शुक्रवार, एप्रिल १६, २०२१

15 वा वित्त आयोग : ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना पंधराव्या वित्त आयोगातून आणखी १ हजार ४५६ कोटी रुपयांचा निधी–ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

 


मुंबई, दि. १५ : राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखी १, ४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तत्काळ पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या निधीचा वापर करुन गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना अनुक्रमे ८०:१०:१० प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता एकुण ५ हजार ८२७ कोटी रूपये निधी मंजूर आहे. यापैकी यापुर्वी ४,३७० कोटी २५ लाख रूपये इतका निधी प्राप्त झाला होता, तो जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आला आहे. आता उर्वरित १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी मिळाला असून यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात मंजूर असलेला संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे. आता प्राप्त झालेल्या बंधीत (टाईड) निधीमधून स्वच्छतेशी संबंधीत कामे, हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल व दुरुस्ती तसेच पेयजल पाणीपुरवठा, पर्जन्य जल संकलन (रेन वॉटर हार्वेस्टींग) तसेच पाण्याचा पुनर्वापर (वॉटर रिसायकलिंग) यासंदर्भातील कामे करता येऊ शकतील.

८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना

या योजनेतून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधीचा वापर करत गावांमध्ये चांगल्या विकासकामांची निर्मिती करावी, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे. विशेष म्हणजे या निधीतील सर्वाधिक ८० टक्के भाग थेट ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मिळणार आहे. त्यामुळे गावांच्या विकासामध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढणार आहे. उर्वरित निधीपैकी १० टक्के निधी हा जिल्हा परिषदेस तर १० टक्के निधी हा पंचायत समित्यांना मिळणार आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले

Tags: #ग्रामपंचायत#जिल्हा परिषद#पंचायत समिती





✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

👊1️⃣ लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊2️⃣लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊3️⃣ लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

Telegram Instant View👉 News Link

नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी माजी आ. वसंतराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी हरिहरराव भोसीकर यांची बिनविरोध निवड

 


नांदेड,दि 16 एप्रिल :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नावाववर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडुन शिक्कामोर्तब करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता यांच्या विरोधात दुसरा एकही अर्ज आला नसल्यामुळे माजी आ.वसंतराव चव्हाण यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीहर भोसीकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली


आ. वसंत चव्हाण यांनी गावच्या सरपंच पदापासून जिल्हापरिषद सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, नायगाव मार्केट कमिटी चेअरमन, आणि आता नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष अशी नामी पदे भूषवित आपल्या राजकिय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील विविध पदाचा कार्यभार सांभाळीत आपल्या सातत्यपूर्ण कार्याची झुनुक समाजमनावर बिम्बवत ठेवली आहे. या निवडीमुळे नायगावकर पुन्हा राजकिय क्षेत्रात जोमाने पुढे आल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे.सर्वच क्षेत्रातून त्यांचे या निवडी बद्दल अभिनंदन ही करण्यात येत आहे.

#नांदेड#जिल्हा#मध्यवर्ती#सहकारी#बॅंक#अध्यक्ष#उपाध्यक्ष #निवड


✍️✍️✍️


संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

महा लाचखोर सहायक निबंधकाने (सहकारी संस्था) 1 लाख लाचेची मागणी करून 50 हजार लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले

 


*यशस्वी सापळा अहवाल*

▶️ *युनिट -* अहमदनगर

▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय-51 वर्ष, रा- कायनेटिक चौक , पुणे रोड , अहमदनगर. जि.अ'नगर

▶️ आरोपी- सुदाम लक्ष्मण रोकडे. वय 52 वर्षे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर.वर्ग- 2 रा- हल्ली मु - सोमवंशी यांचे घरात भाड्याने, भूषण नगर, केडगाव अ' नगर

मुळ राहणार - सेक्टर 1, इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे.

▶️ *लाचेची मागणी-* 50,000/-₹

▶️ *लाचेची मागणी तारीख-* 15/04/2021

▶️ *लाच स्विकारली रक्कम* - 50,000/- ₹ 

▶️ *लाच स्विकारली तारीख-* 15/04/2021

▶️ *लाचेचे कारण* - यातील तक्रारदार यांनी एका पतसंस्थेकडुन 2014 मध्ये सोने तारण ठेऊन 30,000,00/-₹ कर्ज घेतले होते. संबधित प्रकरणात पतसंस्थेने तक्रारदार यांचे विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता . तक्रारदार यांनी न्यायालयाचे आदेशानुसार पतसंस्थेचे कर्जाची सर्व रक्कम भरली असतानाही पतसंस्थेने तक्रारदार यांचे विरुद्ध सहकारी पतसंस्था फेडरेशन अहमदनगर यांचे कडे कलम 101 नुसार तक्रारदार यांचे कडुन वसुली ची कारवाई करणेचे आदेश मिळणेकरिता प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणात आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला होता. तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला म्हणून त्याचे मोबदल्यात आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे आज रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान ₹ 1,00,000/- ची मागणी करून तडजोड अंती ₹ 50,000/-लाचेची मागणी पंचासमक्ष करुन आज रोजी कायनेटिक चौक येथील होटेल जस्ट ईन अव्हेन्यु मध्ये आयोजित लाचेचा सापळा कारवाई दरम्यान लाचेची रक्कम ₹ 50,000/- स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

 ▶️हॅश व्हॅल्यू, फोटोग्राफ्स घेण्यात आले आहे त

 ▶️ *सापळा अधिकारी** 

हरिष खेडकर, पोलीस उप अधीक्षक

ला.प्र.वि.अहमदनगर

▶️ *सहायक अधिकारी** शाम पवरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.अ.नगर.

▶ **मार्गदर्शक* -

*मा.श्री सुनील कडासने सो.* पोलीस अधीक्षक

*मा.श्री निलेश सोनवणे सो.* 

अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक.

 **मा. विजय जाधव* वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी* - मा.सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन, पुणे.

टोल फ्री क्रमांक : 1064

www.acbmahatashtra.gov.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर


7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

👊1️⃣ लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊2️⃣लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊3️⃣ लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)


लॉकडाऊन उठवा अन्यथा लोक दरोडे टाकतील – खा.छत्रपती उदयनराजे भोसले

 


सातारा : कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने सुरु केलेले लॉकडाऊन गरिबांच्या जिवावर उठले असून उपासमार करणारे आहे. हे लॉकडाऊन तात्काळ उठवले नाही तर भुकेपोटी लोक दरोडे टाकतील असा इशाराच खा.छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला आहे.

सातारा येथील पोवई नाका येथे खा.छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चक्क कटोरा घेत रस्त्यावर भिक मांगो आंदोलन सुरु केले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चला चला शंभर रुपये टाका……. कलेक्टरांना द्यायचे आहे….. असे म्हणत त्यांनी रस्त्यावर भिक मांगो आंदोलन सुरु केले. उद्यापासून “नो लॉकडाऊन”- मारामारी झाली तर यु आर रिस्पॉन्सिबल असे म्हणत सुव्यवस्था कलेक्टरची आहे असे म्हणत त्यांनी अधिकारी वर्गाला फैलावर घेतले.



भिक मागून जमा करण्यात आलेले पैसे त्यांनी प्रशासनाकडे सुपुर्द करत कठोर टीका देखील केली. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे कोणता तज्ञ सांगतो याचे स्पष्टीकरण जनतेसमोर झाले पाहिजे असे म्हणत आतापर्यंत झालेला लॉकडाऊन चुकीचा असल्याचे देखील त्यांनी म्हटले. उद्यापासून सर्व यंत्रणा सुरु राहतील असा इशाराच खा.छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्थानिक जिल्हाधिका-यांना दिला आहे. लॉकडाऊन काय तुमच्या बापाचे राज्य आहे काय? अशी गर्जना करत राजेशाही असती तर सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवले असते असे देखील खा.छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले.

मोठी बातमी : हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांनी मानले प्रधानमंत्र्यांचे आभार

 


मुंबई, दि १५ एप्रिल : हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हि मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.

यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले.

Tags: कोवॅक्सीन लस #हाफकिन संस्था