुमारास सेनेचे खा.हेमंत पाटील, आ.बालाजी कल्याणकर,आ.शामसुंदर शिंदे,आ.राजेश पवार यांनी समितीच्या सदस्यांची चर्चा केली.यानंतर ११ वाजता जि.प. पदाधिका-यांशी समितीचे अध्यक्ष आ.संजय रायमुलकर , आ. अमर राजूरकर व इतर सदस्यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या बैठकीत संवाद साधला.

जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,उपाध्यक्षा सतपलवार,सभापती अ‍ॅड.रामराव नाईक, संजय बेळगे,बाळासाहेब रावणगावकर यांच्यासह इतर सदस्यांनी मागण्यांचे निवेदन देत विविध विभागातील अडचणीवर चर्चा केली. दरम्यान पंचायतराज समितीच्या सर्व बैठका इनकॅमेरा घेण्याचे निश्चित झाले असताना विश्रामगृहातील बैठकीसाठी व्हिडीओग्राफर नसल्याचे समितीच्या निर्दशास आले.त्यावेळी बैठकीसाठी व्हिडीओग्राफर का बोलविण्यात आले नाही,यावर अधिका-यांना खडे बोल सुनावले.पहिल्याच बैठकीला काहिसे नियोतन बिघडल्याने जिल्हा परिषदेच्या अधिका-यांना समितीच्या रोषाला सामोरे जावे लागले.याची चर्चा ब-याच वेळ विश्रागृह परिसरात सुरू होती. या बैठकीनंतर समिती अध्यक्ष आ.संजय रायमुलकर यांनी जिल्हा परिषदेस भेट दिली.तेथुन पुढील बैठकीसाठी समिती नियोजन भवनाकडे रवाना झाले. यानंतर येथील दुसरी बैठक ५ वाजेपर्यंत सुरुच होती.

समितीसाठी शाही बडदास्त

पंचायत राज समितीच्या तीन दिवसीय दौ-यास गुरूवार दि.२ सप्टेंबरपासुन सुरूवात झाली असून ४ सप्टेंबरपर्यंत हा दौरा राहणार आहे. या दौ-याच्या अनुषंगाने समितीची शाही बडदास्त ठेवण्याची व्यसस्था जिल्हा परिषदेने केली आहे.समितीला फिरण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त वाहनाचा ताफा दिमतीला देण्यात आला आहे.तर राहण्याची सोय शहरातील दोन अलिशान महागड्या हॉटेलात सोय करण्यात आली आहे.सोबतच जिल्हा परिषदेने व्यवस्था समिती,भोजन,वाहन,बैठक,कोविड व शासकीय असा विविध सात समित्यांची स्थापना करून २४ अधिकारी व कर्मचारी दिमतीला ठेवले आहेत.पंचायत समितीला मोठे अधिकार असल्यामुळे आपल्या झालेल्या चुका कशा दुर होतील.समिती पुढे कसे हजर व्हावे याचे धडेही अधिका-यांना देण्यात आले आहेत. समितीच्या दौ-याचा पहिला दिवस संपला तरी आज पुन्हा अधिका-यांना समितीस तोंड ध्यावे लागणार आहे.


उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांचा गडगा येथे भव्य सत्कार संपन्न

 


गडगा : स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने दिल्या जाणारा ग्रामीण विभागाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रा. डॉ.रामकृष्ण बदने यांना जाहीर करण्यात आल्याबद्दल गडगा नगरीचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पन्नासे यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. 

      यावेळी सत्कारमूर्ती म्हणून डॉ.रामकृष्ण बदने हे होते तर व्यासपीठावर डॉ.पंडित शिंदे,माजी सरपंच रामराव कोरे,शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजीराव पन्नासे,चेअरमन मोहनराव पा. जाधव,शेखलाल पटेल,विलास पाटील,अशोक कोरे, सादिक सय्यद, मा.पं.स. सदस्य शिवराज फुलारी, कोंडीबा कोरे,माजी सरपंच विठ्ठल भांगे, केरबा मनुरे यांसह आदी उपस्थीत होते.

     यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजी पन्नासे म्हणाले की विद्यापीठाच्या वतीने जीवनभर विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बदने सरांच्या रूपाने एका गुणवान व्यक्तीची पुरस्कारांसाठी निवड केल्याचे मनस्वी समाधान लाभले असून येणाऱ्या काळात उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो अशी इच्छा शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजीराव पन्नासे यांनी प्रा.डॉ. रामकृष्ण बदने यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

         बदने सर हे केवळ वर्गापुरतेच शिक्षक नसून ते लोकं शिक्षकाची भूमिकाही पार पाडतात व वाचन,लेखन,व्याख्यान,किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधनाचे मोठे कार्य केले आहे. त्यामुळेच असे सत्कार घडून येतात असे मत डॉ.पंडित शिंदे यांनी व्यक्त केले.

  सत्कारमूर्ती म्हणून प्रा.डॉ रामकृष्ण बदने म्हणाले की आपले प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे.नक्कीच यामुळे मला आणखीन जास्तीचे काम करण्याची प्रेरणा मिळणार आहे. ग्रामीण भागांमध्येही गुणवत्ता कमी नाही. त्यांच्यातील गुण हेरून त्यांना त्या दृष्टीने तयार केले तर ग्रामीण भागातील मुले मोठ्या पदावर जाऊ शकतात व ते भविष्यात कुठेही कमी पडत नाहीत याचा अनुभव मी स्वतः घेतला असून शिवाजीराव पन्नासे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज हिताचे अनेक उपक्रम राबवतात. समाजाप्रती तळमळ असणारा व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. त्यांनी आयोजित केलेला सत्कार माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे अशी भावना व्यक्त केले.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवाजी पन्नासे यांनी केले तर आभार अशोक कोरे यांनी मानले.

या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.