शुक्रवार, जुलै ०२, २०२१

पत्रकार सुरक्षा समितीच्या गंगाखेड व पालम तालुका अध्यक्षांना पत्रकार सुरक्षा समितीचे ओळख पत्र देऊन गौरविण्यात आले



पालम :- पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज दि.०१/०७/२०२१ वार गुरुवार रोजी पालम येथे पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या आदेशानुसार परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडीचे ओळख पत्र गंगाखेड तालुका अध्यक्ष सुरेश सालमोटे तर पालम तालुका अध्यक्ष विलास वाघमारे यांना देण्यात आले. यावेळी लष्कर वार्ता चे संपादक शेषेराव सोपने, संपादक सम्यक वर्तमानकाळ तथा पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा सरचिटणीस विनोद कांबळे, शहराध्यक्ष अवधूत जाधव कार्यकारिणी सदस्य शशिकांत पौळ, पत्रकार शिवाजी शिंदे , पत्रकार चांद तांबोळी, पत्रकार कळंबे, यांच्या उपस्थितीत दोन तालुकाध्यक्षांना पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र समितीचे ओळख पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संपादक विनोद कांबळे यांनी पत्रकार व त्यांची सुरक्षा यावर सखोल मार्गदर्शन केले व तालुक्यातील सर्व पत्रकारांना आव्हान केले की सर्वांनी एकसंघ एक संघटक म्हणून कार्य करा व सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा , त्यानंतर संपादक सोपणे यांनी ही पत्रकारांचे हक्क अधिकार याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच नवनियुक्त अध्यक्ष यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहु अशी ग्वाही दिली. त्यानंतर सर्व उपस्थित पत्रकरांने आपले मनोगत व्यक्त केले व नवनियुक्त अध्यक्ष यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कांबळे तर आभार प्रसाद पोळ यांनी मानले,

 महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणारे हलल्याचे प्रमाण वाढत आहे तर गाव पातळीवर ही हे प्रमाण वाढत आहे यावर चिंता व्यक्त केली व आपण पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी मा.यशवंत पवार प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली सदेव प्रयत्न करनार असेही यावेळी जिल्हाध्यक्ष प्रसाद पौळ यांनी मनोगत व्यक्त केले.

सिंचन विहीर मस्टर प्रकरण : ग्रा.पं.माहुली चोर चा महा लाचखोर सरपंच 1,20,000 रुपये लाच मागणी करुन 5,000 यापुर्वी घेतल्याचे मान्य करुन 15,000 लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले



आदरणीय महोदय 

*यशस्वी सापळा कारवाई*

▶ *घटक* - अमरावती 

▶ *तक्रारदार* - पुरुष , वय 52 वर्ष रा.माहुली चोर जि.अमरावती.

▶ *ईआलोसे* -

1) श्री.रामभाऊ गणपतराव गाडेकर,वय 64 वर्ष, पद - सरपंच ग्रापंचायत माहुली चोर ता. नांदगांव खंडेश्वर,अमरावती.

▶ *लाच मागणी रक्कम* - तक्रारदार व त्यांचे तीन सहकारी यांना प्रत्येकी 30,000/-रुपये, याप्रमाणे एकूण 1,20,000/- रुपये, त्यापैकी पहिला हप्ता प्रत्येकी 5,000/- रुपये प्रमाणे 20,000/-, त्यापैकी 5000/- स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित 15,000/- लाचेची मागणी.

▶ *स्वीकारलेली लाच रक्कम* - 15,000/- रुपये.

▶ *पडताळणी* -

         दि. 30/06/2021.

➡ *सापळा कारवाई* - 

         दि.01/07/2021.

▶ **घटना स्थळ* -

        तक्रारदार यांचे सहकारी यांचे घर ग्राम माहुली चोर, ता. नांदगांव खंडेश्वर, अमरावती.

▶ *कारण* - तक्रारदार व त्यांचे तीन सहकारी यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजने मंजूर झालेले सिंचन विहीर चे मस्टर वर सही करून अनुदान मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत माहुली चोर चे सरपंच श्री. रामभाऊ गाडेकर हे तक्रारदार व त्यांचे तीन सहकारी यांना प्रत्येकी 30,000/-रुपये या प्रमाणे एकूण 1,20,000/- रुपये लाचेची मागणी करीत असून त्यापैकी पहिल्या मस्टर चे प्रत्येकी 5000/-रू, याप्रमाणे एकूण 20,000/-, रुपये त्यांनी तात्काळ देण्यास सांगितल्याने तक्रारदार यांनी सिंचन विहिरीचे पहिल्या मस्टर चे 5000/- त्यांना नाईलाजास्तव दिले असून उर्वरीत तीन सहकारीचे प्रत्येकी 5000/- रू.असे एकूण 15,000/- रू. ची मागणी करीत आहे अशी तक्रार दिल्यावरून वरून पडताळणी कारवाई दरम्यान सरपंच श्री.गाडेकर यांनी तक्रारदार व त्यांचे सहकारी यांना प्रत्येक सिंचन विहिरी च्या मस्टर वर सही करण्यासाठी प्रत्येकी 30,000/- रू. लागतीलच असे म्हणून तक्रारदार यांचेकडून यापूर्वी 5000/- रू. घेतल्याचे मान्य केले, व तक्रारदार यांचे तीन सहकारी यांचेकडून प्रत्येकी 5,000/- रुपये याप्रमाणे 15,000/- रू लाचेची मागणी करून सापळा कारवाई दरम्यान श्री.गाडेकर सरपंच यांनी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष 15,000/- लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे व पुढील कारवाई सुरू आहे.

 *मार्गदर्शन* -

▶मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती. 

श्री.अरुण सावंत, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

श्री. गजानन पडघन, पोलीस उप-अधीक्षक, ला.प्र.वी. अमरावती.

▶️ *सापळा व तपास अधिकारी* - श्री.अमोल कडू, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वी. अमरावती.

▶ *सापळा कारवाई पथक* -

श्री. अमोल कडू,पोलिस निरिक्षक,

 ना.पो.शी युवराज राठोड ,

पो.शी शेलेश कडू , राजेश कोचे

▶ ईआलोसे यांचे सक्षम अधिकारी* मा.विभागीय आयुक्त , अमरावती विभाग.अमरावती

-----------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन* *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.* 

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अमरावती पोलीस निरीक्षक अमोल कडू, मो. नं.+918087072919.

*@दुरध्वनी क्रं - 0721-2552355, 2553055

*@टोल फ्रि क्रं 1064*

----------------------------------------

लाच प्रकरण : महा लाचखोर पो.हे.कॉनिस्टेबल 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले



आदरणीय सर

▶️ सापळा कारवाई

▶️घटक - वाशिम 

▶️तक्रारदार - पुरूष, वय 30, वर्ष, रा. इंदिरा नगर बुलडाणा

▶️ आलोसे - शिवाजी कुंडलीक मोरे वय 54 वर्ष, व्यवसाय- पो. हे. काॅ. बुलडाणा शहर पोस्टे. जि. बुलडाणा

▶️लाच मागणी रक्कम- 5000/- रूपये तडजोडी अंती 3000/-₹

➡स्विकारली रक्कम- 3000/

▶️पडताळणी- दि.02/07/ 2021

▶️ कारवाई दि.-02/07/2021

▶️घटनास्थळ- जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर

▶️कारण - यातील तक्रारदाराचे भाच्यावर दाखल असलेल्या कलम 323,394भा.द.वि. चे गुन्ह्यात मदत करण्यासाठी 5000/-₹ ची पंचासमक्ष मागणी करून तडजोडीअंती 3000/- आजरोजी पंचासमक्ष लाच रक्कम स्विकारली. आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 (सुधारीत 2018) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

▶️आ.लो.से. यांचे सक्षम अधिकारी= मा. पोलिस अधीक्षक बुलडाणा

मार्गदर्शन -

▶️मा. श्री. विशाल गायकवाड सर, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती  

मा. श्री. अरूण सावंत अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ,▶️ तपास अधिकारी.

 एन. बी. बोराडे पोलिस निरीक्षक

▶️कारवाई पथक- एस. व्ही. शेळके पो. उप अधीक्षक, एन.बी. बोराडे ,पो. निरीक्षक ,पो.हवा. नितीन टवलारकर, पोलीस नाईक,अरविंद राठोड, योगेश खोटे व चापोशी शेख नावेद, सर्व ला.प्र.वि.वाशिम.

▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

----------------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन*

 *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी

यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.* 

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग

वाशिम 

*दुरध्वनी क्रं 07252 235933

*@टोल फ्रि क्रं 1064*

------------------------------