शनिवार, एप्रिल १७, २०२१

कोरोनातील मोफत धान्यातही लाचखोरी : महा लाचखोर तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी फक्त 5 हजार लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून घेतले ताब्यात,आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

 


५ हजाराच्या लाच प्रकरणात तहसीलदार विजय लोखंडेंना अटक

अकोला,दि 16 एप्रिल : रेशन दुकानातून कोरोना काळात वाटप केलेल्या धान्याचे शासनाने मंजूर केलेल्या 55 हजाराचा निधीचा धनादेश देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तहसीलदार विजय सुखदेव लोखंडे यांना अटक झाली आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, कोरोना काळात शासनाने गोरगरिब नागरिकांना रेशन दुकानांच्या माध्यमातून मोफत धान्य वाटप केले होते. त्या याटपाच्या रक्कमेचा धनादेश काढून देण्यासाठी ५ हजार ५०० रुपयांची मागणी पुरवठा निरीक्षक निलेश भास्कर कळसकार यांनी केली होती. तक्रारीअंती निलेश कळसकार विरुद्ध रामदास पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

तपासादरम्यान घेण्यात आलेल्या जबाबावरून तसेच प्राप्त व जप्त केलेल्या दस्तऐवजानुसार तहसीलदार विजय लोखंडे यांनी सार्वजनिक कर्तव्य अनुचितपणे व अप्रामाणिकपणे केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना १६ एप्रिल रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली. या गुन्ह्यात आणखी आरोपींची संख्या वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.



टोल फ्री क्रमांक : 1064

www.acbmaharashtra.gov.in

http://acbmaharashtra.gov.in/PressRelease


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

👊1️⃣ लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊2️⃣लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊3️⃣ लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

कृषि औजारे बँक योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.टी. सुखदेव यांचे आवाहन


कृषि औजारे बँक योजनेचा

लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

  • मानव विकास कार्यक्रमातर्गंत कृषि औजारे बँक ही योजना
  • महिला शेतकरी बचतगटांनी अर्ज करावेत
  • मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम पुर्ण करणाऱ्या बचतगटांना 75 टक्के अनुदान 
  • आत्मा अंतर्गत नोंदणीकृत महिला बचतगटांनी संबंधीत तालुका कृषि कार्यालयामध्ये 30 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज दाखल करावेत
  • तालुका कृषि अधिकारी, तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा
  • लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने
  • प्रति तालुका दोन औजारे बँक इतके लक्षांक

नांदेड, दि. 16 एप्रिल :- जिल्हयातील बिलोली, लोहा, धर्माबाद, भोकर, मुदखेड तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रमातर्गंत कृषि औजारे बँक ही योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. प्रति तालुका दोन औजारे बँक इतके लक्षांक या कार्यालयास प्राप्त झाले आहे. तरी जास्तीत जास्त महिला शेतकरी बचतगटांनी कृषि औजारे बँक योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.टी. सुखदेव यांनी केले आहे.


मानव विकास कार्यक्रम सन 2020-21 अंतर्गत निवडलेल्या तालुक्यात प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. या योजनेच्या माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, बिलोली, लोहा, धर्माबाद, भोकर, मुदखेड कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आत्मा अंतर्गत नोंदणीकृत महिला बचतगटांनी संबंधीत तालुका कृषि कार्यालयामध्ये 30 एप्रिल 2021 पर्यंत दाखल करावेत. तसेच लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पध्दतीने लक्षांकाच्या अधिन राहुन लाभार्थी निवड करण्यात येईल. मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम पुर्ण करणाऱ्या बचतगटांना 75 टक्के अनुदान देण्यात येणार आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे व मानव विकास कार्यक्रमावर आधारित योजना राबविणे G.R 20210719122428001

कृषी योजना

कृषी विभाग महाराष्ट्र शासन

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

राज्यात आणखी दोन ते तीन दिवस रेमडेसिवीरचा तुटवडा; डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती

 


मुंबई,दि 17 एप्रिल : राज्यात कंपन्यांकडून मागविण्यात आलेल्या रेमडेसिवीरच्या साठय़ापैकी 12 ते 15 हजार रेमडिसीवीरचा कमी पुरवठा झाला आहे. यामुळे पुढील 2 ते 3 दिवस रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती उत्पादकांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

राजेंद्र शिंगणे म्हणाले, नुकतीच माझी काही कंपन्यांच्या एमडी व सीईओंसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. भविष्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कशा प्रकारे त्या कंपन्यांच्या माध्यमातून ते वाढवून देतील? किती वाढवला जाणार आहे? याबाबत विचारणा करण्यात आली. कारण साधरण तीन आठवडय़ांपूर्वी याच कंपन्यांच्या सीईओ व एमडींसोबत मी बैठक घेतली होती त्यावेळेस मला त्यांनी पुढील 15 तारखेपर्यंतचा कार्यक्रम दिला होता. त्या कार्यक्रमानुसार दररोज ते महाराष्ट्रात 55 हजार रेमडेसिवीर पुरवतील अशी ग्वाही त्यांनी दिली होती; परंतु कालच्या तारखेपर्यंत सरासरी जर आपण पाहिली तर 37 ते 39 हजारपर्यंतच त्यांनी रेमडेसिवीर पुरवले आहे, असेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले.

20 एप्रिलपर्यंत पुरवठा सुरळीत होईल

दररोज रुग्णांची संख्या वाढत असताना रेमडेसिवीरची मागणीही वाढणार आहे. याबाबत या उत्पादकांसोबत चर्चा झाली असून 19-20 एप्रिलनंतर हा पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन कंपन्यांकडून देण्यात आले आहे, असे राजेंद्र शिंगणे म्हणाले. याचबरोबर ‘केंद्र शासनाने अतिशय चांगला व महत्त्वपूर्ण निर्णय तीन-चार दिवसांअगोदर घेतला. रेमडेसिवीरची निर्यात बंदी त्यांनी केली हे खूप चांगले काम झाले आहे. यामुळे निर्यातीसाठी तयार असलेला रेमडेसिवीरचा मोठा साठा देशभरातील व काही महाराष्ट्रातील कंपन्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात या कंपन्यांना त्यांचा माल इथे विकण्यासाठी परवानगी देण्याबाबत आम्ही कालच बैठक घेतली आहे. आता त्या कंपन्यांशी संपर्क साधण्याचे काम आमच्या विभागाकडून सुरू आहे, असेही शिंगणे म्हणाले.



सर्व जिल्ह्यातील ड्रग इन्स्पेक्टर व ड्रग्स कमिशनर चे नंबर आहेत.. *Remdesivir* मिळत नसल्यास यांना सरळ कॉल करावे...👆👆👆 सर्वत्र शेअर करा... गरजुंना मदत होईल...

List of FDA OFFICERS responsible for supply of Remdesvir to hospitals all over Maharashtra. You may circulate this List to Doctors & Hospitals all over Maharashtra.

👉महाराष्ट्र शासन आधीकृत रेमेडिसिविर इंजेक्शन ची किंमत आणि विविध जिल्ह्यात उपलब्ध असणारी ठिकाणे

👉आज 17/4/2021 रोजी नांदेड येथे रेमडेसिविर चा स्टाँक आलेला आहे... कोवीड हाँस्पिटल च्या मेडीकल वर उपलब्ध आहे..

👉आज 18/4/2021 चा रेमडेसिविर चा स्टाँक आलेला आहे... कोवीड हाँस्पिटल च्या मेडीकल वर उपलब्ध आहे..

👉आज 19/4/2021 चा रेमडेसिविर चा स्टाँक आलेला आहे... कोवीड हाँस्पिटल च्या मेडीकल वर उपलब्ध आहे..

👉आज 20/4/2021 चा रेमडेसिविर चा स्टाँक आलेला आहे... कोवीड हाँस्पिटल च्या मेडीकल वर उपलब्ध आहे.

👉आज 21/4/2021 चा रेमडेसिविर चा स्टाँक आलेला आहे... कोवीड हाँस्पिटल च्या मेडीकल वर उपलब्ध आहे.