मंगळवार, जुलै १३, २०२१

गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकास मात्र शून्य इसाद ते खंडाळी रस्त्यांची दैनिय अवस्था.... अपघात होण्याची शक्यता


परभणी जिल्हा प्रतिनिधी/सुरेश सालमोटे

गंगाखेड,दि 13 जुलै 2021 : तालुक्यातील ग्रामीण भागातील परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ठप्प झाली आहे, त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे पण वास्तविक पाहता चित्र वेगळे दिसत आहे.गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण रस्तांची अक्षरशः चाळणी झाली आहे. मुख्य समस्या रस्ता संदर्भात निर्माण झालेल्या आहेत.

आता प्रकरण उघडकीस आले आहे. गंगाखेड तालुक्यातील इसाद ते खंडाळी व राणीसावरगांव रस्ता जागो जागी खड्डे पडले असून त्यात पावसामुळे पाणी साचल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक आहे पण साव् जनिक रस्ते विकास महामंडळ विभागाच्या गलथान कारभारामुळे लोकप्रतिनिधी यांच्या दुल् क्षामुळे रस्तांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे गंगाखेड पासुन इसाद गांव आहे त्याठिकाणी रस्तांची मोठी समस्या निर्माण झाली आहे.. दोन्ही बाजूंनी मोठमोठी खड्डे पडले असून त्यात रात्री बेरात्री वाहन धारकांना जीव धोक्यात घालून वाहने चालविताना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गंगाखेड ते राणीसावरगांंव रस्त्याची सुध्दा समस्या निर्माण झाली आहे. याचा गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना इसाद, खंडळी राणीसावरगांव रस्ता दरवर्षी लाखो रुपये खर्च करून सुध्दा समस्या सोडविण्यासाठी शासन कमी पडत असल्याने शासनाच्या गलथान बोगस कारभाराचा फटका आता या भागातील नागरिकांना बसला आहे 

ग्रामीण भागातील परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आता बंद झाली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे अशी भावना ग्रामीण भागात चच्रली जात आहे गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील परिसरात सुरक्षित प्रवास करताना दळवणाची साधने कधी मिळणार आहे.गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा विकास कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.




लाच प्रकरण : महा लाचखोर स्वप्नील माने सहायक प्रादेशिक परिवहन अधिका-याला लाचखोर खाजगी इसमा मार्फत 17,600 रुपयांची लाच स्वीकारल्याबद्दल एसीबीच्या पथकाने गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले



औरंगाबाद,दि 12 जुलै 2021 : यातील फिर्यादी यांचे मोटार वाहन प्रशिक्षण केंद्र असून त्यांचे ३० प्रशिक्षणार्थीचे पक्के वाहन चालक परवाना मंजूरीकरीता लोकसेवक यांनी रू.१७,६००/- इतक्या लाचेची मागणी करून यापूर्वी खाजगी इसमामार्फत रु. १०,०००/- इतक्या लाचेची रक्कम स्विकारून उर्वरीत रु. ७,६००/- रक्कम लोकसेवक यांचे सांगणेवरून खाजगी इसम यांनी फिर्यादीकडून स्विकारली म्हणून गुन्हा नोंद.

यातील फिर्यादी यांचे औरंगाबाद येथे शासन मान्य मोटार वाहन प्रशिक्षण केंद्र आहे. सदर प्रशिक्षण केंद्रातील ३० प्रशिक्षणार्थीचे पक्के वाहन चालक परवाना मंजूरीकरीता यातील आलोसे स्वप्निल माने यांनी फिर्यादी यांचेकडून रू. १७,६००/- इतक्या लाचेची मागणी करून यापुर्वी खाजगी इसमामार्फत रु. १०,०००/- इतक्या लाचेची रक्कम स्विकारून उर्वरीत रु. ७,६००/- रक्कमेसाठी फिर्यादीकडे तगादा लावला होता.

फिर्यादी यांना लोकसेवकास उर्वरीत लाचेची रक्कम रुपये ७,६००/- इतकी लाच देण्याची इच्छा नसल्याने फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी मुंबई येथे दि. ०९/०७/२०२१ रोजी लेखी तक्रार दिली.

फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन दि. १२/०७/२०२१ रोजी औरंगाबाद येथे पडताळणी केली असता, यातील आरोपीत लोकसेवक स्वप्निल विलास माने यांनी फिर्यादी यांचेकडे त्यांचे प्रशिक्षण केंद्रातील ३० प्रशिक्षणार्थीचे पक्के वाहन चालक परवाना मंजूरीकरीता यापूर्वी रू. १०,०००/- इतक्या लाचेची रक्कम स्विकारल्याचे मान्य करून उर्वरीत रु. ७.६००/- इतक्या लाचेच्या रक्कमेची मागणी करून सदरची रक्कम खाजगी इसम अभिजीत पवार यांचेकडे देण्यास सांगितले. त्यानंतर केलेल्या सापळा कारवाई दरम्यान खाजगी इसम यास फिर्यादीकडून रु. ७,६००/- इतक्या लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले म्हणून गुन्हा नोंद.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधीत काही माहिती असल्यास अगर लाब मागणान्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागाशी संपर्क साधावा.