गुरुवार, एप्रिल १५, २०२१

नायगाव येथे ५० खाटांचे कोरोना सेंटर (दवाखाना) लवकरच चालू होणार_आ.राजेश पवार-नायगाव विधानसभा मतदारसंघ



  • नायगाव येथे ऑक्सिजन निर्मिती कारखाना लवकरच चालू होणार...
  • अपूर्ण असलेले बांधकाम लवकरच पूर्ण होणार...
  • नायगाव दवाखान्याचा फायदा संपूर्ण मतदार संघाला
प्रसिध्दी पत्रक

नायगाव,दि 14 एप्रिल : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असुन विशेषतः ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात पसरत आहे. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुका कोरोना संसर्गामध्ये ५ व्या क्रमांकावर आहे. कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सध्या नायगाव येथे फक्त कोविड केअर सेंटर असून त्याठिकाणी फक्त प्रथमोपचार केला जातो परंतु चिंताजनक / गंभीर (Critical) रुग्णांना मात्र नांदेड येथे उपचारासाठी भटकावे लागते बऱ्याचदा त्यांना बेडसुध्दा मिळत नाहीत. त्यामुळे आ.राजेश पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर यांना नायगाव येथे कोरोना सेंटर चालू करण्यासाठी विनंती केली असता त्यांनी त्वरीत मान्य केले.त्याचप्रमाणे 14 रोजी आ.राजेश पवार यांच्या विनंतीवरुन जिल्हाधिकारी नायगाव येथे आले.जिल्हाधिकारी आणि आ.राजेश पवार यांनी नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली व कोरोना दवाखान्याच्या नियोजनाबात चर्चा केली. 


त्याचप्रमाणे येथे कर्मचारी निवास सदनासाठी (Staff Quarters) साठी निधी द्यावा अशी मागणी देखील जिल्हाधिका-यांना केली असता तत्वता त्यांनी ती मागणी देखील मान्य केली. त्याचप्रमाणे येथील शस्त्रक्रिया विभाग (Operation Theatre) पुर्णपणे सुसज्य करण्याचे ठरले आहे. तसेच नवीन सोनोग्राफी मशीन व शस्त्रक्रिया विभागामधील इतर उपकरणे देखील त्वरीत देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे आता नायगाव ग्रामीण रुग्णालय लवकरच सर्वप्रकारे सुसज्य होणार असल्यामुळे नायगाव तालुक्यासह नायगाव विधानसभा मतदार संघातील इतर तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे येथे अजुन नवनवीन उपकरणे उपलब्ध होणार असल्यामुळे याठिकाणी सद्यस्थितीपेक्षा तीन पट जास्तीच्या रुग्णांवर उपचार झाला पाहीजे असे आ.राजेश पवार यांनी येथील डॉक्टरांना सुचना केली आहे.


नायगाव येथे ऑक्सिजन निर्मिती कारखाना लवकरच चालू होणार...

५० खाटांच्या कोरोना दवाखान्यासाठी त्याचप्रमाणे पुढील इतर आजारातील रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्यास सध्या नायगाव ग्रामीण रुग्णालय येथे नांदेडहून उपलब्ध केल्या जाते बऱ्याचवेळेस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते म्हणूनच मा. जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करुन याठिकाणी साधारणत: १५ ते २० दिवसांनी ऑक्सिजन निमिर्ती कारखाना उभा करण्याचे नियोजन केले आहे.