सोमवार, मार्च २२, २०२१

लाचखोर मंडळ अधिकारी व लालची सरपंच बारा हजार पाचशे ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 
गंगाखेड प्रतिनिधी :- राणीसावरगाव चे मंडळाधिकारी बालाजी लटपटे व वाघदरा चे सरपंच गोविंद सानप यांना बारा हजार पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक क्षेत्र परभणी या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई दिनांक २२ मार्च २०२१ रोजी बालाजी लटपटे यांच्या व्यंकटेश नगर येथील घरामध्ये करण्यात आली.

परभणी पथकाने सापळा रचुन सरपंच गोविंद सानप व मंडळाधिकारी बालाजी लटपटे यांना लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहात पकडले आहे. यातील तक्रारदार यांनी वाघदरा शिवारामधील त्यांच्या आजोबा चे नावे असलेले जमिनीचा कोर्टाकडून झालेल्या तडजोडीचा फेरफार त्यांचे वडील व चुलते यांच्या नावे करून देण्यासाठी मंडळ अधिकारी व सरपंच त्यांच्याकडून १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असता तडजोडी अंती बारा हजार पाचशे रुपये देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांनी गंगाखेड येथे मंडळाधिकारी यांच्या घरी गेले सरपंच गोविंद सानप यांच्या हस्ते मंडळाधिकारी लटपटे यांनी ते पैसे स्वीकारल्याने त्याच ठिकाणी परभणी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी यांनी त्यांना सापळा रचून रंगेहात पकडले दोघांनाही रोख रक्कमेसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती.

ही कारवाई श्रीमती कल्पना बारवकर पोलीस अधीक्षक नांदेड, श्रीमती अर्चना पाटील अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक भारत के हुंबे ,पोलीस निरीक्षक अमोल कडू ,पोलीस नाईक अनिल कठारे ,अनिरुद्ध कुलकर्णी ,सचिन धबडगे, जाहगीरदार, हनुमंते, शेख मुखीत, माणिक चट्टे, शेख मुख्तार,सरीका टेहरे,कदम,चौधरी ए सि बी परभणी यांनी कारवाई यशस्वी पार पाडली.

www.acbmaharashtra.gov.in

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

लाचखोर महिला नायब तहसीलदार,रेशन दुकानदार संघटनेच्या अध्यक्षासह तिघांना लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले


उस्मानाबाद : महिला नायब तहसीलदार, रेशन दुकानदार संघटनेचा अध्यक्ष याच्यासह तिघांना पावणे सात हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. कोरोना काळात मोफत धान्य वाटप प्रकरणात शासनाकडून आलेली मदत देण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली आहे. नायब तहसीलदार अन दोन रेशन धारक दुकानदाराना पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

परविन उमर दराज खान पठाण (वय 47), श्रीरंग साधू डोंगरे (वय 64) आणि विलास ज्ञानोबा पिंगळे (वय 55) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

कळंब तालुक्यातील तहसील कार्यालयात परवीन या नायब तहसीलदार (पुरवठा) आहेत. तर श्रीरंग हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे.

यातील तक्रारदार हे स्वस्त धान्य दुकानदार आहेत. त्यांनी लॉकडाउन काळात मोफत धान्य वाटप केले होते. त्याचे प्रत्येकी एक क्यूँटल मागे 150 रुपये प्रमाणे शासनाकडून बिल मिळते. त्यानुसार तक्रारदार यांना गेल्या तीन महिन्याचे 44 हजार 623 रुपये बिल मंजूर झाले होते. ते बिल काढून देण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे 6 हजार 693 रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. यानुसार आज झालेल्या सापळा कारवाईत या तिघांना एकाच वेळी 6 हजार 700 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

www.acbmaharashtra.gov

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

विनम्र आवाहन ……गरीब कुटुंबातील तिसरीत शिकणाऱ्या ब्रेन हॅमरेज ग्रस्त विद्यार्थिनीच्या उपचारासाठी तात्काळ आर्थिक मदतीची गरज…

समाजातील दानशूर व्यक्तींनी, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक, केंद्रप्रमुख, व इतर कर्मचारी यांनी मदत करण्याचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी केले आवाहन

||दाता भवती वा न वा||

गोंदिया, (दि. 21 मार्च) : जिल्ह्यातील पंचायत समिती सालेकसा अंतर्गत जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा दरेंकसा केंद्र दरेकसा येथील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु.साक्षी दिवाकर मुसाहे हिला ब्रेन हॅमरेज अटॅक आला असून ती नागपूर येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल आहे.गरीब परिवारातील कुटुंब मुलीचा जीव वाचविण्यासाठी संघर्ष करीत आहे.

मुलीचे आई वडील दोन्ही रोजंदारीवर काम करणारे मजूर असून हातावर पोट असलेल्या या गरीब कुटुंबांची खूप वाताहत झालेली आहे. त्यासाठी आपल्या सढळ हाताने आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. या कुटुंबासाठी आपला एक मदतीचा हात या उद्धस्त परिवारास पुनश्च उभा राहण्यास मोलाचा ठरणार आहे!

करिता समाजातील सहृदय, समाजशील, कर्त्तव्यदक्ष आणि संवेदनशील अधिकारी, शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण क्षेत्रात कार्यरत सर्व मान्यवरांनी सढळ हाताने मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन जि. प. व. प्रा. शा. दरेकसा चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक एस. टी. लांजेवार आणि सर्व शिक्षक यांनी केले आहे.

त्यांच्या आवाहनाला जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत असून जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी रु.1500/-, गट शिक्षणाधिकारी, (पं. स. गोंदिया) जे. एस. राऊत-1500/- , मुख्याध्यापक एस.टी.लांजेवार 1000 रुपये, शिक्षक पालकर भारती 1000 रुपये, सुनीलकुमार सिंगाडे 1000, दिनेश उके 1000 रुपये, टी सी पटले 1000, सुरेश मेश्राम (गांधीटोला) 500/, मनोहर कटरे (बोदलबोडी) 500/-, उच्च श्रेणी मुख्याध्यापक डी. टी. कावळे 1000, नरेंद्र बिसेन 1000/-, केंद्रप्रमुख डी. सी. तुळशीकर 1000/-, राजेंद्र रहांगडाले 1000/-, विषय साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे 500/-, पत्रकार-संजय बी.चिखले(मरवाळी) 1,000/_, अशी मदत झाली असून त्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. तरी कृपया या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपल्या परीने गरीब कुटुंबातील मुलीचा प्राण वाचविण्यासाठी आपण मदत करावी. आपली छोटीशी मदत खालील मुलीच्या आईच्या बँक खाते क्रमांकावर फोन पे, गुगल पे, वा इतर माध्यमातून जमा करावे असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

बँक खाते धारक (आई)

सौ .अनिता दिवाकर मुसाहे 

खाता नंबर : 34901280414

IFSC code : SBIN0005427

🔻 *दुःखद घटना..... जिल्हा परिषद शाळा दरेकसा येथील विद्यार्थीनी कु. साक्षी मुसाहे हीचे ब्रेन हँमरेज ने निधन..*

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com