शुक्रवार, एप्रिल ३०, २०२१

लाच प्रकरण-धक्कादायक : सरपंच पतीसह ग्रा.पं.सदस्य निघाला लाचखोर; घरकुल हप्त्यासाठी 20 हजार लाच घेताना दोन्ही लाचखोरांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

 घरकुल योजनेचा हप्ता खात्यावर टाकण्यासाठी सरपंचाच्या पतीने घेतली लाच


जालना : पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा हप्ता खात्यावर जमा करण्यासाठी बदनापूर तालुक्यातील काजळा येथील सरपंचाचे पती व ग्रामपंचायत सदस्यास २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने गुरुवारी ताब्यात घेतले. रंगनाथ सुभाष देवकाते (३२, रा. काजळा) असे संशयिताचे नाव आहे.

तक्रारदारास पंतप्रधान आवास घरकूल योजनेअंतर्गत १ लाख २० हजार रुपये मंजूर झाले असून, त्यापैकी १५ हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. त्यांचा ४५ हजार रुपयांचा दुसरा हप्ता खात्यावर टाकण्यासाठी सरपंचाचे पती ग्रा. पं. सदस्य रंगनाथ देवकाते यांनी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली.

लाचलुचपत विभागाने सापळा रचून पडताळणी केली असता, ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. २० हजार रुपयांचा पहिला हप्ता पंचासमक्ष स्वीकारताना रंगनाथ देवकाते यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे, पोलीस उप अधीक्षक रवींद्र डी. निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. एस. एस. शेख, पोलीस अंमलदार गणेश चेके, जावेद शेख, गजानन कांबळे, शिवाजी जमधडे आदींनी केली आहे.

✍✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एमबीबीएस परिक्षेत गडगा येथील शेख नजमाचे उज्वल यश.

 


गडगा  : नायगाव ताल्युक्यातील गडगा येथील रहीवासी तथा नाथोबा मा व ऊच माध्यमीक विदयालयाचे सेवानिव्रत प्राचार्य शेख एच डी नंदुरकर यांची कन्या शेख नजमा हीने नांदेड येथील डाॅ.  शंकरराव चव्हाण शासकीय वैदयकीय महाविदयालय येथुन एम बी बी एस ची अंतिम वर्षाच्या परिक्षेत ६७टक्के गुण घेऊन ऊज्वल यश संपादन केले आहे.नजमा शेख ही विद्यार्थीनी पहील्या वर्गापासुनच शांत स्वभावाची व अभ्यासात अत्यंत हुशार होती.तिने १० वीला नायगाव येथील ब्लू बेल्स इंग्लीश स्कुल या शाळेतुन ९६:३६ टक्के व १२वीला नांदेड येथील यशवंत महाविदयालयातुन ९३ टक्के गुण मिळविले.२०१६ मध्ये C E T परिक्षेत २००पैकी १८४ गुण घेऊन एमबीबीएसला प्रवेश मिळविला.दि.२६एप्रिल रोजी अंतिम वर्षाचा निकाल लागला त्यामुळे तिला एमबीबीएसची पदवी प्राप्त झाली आहे.तिने यशाचे श्रेय आई,वडिल,गुरूवर्य,भाऊ यांना दिले आहे.गडगा गावातुन एमबीबीएस डाॅक्टर होण्याचा पहिला मान मिळविला व गावातील विदयार्थासमोर आदर्श ठेवला  आहे.या पुढे एम.डी.डि.जी.ओ.होऊन ग्रामीन भागातील रुग्णांची सेवा करण्याचा मानस व्यक्त केला आहे.या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.