गुरुवार, जून १०, २०२१

महिला ग्रामसेवक आणि महिला सरपंच रस्त्यात भिडल्या,फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल ! भंडाऱ्यातील घटना

 


भंडारा,दि 6 जून :- जिल्ह्यातील सिलेगावमध्ये ग्राम पंचायतीच्या महिला सरपंच आणि महिला ग्रामसेवक यांच्यात फ्री स्टाईल मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



शिवस्वराज्य दिनाच्या दिवशी तुमसर तालुक्यातील सिलेगाव ग्राम पंचायत येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्यांनतर थोड्याच वेळात घरकुल ठरावाच्या प्रोसेंडिंग यावरून वाद झाला. महिला सरपंच संध्या पारधी यांनी ग्रामसेवक मंजुषा शहारे यांच्या जावळील प्रोसिडिंग घेऊन जात असताना ग्रामसेवक व इतर सदस्यांनी सरपंच यांना अडवण्याचा प्रयत्नही केला. तेवढ्यातच धक्काबुकी झाली आणि त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. महिला सरपंच, सदस्यांनी ग्रामसेवकांना मारहाण केली. ही फ्री स्टाईल मारहाण काही ग्रामस्थांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद करत व्हायरल केली आहे. या व्हिडीओत महिला सरपंच आणि ग्रामसेवक एकमेकींना मारहाण करताना दिसत आहे. या प्रकरणी सिहोरा पोलिसात एका दुसऱ्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याचा तपास करीत आहेत.

लाच प्रकरण : तहसिलच्या पुरवठा विभागातील लाचखोर अव्वल कारकूनाला खाजगी इसमा मार्फत 2500 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले


*आदरणीय सर*

*यशस्वी सापळा*

▶️ *युनिट -* अमरावती 

▶️ *तक्रारदार-* पुरुष ,वय- 35 वर्षे रा. निंभोरी (धोटे ), ता.अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती 

▶️ *आरोपी-* 

१) श्री. हरीश सुभाषराव काळे 

वय- 31 वर्षे,  

पद- अव्वल कारकून, (वर्ग ३) 

नेमणूक - अन्न पुरवठा विभाग, तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती   

२) अजय नरेंद्र मुळे,

वय - 38 वर्षे , खाजगी ईसम 

रा. अंजनगाव सुर्जी,जि. अमरावती.                                                                          

▶️ *लाचेची मागणी*- रुपये 3600

▶️ *लाच स्विकारली-*

  तडजोडी अंती रुपये 2500

▶️ *पडताळणी -* 

ता. 10/06/2021

▶️ *लाच स्विकारली -*    

ता. 10/06/2021

▶️ *घटनास्थळ* 

अन्न व नागरी पुरवठा विभाग, तहसील कार्यालय, अंजनगाव सुर्जी जि. अमरावती.

▶️ *लाचेचे कारण -*.  

यातील तक्रारदार यांचे आईच्या नावाने सरकारी स्वस्त धान्य दुकान असून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतर्गत जून 2020 ते सप्टेंबर 2020 अशा चार महिन्याचे 36000 रु. जमा झाले असून त्याचे 10 टक्के प्रमाणे 3600 रु लाचेची मागणी करून, तडजोडी अंती सापळा कारवाई दरम्यान 2500 रु खाजगी ईसमामार्फत स्वीकारले.

▶️हॅश व्हॅल्यू काढण्यात आली आहे.

▶️ *सापळा व मदत पथक-*

पो.निरीक्षक - श्री.संतोष इंगळे

पोलीस नाईक - श्री प्रमोद धानोरकर, पोलीस शिपाई राजेश कोचे,

चालक स.पो. उप नि.श्री सतीश किटुकले 

▶️ *मार्गदर्शन अधिकारी* :- 

1) श्री. विशाल गायकवाड,

पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र.

2) श्री. अरुण सावंत,

अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती परिक्षेत्र.

3)श्री. गजानन पडघन, पोलीस उप अधीक्षक,लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती 

▶️ *तपासी अधिकारी*

  पो. निरीक्षक श्री संतोष इंगळे .

▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-* 

मा. जिल्हाधिकारी, अमरावती.                                                 

------------------------------------

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

*लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती *.

*संपर्क क्रमांक* - *0721-2552355, 2553055*

*टोल फ्री क्रमांक* - *1064*.

-------------------------------------------

लाच प्रकरण : लाचखोर पोलीस शिपाई 27,000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून घेतले ताब्यात; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे


प्रेसनोट

दिनांक १०/०६/२०२१

युनिटचे नांव : अॅन्टी करप्शन ब्यूरो अकोला घटक 

आरोपीचे नांव, हुद्दा, वर्ग व कार्यालयाचा पत्ता : श्री गणेश रामराव पाटील, वय ३१ वर्ष, व्यवसाय शिपाई, नेमणुक-पो.स्टे. रामदासपेठ, जि. अकोला

अपराध घडला तारीख वेळ : १०/०६/२१ चे १०.०० ते १२.४० वा. चे दरम्यान

मागणी केलेली रक्कम : २७,०००/- रुपये

स्विकारलेली लाच रक्कम : २७,०००/- रुपये

घटनास्थळ : पो.नि. रायटर कक्ष, पो.स्टे. रामदासपेठ, जि. अकोला

प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की, यातील नमुद आरोपी लोकसेवक याने पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलेला दारूचा मुद्देमाल, ऑटो व ऑटोचालक यांना सोडून देण्यासाठी तसेच लॉकडाउनचे काळात होम डिलीव्हरी व्यतिरिक्त व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून तक्ररदार यास २७,०००/- रूपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वत: स्विकारली असता त्यास रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. वर नमुद आ.लो. से. गणेश पाटील याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

(आय. व्ही. चव्हाण ) 

पोलीस निरीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो अकोला

मोबाईल क. ८८०५४२४७०० ऑफिस फोन नं. ०७२४- २४२०३७०

टोल फ्रि नं. १०६४

लाच प्रकरण : महा लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह लाचखोर पोलीस हवालदार 10 हजाराची लाच स्वीकारताना चतुर्भुज ! दोन्ही आरोपींना एसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात


पोलिस ठाण्यातच स्वीकारली दहा हजारांची लाच : पोलिस वर्तुळात खळबळ

वरणगाव : वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरावर कारवाई न करण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या वरणगाव पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच स्वीकारताच लाच जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यातच हा सापळा यशस्वी झाला. पोलीस उपनिरीक्षक सुनील जगन्नाथ वाणी (56, रा. भिरूड कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ) व कॉन्स्टेबल गणेश महादेव शेळके (31, पोलीस वसाहत, वरणगाव ता. भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

डंपरवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच 

साकेगाव येथील 30 वर्षीय तक्रारदार यांच्या मालकीचे डंपर (क्रं. एम. एच. 40 एन. 4086) असून वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्या द्वारे वाळू वाहतूक केली जाते मात्र या वाहनावर कारवाई न करण्यासाठी दोघा आरोपींनी गुरुवारी लाच मागितली मात्र लाच द्यावयाची नसल्याने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व सापळा रचण्यात आला. पोलिस ठाण्यातच आरोपींनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या पोलिस ठाण्यात नोकरी केली त्या पोलिस ठाण्यातच दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी 

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश डी. भामरे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, एएसबाय दिनेशसिंग पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.