शुक्रवार, जून ११, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकारी (Apo) 2000 रुपये लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

 


*सापळा अहवाल* दि 11/06/2021

▶️ युनिट - औरंगाबाद.

▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 30 वर्ष

▶️ आरोपी लोकसेवक :-राहुल श्रीरंग पवार,वय-35 वर्ष, पद-सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, (कंत्राटी), पंचायत समिती, सोयगाव,जि.औरंगाबाद.

➡️लाच मागणी दिनांक - 11/06/2021

➡️लाच स्वीकृती दिनांक-11/06/2021

➡️लाचेची मागणी- 2,000/- रुपये 

➡️लाच स्वीकृती- 2,000/- रुपये 

▶️ कारण - यातील तक्रारदार यांचे वडिलांच्या नावे सन- 2019 -20 म.रो.ह.यो. अन्वये मंजूर असलेल्या विहिरीचे 1,29,622/- रुपये अनुदान देयक संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदविणे करिता तक्रारदार यांचेकडे 2,000/- रुपये लाचेची मागणी करून स्वतः 2,000-/ रुपये लाच स्वीकारली.



उत्तम वक्तृत्वाकरीता शब्दांची जाण आणि भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे!

 संवाद कौशल्य प्रशिक्षणाच्या 'ऑन लाईन' सांगता समारंभात कांतीलाल कडू यांचे प्रतिपादन


पनवेल: उत्तम वक्ता होण्यासाठी, संवाद साधताना मनातील न्यूनगंड दूर करणे, सभा गाजविण्यासाठी अथवा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी शब्दांची उत्तम जाण असणे आणि भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ संपादक कांतीलाल कडू यांनी केले.

पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्राने पुणे येथून राज्यभरातील प्रशिक्षणार्थीसाठी गेले दहा दिवस संवाद कौशल्य आणि उत्तम वक्ता यासंदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. त्याचा सांगता समारंभ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑन लाईन सेवा प्रणाली द्वारे झाला. त्यावेळी ते बोलत होते. शिबिरात पुणे, नाशिक, जळगाव, सांगली, सातारा, पनवेल येथील शिबिरार्थीनी सहभाग घेतला होता. त्यांना मार्गदर्शन आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दोन तास हा सोहळा रंगत गेला होता.

कडू म्हणाले की, भाषेचा अभ्यास करताना दर्जेदार साहित्याच्या वाचनाची आवड असायला हवी. भाषण. देताना धाडस तर अंगी असलेच पाहिजे परंतु हजरजबाबीपणाही असायला हवा. सभेत बोलताना शब्दांवर प्रेम तर हवेच परंतु बोलण्याची शैली अंगीकारताना श्वासावर नियंत्रण ठेवून आवाजातील लय सांभाळता आली पाहिजे. कुठे थांबायचे हे ज्याला कळते आणि कुठे तोल सावरायचा याचे स्मरण ठेवतो तो उत्तम वक्ता होऊ शकतो असे कडू यांनी सांगितले.

भाषेची नजाकत आणि गोडी जपता आली पाहिजे. सार्वजनिक सभा समारंभात भावनिक न होता विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून समयसूचकतेचे पालन करण्याची मनाची तयारी ठेवून व्यासपीठाचा आदर केला गेल्यास सभा जिंकणे अधिक सोपे जाते असा दावा त्यांनी केला. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक काही टिप्स दिल्या. काही नेत्यांची विशिष्ट शैलीतील भाषणांचे मुद्दे पटवून देताना सभाधीटपणा अंगी असण्याची आणि त्याकरिता वाचन, मनन, पठण करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

दाक्षिणात्य भाषांप्रमाणे मराठी भाषेला आजही अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नसल्याबद्दल कडू यांनी खंत व्यक्त केली. ज्ञानयोगी ज्ञानेश्वर माऊलींने मराठी भाषेचा गौरव केला आहे. ती जाण ठेवून तरी केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असे मत व्यक्त केले.

प्रशिक्षक प्राची भगत, माहेश सोनी, सागर ननावरे त्याशिवाय सुनिता तोमर, अमरसिंह राजपूत, तेजश्री विसपुते, दिप्ती शाह, युवराजसिंग राजपूत, सुभाष यादव, रुपाली ढोमसे आदी प्रमुखांचा सहभाग होता. पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष विजय सूर्यवंशी हे आयोजकांच्या भूमिकेत उपस्थित होते.

लाच प्रकरण : महा लाचखोर मंडळ अधिका-यासह लाचखोर तलाठी 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना नवी मुंबई एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून घेतले ताब्यात

 


*आदरणीय सर* 

*लाचेची यशस्वी सापळा कारवाई* 

▶️ *युनिट -* नवी मुंबई

▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय- 49 वर्षें,  

*▶️ आरोपी:- 1) साहेबराव विश्वासराव साबळे, वय 57 वर्षे, मंडळ अधीकारी, निजामपूर, ता. माणगाव,जि. रायगड ( वर्ग -3 )*

*2) सचिन विठ्ठलराव मिसाळ, वय 38 वर्ष, तलाठी सजा, विळे, ता. माणगाव, जि. रायगड (वर्ग -3)*

▶️ *लाचेची मागणी-* 50,000/- रुपये

▶️ *लाच स्विकारली-* 50,000/ रुपये 

▶️ *हस्तगत

 रक्कम-*50,000/ रूपये_*

▶️ *लाचेची पडताळणी-* ता 03/03/2021 व 05/03/2021

▶️ *लाच स्विकारली -* ता. 09/06/2021 रोजी 12:18 वा. 

▶️ *लाचेचे कारण -*. तक्रारदार यांनी भागीदारीत सन 2019 मध्ये मौजे नारायणगाव (साजे) ता.माणगाव, जि. रायगड हद्दीमधील सर्वे न.110, मध्ये सुमारे 04 एकर व 15 गुंठे जमीन खरेदी केलेली आहे. सदर जमिनीचा सातबारा तकारदार व त्यांचे भागीदार यांचे नाव नोंद होण्याकरिता लोकसेवक 1 ) साहेबराव साबळे व लोकसेवक 2) सचिन मिसाळ यांनी दोघांनीही लाचेची मागणी केली. आज दिनांक 09/06/2021 रोजी लोकसेवक 2) सचिन मिसाळ यांनी लाच रक्कम 50,000/- रुपये पंचासमक्ष स्वीकारले असता त्यांना एसीबी नवी मुंबई पथकाने रंगेहात पकडले आहे.                               

▶️ *सापळा अधिकारी* श्री. शिवराज बेंद्रे, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई

▶️ *सापळा पथक -* Asi/शिंदे

पोह/जाधव, पो/हवा पवार, पोना/ताहमहणेकर, पोना/पांचाळ, पोना/पवार, मपोना/विश्वासराव, पोशी/चव्हाण, पोशी/माने ,चा पो हवा गायकवाड

▶️ *मार्गदर्शन अधिकारी*- * मा.श्री. पंजाबराव उगले सो.पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो ठाणे परीक्षेत्र, ठाणे

▶️ *पर्यवेक्षण* *अधिकारी* -

  श्रीमती नीलिमा कुलकर्णी, पो. उप. अधीक्षक तथा अपर पोलीस अधीक्षक  

ठाणे परिक्षेत्र ठाणे

▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* -

लाच प्रकरण : लाचखोर तलाठ्यासह खाजगी इसमास 12 हजाराची लाच स्वीकारताना अहमदनगर युनिटच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

 


*यशस्वी सापळा अहवाल*

▶️ *युनिट -* अहमदनगर

▶️ *तक्रारदार-* पुरुष वय-32, ,रा.गुरव पिंपरी, ता कर्जत जि.अहमदनगर

▶️ **आरोपी* =1) चंद्रकांत गजाबा बनसोडे, वय 56 वर्ष, धंदा - नौकरी, तलाठी, वर्ग 3, सजा - गुरव पिंपरी, ता- कर्जत, जि- अहमदनगर.

रा- प्लॉट न. 11 , डॉ बाबासाहेब आंबेडकर हौसींग सोसायटी, नगर पाथर्डी रोड, भिंगार , ता- नगर, जिल्हा-अहमदनगर.

2) अमित सर्जेराव शिर्के, वय 40 वर्ष. खाजगी इसम, रा -चांदा खुर्द, ता- कर्जत जिल्हा- अहमदनगर. (अद्याप मिळुन आले नसलेने ताब्यात घेतले नाही )

▶️ *लाचेची मागणी-* 20000/₹ तडजोड अंती 12000/-₹

▶️ *लाच स्विकारली* 12000/₹

▶️ **हस्तगत रक्कम* -12000/-₹

▶️ *लाचेची मागणी -* ता.10/06/2021

▶️ *लाच स्विकारली* -ता. 10/06/2021

▶️ *लाचेचे कारण* -.तक्रारदार यांनी त्यांचे चुलत भावाचे गुरव पिंपरी गावातील शेतीचे वाटणी पत्र करुन त्या आधारे फेरफार नोंद कऱणेकरिता तलाठी सजा गुरव पिंपरी यांचे कडे अर्ज दिला होता. त्या आधारे फेरफार नोंद कऱणेकरिता तलाठी व त्यांचे मदतनीस (खाजगी इसम) यांनी तक्रारदार यांचे कडे 20,000/- ₹ ची मागणी केली . तक्रारदार यांनी ला.प्र वि कडे दिलेल्या तक्रारीवरून दि 10/06/2021 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी नं 1 व 2 यांनी पंचा समक्ष 20000/- ₹ लाचेची मागणी करुन तडजोड अंती 12000/- ₹ स्विकारण्याचे मान्य करुन, सदरची रक्कम आज दि 10/06/2021 रोजी आयोजित लाचेचा सापळा कारवाई दरम्यान आरोपी क्रमांक 1 यांनी तक्रारदार यांचे कडुन पंचा समक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र, नगर सोलापूर हायवे, मिरजगाव येथे स्विकारली असता आरोपी क्रमांक 1 यांना रंगेहाथ पकडले आहे.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

▶️ *सापळा अधिकारी* दिपक करांडे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर

 ▶️ *पर्यवेक्षण अधिकारी** हरिष खेडकर,पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि, अहमदनगर

▶सापळा पथक:- पोलीस निरीक्षक शाम पवरे, पो ना रमेश चौधरी, पो.अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, चालक पो हवा हरुन शेख. पोलीस अंमलदार राहुल सपट.

▶ **मार्गदर्शक* -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

▶मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.

▶️मा.विजय जाधव, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.

▶️ सक्षम अधिकारी - मा. जिल्हाधिकारी, अहमदनगर.