रविवार, एप्रिल १८, २०२१

महत्वाची बातमी : एक देश एक रेशन कार्ड योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी; देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून तसेच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय

 ९५ लाख शिधापत्रिकाधारकांनी घेतला जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ


मुंबई, दि. 16 एप्रिल : सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीचा वापर करुन धान्याचे वाटप केले जाते. माहे एप्रिल, 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 94.56 लाख शिधापत्रिकाधारकांनी जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेद्वारे अन्नधान्याचा लाभ घेतला आहे. तसेच राज्यात एक देश एक रेशन कार्ड योजनेचीही प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

राज्यातील रास्तभाव दुकानांतून स्थलांतरित कामगार, ऊसतोड मजूर, आदिवासी इ. स्थलांतरण करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्थलांतरणाच्या ठिकाणी कोणत्याही रास्तभाव दुकानांत त्यांना अनुज्ञेय असलेले धान्य प्राप्त करुन घेण्याची सुविधा पोर्टेबिलिटीद्वारे ई-पॉस उपकरणांवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याकरिता लाभार्थ्यांना सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकांवरील 12 अंकी क्रमांकाचा वापर करुन आधार प्रमाणीकरणाद्वारे धान्य वितरीत करण्यात येते.

राज्यात एक देश एक रेशन कार्ड (One Nation One Ration Card) या योजनेची सुरुवात 2018 मध्ये Integrated Management of Public Distribution System (IM-PDS) म्हणून करण्यात आली. केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणीकरण करुन लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून तसेच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध झाली. माहे ऑगस्ट 2019 मध्ये 2 Clusters च्या स्वरुपात महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश व तेलंगणा या चार राज्यांमध्ये One Nation One Ration Card ची अंमलबजावणी प्रायोगिक स्वरूपात करण्यात आली. या दोन clusters पैकी एका cluster मध्ये महाराष्ट्रासह गुजरात राज्य होते.

माहे जानेवारी, 2020 पासून One Nation One Ration Card ची अंमलबजावणी १२ राज्यात (महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक, झारखंड, हरियाणा, त्रिपुरा व गोवा) करण्यात आली. माहे डिसेंबर, 2020 मध्ये एकूण 32 राज्य /केंद्र शासित प्रदेशांमध्ये ही योजना सुरु झाली आहे. उपरोक्त 32 राज्य/केंद्रशासित प्रदेशातील कोणताही NFSA कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करुन कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो. या योजनेतंर्गत 15 एप्रिल, 2021 पर्यंत महाराष्ट्रातील 6320 शिधापत्रिकांवरील लाभार्थ्यांनी बाहेरील राज्यांमध्ये धान्याची उचल केली आहे. तसेच इतर राज्यातील 3521 शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रात धान्याची उचल केली आहे.

या योजनेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी योजनेच्या माहिती-चित्राच्या प्रती रास्तभाव दुकानात व शिधावाटप कार्यालयात प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. सदर माहिती-चित्रे माहिती व जनसपंर्क संचालनालयाच्या संकेतस्थळावर तसेच ग्रामविकास विभागाच्या “व्हिलेज बुक” वर प्रसारित करण्यात आली आहेत. योजनेसंदर्भात केंद्र शासनातर्फे सर्व रास्तभाव दुकानदारांसाठी 25 मार्च 2021 रोजी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

केंद्र शासनाने वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी) यांच्या सहकार्याने देशातील 7 शहरांमध्ये जेथे आंतरराज्य स्थलांतरितांची संख्या जास्त आहे, तेथे “एक देश एक रेशन कार्ड” योजनेतंर्गत आंतरराज्य पोर्टेबिलीटीसंदर्भात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये मुंबईचा समावेश असून त्याअंतर्गत मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील 2800 रास्तभाव दुकानांमध्ये बॅनर व पोस्टर्स लावण्यात आले आहेत. तसेच स्थलांतरितांची संख्या जास्त असलेल्या परिसरात 50000 पत्रके वाटण्यात आली आहेत. या अभियानांतर्गत 20 होर्डिंग्ज व विविध सार्वजनिक ठिकाणी घोषणा देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. One Nation One Ration Card या योजनेच्या माहितीकरिता टोल फ्री हेल्पलाईन क्र. 14445 माहे ऑगस्ट, 2020 मध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात लाभार्थ्यांनी ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

राज्यातील तसेच केंद्रशासित प्रदेशातील कोणताही NFSA कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करुन कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो. या योजनेंतर्गत दि. 15 एप्रिल 2021 पर्यंत मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रात इतर राज्यातील 1474 शिधापत्रिकाधारकांनी पोर्टेबिलिटीद्वारे धान्य घेतले असून लाभार्थ्यांनी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी केले आहे.

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेची सुरुवात 2018 मध्ये Integrated Management of Public Distribution System (IM-PDS) म्हणून करण्यात आली. केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणीकरण करुन लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून तसेच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध आहे. याकरिता लाभार्थ्यांना सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकांवरील 12 अंकी क्रमांकाचा वापर करुन आधार प्रमाणीकरणाद्वारे धान्य वितरित करण्यात येते.

या योजनेची मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने दि.12 सप्टेंबर 2020 रोजी राष्ट्रीय अन्नसुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. तसेच या योजनेची जनजागृती होऊन लाभार्थ्यांना योजनेमध्ये लाभ मिळावा या करिता सर्व शिधावाटप कार्यालयामार्फत पोस्टर्सची छपाई करुन सर्व अधिकृत शिधावाटप दुकानामार्फत ई-पॉस मशीनद्वारे धान्यवाटप करण्यात येते. या योजनेचे उद्दिष्ट व फायदे नागरिकांना समजावून सांगण्याचे काम सर्व शिधावाटप अधिकाऱ्यामार्फत करण्यात येते.

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेच्या माहितीकरिता हेल्पलाईन क्र.14445 कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच ई-मेल :-helpline.mhpds@gov.in कार्यान्वित आहे.

मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रातील सर्व पात्र लाभार्थ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे निकषात बसणाऱ्या सर्व पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी अधिकृत शिधावाटप दुकानातून गर्दी न करता शारीरिक अंतर ठेवून तसेच मास्कचा वापर करुन योजनानिहाय अन्नधान्य प्राप्त करुन घ्यावे.


Tags: वन नेशन वन रेशनकार्ड





✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

अमरावती च्या उषा पानसरे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर !

 


 पुणे ; अमरावती च्या कार्यकारी प्रेस संपादक, पत्रकार, सेवा संघ महिला अध्यक्षा, पत्रकार उषा पानसरे यांना यंदाचा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून  

हा पुरस्कार महामानव डॉ ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० जयंती वेळी जाहीर करण्यात आला आहे

समाजाच्या सामाजिक शैक्षणिक, साहित्यिक सांस्कृतिक, आणि आर्थिक उन्नती साठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे! काही काळ दैनिक तुफान क्रांती च्या पत्रकार म्हणून सुद्धा काम केले आहे 

पत्रकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उषा पानसरे यांच्यावर पूर्वी काही समाज कंटकांनी ( हल्ला गलिच्छ भाषेचा उपयोग) केला होता .


हा पुरस्कार भटक्या विमुक्त गोपाळ समाज बहुउद्देशीय सामाजीक संस्था महाराष्ट्र राज्य

अध्यक्ष सुदाम जाधव यांनी जाहीर केला आहे !

 उषा पानसरे यांच्यावर सोशल मीडिया, तसेच सामाजिक क्षेत्रात, समाधान व्यक्त होत आहे !





कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मा. महाराष्ट्र शासन दिव्यांग वृध्द निराधार दिनदुबळ्याना अशा संकटकाळी वाऱ्यावर सोडण्याऐवजी मदत करावी चंपतराव डाकोरे पाटिल

 


नांदेड,दि 16 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव? रोखण्यासाठी मा. महाराष्ट्र शासनाने राज्यात १४ एप्रिल 21 पासुन राज्यात संचारबंदी लागू करताना फेरीवाले, बांधकाम कामगार,रिक्क्षाचालक व आदिवासी कुटुंबाना आर्थिक सहाय्य (Package) जाहिर केले 

पण दिव्यांग, वृध्द निराधार यांना आर्थिक पॅकेज जाहीर केले नाही. 

       व त्याना मिळणारे *दरमहा एक हजाररूपये* मिळणाऱ्या अनुदानात *दोन वेळा दुधाचे पाकिट मिळत नाही ते अनुदान साहा ते आठ महिन्यांपासून मिळाले नाही . अशा संकटकाळी दिनदुबळ्याना मदत करण्याऐवजी मा महाराष्ट्र शासन *आगावू (Advance) अनुदान दोन महिन्या तातडीने* देण्याचे जाहीर केले. 

*दि. २७ एप्रिल २०२०* रोजीही मा. महाराष्ट्र शासनाने याच घटकासाठी एप्रिल, मे, जून - २०२० या तीन महिन्याचे *आगावू (Advance) अनुदान तातडीने* देण्याचे निर्देश दिले होते. तेव्हा बहुतांशी ठिकाणी याची अंमलबजावणी ४-६ महिन्याने झाली, *यालाच "तातडीने" म्हणतात का ?* असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. *तेव्हाही आणि आताही "आगावू" (Advance) अनुदान जाहीर केले गेले, "अधिकचे" (Additional अथवा Extra) अनुदान नाही हे निदर्शनास येते.* म्हणजेच दोन्ही वेळेस मा. शासनाने *अपंगांचा कोणताही आर्थिक भार सहन केला नाही,* मग अशा निर्णयातून *मा. शासन अपंगांप्रती संवेदनशील"* आहे असे कसे म्हणता येईल ? जसे समाजातील काही घटकांना अर्थसहाय्य जाहिर केले *तसे अपंगांना दिले असते तर* मा. शासनाला असा कितीसा भार सहन करावा लागला असता ?

*दिनदुबळ्याना दिव्यांग वृध्द निराधाराना माय बाप सरकारने दिनदुबळ्याना वाऱ्यावर सोडले* असा नाराजीचा सूर असुन यांची शासनाने त्वरीत दखल घेऊन दिनदुबळ्याना मदतीचा हात ध्यावा असे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी प्रसिद्ध पञकात दिली.