मंगळवार, एप्रिल २०, २०२१

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचा महालाचखोर उप अभियंता, अतिरिक्त चार्ज कार्यकारी अभियंता गुंडरे 25 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून जेरबंद केले

 


Respected sir/madam 

दिनांक 20/04/2021

* TRAP CASE 

➡युनिट       :- नांदेड  

➡तक्रारदार  :- पुरुष वय 37 वर्ष 

➡आरोपी  लोकसेवक  :- महेश गणेशराव गुंडरे, वय 53 वर्ष,  व्यवसाय उप अभियंता, चार्ज कार्यकारी अभियंता लघु पाठबंधारे जिल्हा परिषद नांदेड रा. शहाजी नगर जिल्हा परिषद कॉलोनी मालेगाव रोड नांदेड 

➡ तक्रार प्राप्त  :- दिनांक  16/04/2021

➡ लाचमामागणी पडताळणी दिनांक :- 20/04/2021

➡ सापळा दिनांक :- 20/04/2021

➡गुरनं :- 128/2021 ला.प्र.कायदा

➡ लाचेची रक्कम:- 25,000/- रुपये  

➡ कारण:-

            यातील आरोपी लोकसेवक  यांनी तक्रारदार यांचे 2020 मधी थकीत 25% वेतन अदा करणे, 7 व्या वेतन आयोगाचा थकीत हप्त्याचे देयक व महागाई भत्ता थकबाकीचे देयक काढण्याकरिता 25000/- रु. रक्कम ठरवुन त्याचा पहिला हप्ता 10000/- त्याच दिवशी स्वीकारून उर्वरित 15000/- रु. चा दुसऱ्या हप्त्याची आज  रोजी मागणी करून आलोसे यानी स्वतः स्वीकारली आहे    

➡  मार्गदर्शक:- 

मा.श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

मा.श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

➡  So  :- श्री. विजय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड

➡  TLO  :-   श्री. राजेश पुरी ला.प्र.वि. नांदेड

 ACB नांदेड टीम पोहेकॉ संतोष शेटटे, पोना एकनाथ गंगातिर्थ, दर्शन यादव,नरेंद्र बोडके





गौण खनिज उत्खननाच्या एटीएस मोजनी प्रकरणात महसूलच्या नायब तहसीलदार यांच्याकडून टाळाटाळ,तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली

 गौण खनिज उत्खनन केलेल्या स्थळांची ईटीएस मोजणी करण्यास टाळाटाळ… वरिष्ठांचे आदेश कनिष्ठ अधिकारी गांभीर्याने घेईनात


नायगाव,दि 19 एप्रिल : तालुक्यात परवाना धारकाने उत्खनन केलेल्या गौण खनिज माती व मुरूमाची ईटीएस मोजणी करण्यासाठी पथक गठीत करुन करुन तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश नायगावच्या तहसीलदारांनी महसूलच्या नायब तहसीलदारांना (ता.४) फेब्रुवारी रोजी दिले होते. पण आजपर्यंत आदेशाची दखलच घेतली नसल्याने वरिष्ठांच्या आदेशाला कनिष्ठ अधिकारी किती गांभीर्याने घेतात याचीच तहसील कार्यालयात जोरदार चर्चा होत आहे.

अवैध रेतीची वाहतूक व गौण खनिज उत्खनन नायगाव तहसील कार्यालयात अतिशय महत्वाचा विषय झाला आहे. कारण यातून महसूलच्या अधिकाऱ्यांची वसूली होत असल्याने कितीही तक्रारी झाल्या, चौकशी अहवाल आले तरी काहीही कारवाई होत नाही. पण चक्क तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा प्रताप नायब तहसीलदारांनी केल्याची चर्चा तहसीलच्या वर्तुळात होत आहे.

तहसील कार्यालयाने नायगाव तालुक्यातील सुछलेगाव येथील गट क्र. २३ मधून गंगाधर महाजन नव्हारे यांना १०० ब्रास त्याचबरोबर गट क्र. ४२ राम गंगाधर कंदकुर्ते यांना १०० ब्रास, अंतरगावच्या गट क्र. ४११ मधून जोगदंड कंन्स्ट्रक्शन नांदेड यांना १०० ब्रास, मेळगाव येथील गट क्र. ५६ मधून नुसरत कंन्स्ट्रक्शन कंपणीला ५०० ब्रास, सोमठाणा येथील गट क्र. ४२१ मधून कल्याण टोल कंपनी नांदेड यांना ५०० ब्रास, कुष्णूर येथील गट क्र. ३८६ मधून दिगांबर ढगे यांना १०० मुरुम उत्खननाची परवानगी देण्यात आली होती तर सातेगाव येथील गट क्र ६५ मधून शेख जलील यांना १०० माती उत्खननाची परवानगी देण्यात आली होती.

वरील सर्वांना मुरुम व माती उत्खननासाठी जेवढी परवानगी दिली होती त्याच्या कित्येक पटीने जास्त उत्खनन करण्यात आले. याबाबत भारतीय मराठा महासंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी (ता.२५) जानेवारी २०२१रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेवून तहसीलदार नायगाव यांनी (ता. ४) एक आदेश काढून महसूलचे नायब तहसीलदार एन.बी. वगावाड यांचे अधिपत्याखाली समिती गठीत करण्यात आली सदर प्रकरणी ईटीएस मोजणी करुन तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. पण तहसीलदारांनी दिलेले आदेश आजही फायलीत धुळखात पडले असल्याने वरिष्ठांच्या आदेशाला कनिष्ठ अधिकारी किती गांभीर्याने घेतात याची चर्चा होत आहे.

—————————————————————-

ड्रोन कँमेऱ्याने सर्वे करणाऱ्या आँपरेटरच कोरोनामुळे निधन झाले असून दुसरा आँपरेटर शासकीय कामात असल्याने वेळ मिळा नाही. पण लवकरच ईटीएस मोजणी करुन घेवू.

गजानन शिंदे, तहसीलदार, नायगाव