लाच प्रकरणी तीन लाचखोर पोलीस कॉन्स्टेबल फरार-पोलीस दलात खळबळ
*लाच मागणी गुन्हा अहवाल*
▶️ *युनिट -* अहमदनगर
▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय- 27 वर्ष, रा.पाथर्डी, तालुका - पाथर्डी, जि. अहमदनगर
▶️ *आरोपी =*
1. वसंत कान्हु फुलमाळी, पो कॉन्स्टेबल, ब.न.1808, वर्ग 3 नेमणूक -उप विभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव यांचे वायरलेस ऑपरेटर ( RTPC ) राहणार- शंकर नगर पाथर्डी, जि. अहमदनगर
2. संदिप वसंत चव्हाण, पो कॉन्स्टेबल, ब.न. 566, वर्ग-3
नेमणूक - पाथर्डी पोलीस स्टेशन, सध्या संलग्न उप विभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे पथक राहणार - पोलीस वसाहत शेवगाव, जि. अहमदनगर
3. कैलास नारायण पवार पो. कॉन्स्टेबल, ब.न.2798, वर्ग -3
नेमणूक-शेवगाव पोलीस स्टेशन, सध्या संलग्न - उप विभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे पथक. राह- शंकर नगर पाथर्डी
▶️ *लाचेची मागणी-* 15000/-₹
▶️ *लाचेची मागणी तारीख-* 07/04/2021
▶️ *लाचेचे कारण* - यातील तक्रारदार यांची वाळूची ट्रक उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव श्री सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील कार्यरत वरील नमूद तिन्ही लोकसेवक यांनी दि.7/4/2021 रोजी पकडली. त्या ट्रकवर कारवाई न करता सोडण्याचे मोबदल्यात व वाळु वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता म्हणून दि.07/04/2021 रोजी आयोजित लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान वरील नमूद तिन्ही लोकसेवक यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 15000/- लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. आज रोजी आरोपी विरुद्ध शेवगाव पो स्टे येथे गुन्हा दाखल केला असून नमूद आरोपी लोकसेवक फरार आहेत, त्यांचा शोध चालू आहे.
▶️ *सापळा अधिकारी*
श्याम पवरे, पोलीस निरीक्षक
ला.प्र.वि.अहमदनगर
▶️ *पर्यवेक्षण अधिकारी**
हरिष खेडकर, पोलीस उप अधीक्षक
ला.प्र.वि.अहमदनगर
▶ **मार्गदर्शक* -
*मा.श्री सुनील कडासने सो.* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक
*मा.श्री निलेश सोनवणे सो.*
अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक
मा. श्री.विजय जाधव, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र. वि. नाशिक
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी* - मा.पोलीस अधीक्षक, अहमदनगर
टोल फ्री क्रमांक -1064
http://acbmaharashtra.gov.in/PressRelease


