शनिवार, एप्रिल १०, २०२१

पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

 


मुंबई दि. 10 एप्रिल :- राज्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात आली आहे असे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दि. १४ फेब्रुवारी, २०१८ च्या शासन निर्णयानुसार पिण्याच्या पाणीटंचाई निवारणाच्या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना व नळ योजना /विंधन विहिरी विशेष दुरुस्ती इत्यादी उपाययोजनांना दिनांक ३१ मार्चपूर्वी प्रशासकीय मान्यता देण्याचे ठरविण्यात आले होते. तथापि, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचा कालावधी शिथिल करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.त्या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणाच्या कामांकरिता ( तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना व नळ योजना,विहिरी विशेष दुरुस्ती) दिनांक ३० एप्रिल.२०२१ पर्यंत विहित आर्थिक व भौतिक निकषांनुसार देण्यास मंजुरी देण्यात येत आहे. ही कामे दिनांक ३१ मे २०२१ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक राहील.जेणेकरुन ही कामे टंचाई कालावधीत उपयोगात आणता येतील असेही श्री.पाटील यांनी सांगीतले.

श्री.पाटील म्हणाले,राज्यात अनेकदा अपुऱ्या पर्जन्यमानामुळे किंवा अन्य कारणांमुळे ग्रामीण/नागरी क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते. शासनाने पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ ग्रामीण/नागरी क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांकरिता वेळोवेळी स्थायी आदेशाद्वारे सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. दिनांक ०३ फेब्रुवारी,१९९९ च्या शासन निर्णयान्वये ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत कार्यवाही निश्चित करण्यात आलेली आहे. सदर स्थायी आदेशानुसार पाणीटंचाई निवारणार्थ घेण्यात येणाऱ्या उपाययोजना दिनांक ३० जूनपर्यंत राबविणे आवश्यक आहे असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

Tags: पाण्याची टंचाई

महा लाचखोर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदाराच्या सम्मतीने लाचखोर महसूल सहायकाने 1 लाख 25 हजाराची मागणी करुन 70 हजार स्विकारताना एसीबीने रंगेहाथ पकडून दोघांच्याही मुसक्या आवळल्या

 कुणाला वाचायचं पडलय कोडं,तर कुणाला लाचखोरीचं लागलय वेड


आदरणीय सर, जयहिंद

सापळा अहवाल दि. 09/04/21

▶️ युनिट - औरंगाबाद,

▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 32

▶️ आरोपी लोकसेवक:- 1.श्री. अशोक बाबुराव मरकड ,वय 55 , पद- महसूल सहायक, वर्ग (३) नेमुणक- तहसील कार्यालय गंगापूर

2. श्री अविनाश महादेव शिंगटे, पद- तहसीलदार, गंगापूर वर्ग (1) नेमुणक- तहसील कार्यालय गंगापूर रा.गंगापूर

  ➡️लाचेची मागणी-- 1,25,000/-रूपये दिनांक- 08/04/21 

  ➡️लाच स्वीकारली--70,000/-रुपये दिनांक- 09/04/21 आरोपी लोकसेवक क्र 1 यांनी, क्र 2 यांच्या संमतीने लाच रक्कम स्वीकारली                     

▶️ कारण - यातील आलोसे क्र 1 यांनी तक्रारदार यांचे मौजे आपेगाव तालुका गंगापूर येथील वडिलोपार्जित असलेल्या जमीन गट नंबर 19 मधील सातबारा वर असलेला कुळ कायद्याप्रमाणे व्यवहार बेकायदेशीर शेरा कमी करण्यासाठी रुपये 1,25,000/- लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 70,000/- रुपये लाच पंच साक्षीदारा समक्ष स्वीकारली. 

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️ सापळा अधिकारी, श्री मारुती पंडित पोलीस उप अधीक्षक, श्री विलास घनवट पोलिस निरीक्षक ला प्र वि औरंगाबाद

▶️मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद

मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम. अपर पोलीस अधीक्षक,

 मा .श्री. ब्रह्मदेव गावडे, पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद.

➡️सापळा पथक - पो.ना. प्रकाश घुगरे, पो.ना. भूषण देसाई, पो.अ. मिलिंद इप्पर

टोल फ्री नंबर : 1064

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वेबसाईट

Press release प्रसिद्धी पत्रक



✍✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

👊1️⃣ लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊2️⃣लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

👊3️⃣ लाचलुचपत सापळा कारवाई (whatsapp group)

खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी गमावला-पालकमंत्री अशोक चव्हाण

 


नांदेड : देगलूरचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे अकाली निधन धक्कादायक असून, त्यांच्या रूपात मी खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी गमावला आहे.सकाळी १० वा. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या

 अधिकृत फेसबुक पेजवर ही भावूक पोस्ट ठेवली आहे.

अशोक चव्हाण पुढे म्हणतात की, मागील काही दिवसांपासून त्यांचे आजारपण वाढतच होते. परंतु, अंतापूरकरांचे व्यक्तीमत्व संघर्षशील होते. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला होता व अनेकदा खडतर परिस्थितींवर मात केली होती. कोरोनातूनही ते बरे झाले होते. त्यामुळे या आजारपणातून ते बाहेर पडतील, अशी आशा होती. परंतु, दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घालून सर्वसामान्यांमधील एक लोकप्रिय नेतृत्व हिरावून घेतले.

आ. रावसाहेब अंतापूरकर एक मनमिळाऊ, संवेदनशील लोकप्रतिनिधी होते. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. राजकारणात नवखे असताना देखील पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. आमदार असताना व नसतानाही त्यांनी प्रामाणिकपणे लोकांची कामे केली. त्यामुळेच जनतेने त्यांना दुसऱ्यांदा आमदार केले. ते अतिशय अभ्यासू होते. देगलूरच्या विकासासाठी त्यांच्या अनेक संकल्पना होत्या व त्याअनुषंगाने ते सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या निधनाने केवळ देगलूर नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील एक सक्षम नेतृ्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. 

चव्हाण कुटुंबाशी त्यांचे संबंध राजकारणापलिकडचे होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने मी समाजकारणातील सहकारीच नव्हे तर एक कौटुंबिक स्नेही गमावला आहे. आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.




आ. रावसाहेब अंतापूरकर यांचे रात्री ११:२० वा.मुंबई येथे निधन; माझे निकटचे सहकारी होते – अशोक चव्हाण यांनी वाहिली श्रद्धांजली


देगलूर दि 10 : देगलूर-बिलोलीचे आमदार, तथा मातंग समाजाचे नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे बाॅम्बे हाॅस्पिटल, मुंबई येथे राञी ११:२० वा. दुःखद निधन झाले आहे, तरी त्यांची अंत्ययात्रा त्यांचे गाव अंतापूर ता.देगलूर जि.नांदेड येथे आज सायंकाळी ४ वा. होईल अशी बातमी मारोती वाडेकर यांनी मुंबईहुन फोनद्वारे कळवली आहे.


देगलूर- बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर (वय 63 वर्ष) यांचे आज मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना 25 दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. आमदार अंतापूरकर हे 25 दिवसांपूर्वी कोरोनाबधित झाले होते. तेव्हा स्वतः त्यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले होते. नांदेड येथील भगवती रुग्णालयात 3 दिवस उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे अॅडमिट केले होते. मागील 8 दिवसापासून ते अत्यवस्थ होते. प्रकृती चिंताजनक होती.

अशातच त्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यामुळे एक हळव्या मनाचा आमदार आपल्यापासून हिरावला गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. आमदार अंतापूरकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.