गुरुवार, एप्रिल २२, २०२१

शिव भोजनालय शिवसेना पदाधिका-याचेच : नांदेडमध्ये वृद्ध महिलेस मारहाण करणाऱ्या शिवभोजन चालकावर तात्काळ कारवाई करा - पत्रकार संरक्षण समिती

 


नांदेड,दि 22 एप्रिल : सध्या कोरोणा महामारीने अनेक गोर गरीब लोकांचे बेरोजगारीने हाल बेहाल झाले असुन तीच बाब  लक्षात घेऊन ठाकरे सरकारने कष्टकरी कामगार व गोरगरीब लोकांसाठी शिवभोजन थाळी मोफत मिळणार असल्याची घोषणा केली. 

 तरी मात्र नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शिवभोजन चावलवण्याचे काम शिवसेनेच्या पदाधिकारी ने घेऊन इतर व्यक्तीस चालवण्यास दिले असून या शिवभोजनालयात स्वतंत्र स्वयंपाकगृह नाही व कसलीही स्वच्छता दिसुन येत नाही व तसेच याठिकाणी काही मोजक्याच व्यक्तींना भोजन दिले जात असुन सदरील भोजनालय चालक जनतेची दिशाभूल करीत असुन या भोजनालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे.

अशातच दि. २० एप्रिल रोजी एक वृद्ध महिला या शिवभोजनालयात  भोजन मागण्यास गेली असता त्या गरीब वृद्ध महिलेला शिवीगाळ करत मारहाण करून माणुसकीला काळीमा फासण्याचे काम केले आहे.


तरी या प्रकरणाची चौकशी करून त्या शिवभोजन चालकासह मारहाण करणाऱ्या महिलेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आले असुन या निवेदनावर जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,सचिव शशिकांत गाढे आदि सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

✍✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

नांदेड मधील गरजू रुग्णांसाठी एक मदतीचा हात,संचारबंदी उठेपर्यंत जेवणाचा मोफत डबा-SWAMI GROUP OF BUSINESS चा स्तुत्य उपक्रम



  • नांदेडमध्ये विविध रुग्णालयात रुग्णांनासाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत पौष्टिक घरगुती जेवणाची(टिफीन) सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल
  • रुग्णांसाठी मोफत फळ(ज्युस) उपलब्ध करून देण्यात येईल

नांदेड,दि 22 एप्रिल : कोरोना काळात कोवीड हॉस्पिटलमध्ये व इतर दवाखान्यात भरती असलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चांगल्या पौष्टिक आहारासाठी भटकंती करावी लागत आहे,अशा परिस्थितीत कोवीड रुग्णांना पौष्टिक जेवण मिळणे महत्वाचे असते,खेड्यापाड्यातून आलेल्या रुग्णांचे नातेवाईक शहरात असतातच असे नाही,कोरोनाला भिऊन नातेवाईक ही मदत करायला समोर येतीलच याची शाश्वती नाही आणि ज्यांचे नातेवाईक शहरात नाहीत अशांना जेवणाचा डब्बा हा सर्वात अडणीचा विषय आहे.
कोवीड-19 ची महामारी आली तेंव्हापासून महाराष्ट्र शासनानेही सर्व जिल्ह्यातील काही ठिकाणी तसेच तालुक्यात प्रत्येकी एक असे शिवभोजन सेंटर सुरु केले आहे,पण त्या ठिकाणी मोजक्या थाळीची व्यवस्था असल्याने विशेष म्हणजे दुपारी 2:00 वाजेपर्यंतच थाळी मिळत असल्यामुळे काहींना दुपार नंतर व रात्रीच्या जेवणाची समस्या निर्माण होत आहे.शासनाने ठरवून दिलेल्या थाळ्या संपल्यानंतर त्यांना माघारी परतावे लागते,या वर्षी कोवीडमध्ये होत असलेली वाढ पाहता त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने शिवभोजन केंद्रावरील थाळ्यांमध्ये वाढ तर केली परंतु त्याकरिता देण्यात आलेल्या वेळेची जटील समस्या तसीच आहे,शासनाने थाळी देण्याच्या वेळेत वाढ करुन सायंकाळी 8:00 वाजेपर्यंत करणे गरजेचे आहे.तसेच काही कोवीड सेंटरने रुगणांकरीता मेसची व्यवस्था केली आहे पण काही रुग्णालयात मेसची व्यवस्था नाही.

अशा परिस्थितीत स्वामी ग्रुप ऑफ बिझनेस (SWAMI GROUP OF BUSINESS) च्या वतीने 15 एप्रिलपासून संचारबंदी उठेपर्यंत नांदेड येथे बाहेर गावातून कोवीड हॉस्पिटल व इतर कुठल्याही दवाखान्यात भरती असलेल्या गरजू रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाच्या डबा(टिफीन) देण्याची व्यवस्था केली आहे.

1.नांदेडमध्ये विविध रुग्णालयात रुग्णांनासाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत पौष्टिक घरगुती जेवणाची(टिफीन) सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

2.रुग्णांसाठी मोफत फळ(ज्युस) उपलब्ध करून देण्यात येईल.

रुग्णांच्या नातेवाईकांनी ज्यांना जेवणाच्या डब्यांची गरज आहे त्यांनी खालील नंबरवर संपर्क करण्याचे स्वामी ग्रुप ऑफ बिझनेस (SWAMI GROUP OF BUSINESS) कडून आवाहन करण्यात आले आहे...

संपर्क

1.शुभम स्वामी-9503890589

2.श्रीकांत पाटील-9665646006

3.मुकेश पाटील-8605068529

4.नेहाल दासे-9145373338

यांनी पूढाकार घेऊन आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांसाठी टिफिनची सोय करुन दिली आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जर कोणी नांदेडला कोणत्याही हॉस्पिटलला असेल आणि लॉकडाऊन असल्यामुळे जर जेवणाचा डब्बा मिळत नसेल तर स्वामी ग्रुप नांदेड हा ग्रुप रूग्णांना व रुग्णांसोबत जे कोणी असेल त्यांना जेवणाचा डब्बा मोफत देत आहोत.गरजूंनी नाव आणि दवाखान्याचा पत्ता सांगितल्यानंतर तेथे जाऊन टिफीन देण्यात येईल.

शुम स्वामी

SWAMI GROUP OF BUSINESS

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 मार्च 2020 म्हणजे मागिल एक वर्षापासून संपूर्ण जगात कोरोना-19 ने थैमान घातले आहे.गतवर्षीची लाट ही या लाटेपेक्षा सौम्य होती,2021 मध्ये कोवीडची दुसरी लाट आली आहे आणि ही लाट घातक आहे,या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाण गतवर्षी पेक्षा जास्त आहे,कोवीड-19 या महामारी मधून कुठलाही देश सुटलेला नाही,भारतात देखील कोवीड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत,कुणाला बेड मिळत नाहीत तर रुग्णांना जीवनदायी ठरत असलेले रेमडिसीवीर इंजेक्शन वेळेवर मिळत नाही,त्यातही काही समाज कंठकांनी रेमडिसीवीरचा काळाबाजार मांडला आहे.

🙏||अन्नदाता सुखी भव||🙏

SWAMI GROUP OF BUSINESS चे आभार 🙏💐

कृपया गरजूंपर्यंत ही बातमी पाठवून सामाजिक बांधिलकी जपा, गरजूंना सहकार्य करा.





✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com