बुधवार, मे १९, २०२१

शासकीय रूग्नालयांची विश्वासार्हता कमी कशामुळे झाली? का जाणीवपूर्वक कमी केली !

 

By संजय ब्रम्हानंद पाटील चिखले मरवाळीकर

आज कोरोनामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले व पडत आहेत परंतु समाजातील सर्व स्तरातील लोकांचा उपचार घेण्याचा कल हा खाजगी रूग्नालयाकडेच दिसतो हे वास्तव आहे. जवळ पैसा उपलब्ध नसला तरी कर्ज काढून उपचार हे खाजगी रूग्नालयामध्येच करण्याकडे लोकांचा कल आहे. यामागचे नेमके कारण काय हे तपासणे गरजेचे आहे. कारण खाजगी रूग्नालयामध्ये लाखो रुपये भरावे लागत असले तरी ती देण्याची तयारी गरीबातला गरीब दाखवतो परंतु पीएचडी झालेले डॉक्टर तेही मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी लोक धजत नाहीत ही विचार करण्यासारखी बाब आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे खाजगी रूग्नालयातील एक डॉक्टर शेकडो पेशंट तपासत असतो नेमके त्याच्या उलट शासकीय रुग्णालयात एका पेशंटला शेकडो डाॅक्टर तपासू शकतात ! हे माहित असून सुद्धा परिस्थिती फारशी बदललेली नाही. तसे पाहिले तर सामान्य नागरीकांसाठी शासकीय रुग्नालये ही एक वरदान आहेत कारण केसापासुन नखापर्य॔तचे सर्व स्पेशालिस्ट असणारे एकमेठ ठीकाण म्हणजे शासकीय रुग्नालये आहेत. विशेषता खाजगी रूग्नालयामध्ये एखाद्या रुग्णाला ऍडमिट करून घेऊन त्याचा उपचार हाताबाहेर गेल्यानंतर त्या रुग्णास शेवटी शासकीय रुग्णालयांमध्येच पाठवले जाते हेही वास्तव आहे. जर शेवटी त्या रुग्नाला शासकीय रुग्णालयांमध्ये जावे लागत असेल तर सुरुवातीलाच लोक शासकीय रुग्णालयात का जात नाहीत? नागरीकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सरकारी रुग्णालयात बहुतांश कधीच चुकीचे उपचार होत नाहीत त्याचे कारण असे की या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना असलेल्या भरमसाठ पगारी ! तुमचा चुकीचा उपचार करून एवढ्या मोठ्या पगारीची नोकरी अडचणीत आणणे हे त्यांनाही परवडणारे नाही यामुळे त्यांच्याकडून उपचाराला दिरंगाई होऊ शकते परंतु चुकीचे उपचार कदापिही होणार नाहीत तसेच रुग्णाला आवश्यक असेल त्याच प्रमाणामध्ये औषधाचा डोस दिला जातो याउलट खाजगी रुग्णालयामध्ये हाय डोस देऊन रुग्णाला उपचार दिले जातात ज्यामुळे रुग्णांची शारीरिक हानी होते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या खाजगी रुग्णालयामध्ये तुम्ही उपचार घेत आहात त्यातील किती रुग्णालयांना दहा वीस बेडची तरी मान्यता आहे का ? हे कधी तपासले का, तर नाही ! परंतु काही बाबीचा जर विचार केला तर सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार व्यवस्थित मिळत नाही, या रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना व्यवस्थित तपासत नाहीत, या रुग्णालयांमध्ये व्यवस्थीत औषधोपचार मिळत नाही अशी मानसिकता सामान्य नागरिकांमध्ये पद्धतशीरपणे रुजवण्यात आली आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की सरकारी रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांचे त्याच गावांमध्ये असलेले स्वताचे खाजगी रुग्णालये , लोकप्रतिनिधीनी या विषयाकडे केलेले सपशेल दुर्लक्ष ,आरोग्य यंञणे बाबतची लोकांची उदास मानसिकता अनेक कारणे असू शकतात. जर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ,समाज सेवेतील कार्यकर्त्यांनी, पत्रकार मंडळींनी याविषयी सामान्य जनतेमध्ये जनजागृती करून तसेच सरकारी रुग्णालयातील यंत्रणेवर देखरेख ठेवून जर वाटचाल केली तर निश्चित परिस्थिती बदलू शकते. सामान्य जनतेच्या पैशाची होणारी लुटमार थांबू शकते. आज पर्यंत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी कधीच सरकारकडे प्रश्न लावून धरलेले दिसत नाहीत जे गरजेचे आहे यापुढील काळात तरी राजकीय कार्यकर्त्यांनी सरकारी यंत्रणेच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामान्यांची लूटमार होऊ नये यासाठी सामान्य जनतेमध्ये शासकीय रुग्णालयाच्या बाबतीत जनजागृती करून यंत्रणा सुधारण्यासाठी व बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


PM Kisan: 7 कोटीहून अधिकांचे पैसे अडकले; तुम्हीही लाभार्थी असाल तर तपासा या बाबी

 पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Scheme) योजनेतील 8व्या हप्त्याचे (8th Installment) प्रत्येकी 2 हजार रुपये सुमारे 9 कोटी 50 लाख शेतकर्‍यांच्या (Farmers)खात्यात जमा केले आहेत. परंतु अद्याप सुमारे सात कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाहीत


नवी दिल्ली 19 मे: केंद्र सरकारनं पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Scheme) योजनेतील 8व्या हप्त्याचे (8th Installment) प्रत्येकी 2 हजार रुपये सुमारे 9 कोटी 50 लाख शेतकर्‍यांच्या (Farmers) खात्यात जमा केले आहेत. परंतु अद्याप सुमारे सात कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाहीत. या योजनेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, 3 कोटी 29 लाख शेतकऱ्यांना अद्याप सातव्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. तर 3 कोटी 89 लाख शेतकऱ्यांचे पैसे काही तांत्रिक अडचणींमुळे अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे किंवा आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांक चुकल्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळं तुमच्या खात्यातही पैसे आलेले नसतील तर काही त्रुटी राहिल्या आहेत का याची खात्री करून घ्या आणि त्या दुरुस्त करून घ्या. अन्यथाया योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत.यासाठी खालील बाबींची खात्री करून घ्या.

- सर्वात आधी पंतप्रधान किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जा.

- इथं तुम्हाला उजव्या बाजूला ‘Farmers Corner’ हा पर्याय दिसेल.

इथं ‘Beneficiary Status’ पर्यायावर क्लिक करा. आता एक नवीन पेज उघडेल.

- नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबरमधील पर्यायापैकी एक निवडा.

- आपण निवडलेल्या पर्यायाची माहिती भरा. यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा.

इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. म्हणजेच तुमच्या खात्यात कोणता हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात पैसे जमा झाले.

- या योजनेच्याआठव्या हप्त्याशी संबंधित माहितीदेखील इथं मिळेल.

या लोकांचा हप्ता लवकर मिळेल :

ज्या लोकांना FTO is generated and Payment confirmation is pending असा संदेश दिसत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की, निधी हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाली असून काही दिवसातच हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे अशा लोकांनी काळजी करू नये. त्यांचे पैसे लवकरच जमा होतील.

काही अडचण असल्यास शेतकरी थेट मंत्रालयाशी संपर्क करू शकतात.

- पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266

- पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक: 155261

- पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक: 011- 23381092,23382401

- पंतप्रधान किसान नवीन हेल्पलाईन: 011- 24300606

- आणखी एक हेल्पलाईन: 0120-6025109

- ईमेल आयडी:pmkisan-ict@gov.in

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : PM Kisan Samman Nidhi Yojana; प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हे पिएम किसान सम्मान निधि योजनेचा पुढील हप्ता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर आज करणार जमा_केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर


31 एप्रिल 2021 नंतर मिळणार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 8 वा हप्ता,लवकरच नोंदणी करुन घ्या

लाच प्रकरण : लाचखोर लेखापाल 20 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 


पुणे,दि 18 मे 2021 : कामाचे बिल काढण्यासाठी तक्रारदाराकडे 25 हजारांची लाच मागून 20 हजार रूपये स्वीकारणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागातील लेखापालला अटक करण्यात आली आहे. विजय मधुकर चितोडे (वय 45) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत तक्रारदार तरूणाला पोस्ट कोवीड आणि उस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी पत्रक छापण्याचे काम मिळाले होते. पत्रक छापण्याचे काम झाल्यानंतर बिल काढण्यासाठी विजय चितोडे याने तक्रारदाराकडे 25 हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 20 हजार रूपये स्वीकारताना चितोडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.