रविवार, मार्च २१, २०२१

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अ‌ॅड.जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये दिली तक्रार

 विधानसभा अध्यक्ष यांच्या परवानगी नंतर पुढील कारवाई केली जाईल_मलबार हिल पोलीस

मलबार हिल,दि. 21 मार्च : मलबार हिल पोलीस स्टेशन येथे पत्रकार संजय चिखले यांनी रात्री १०:३० च्या सुमारास फोन करून महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचे विरुध्द कुणी तक्रार दिली आहे काय? ते बरोबर आहे काय? गुन्हा दाखल झाला आहे काय? अशी विचारणा केली तेंव्हा माहिती देताना पोलीस स्टेशनचे पिएसओ शिंदे यांनी सांगितले की,दिवसा एक तक्रार आली आहे,अद्याप गुन्हा एखादा झाला नाही कारण एखादा मंत्री किंवा आमदार यांचे विरुध्द तक्रार आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याअगोदर विधानसभा अध्यक्ष यांची परवानगी घ्यावी लागते,त्यांनी परवानगी दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाते.

सविस्तर माहिती अशी आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं असून त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. या पत्रात सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलीये.अ‌ॅड.जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी ही तक्रार दिली आहे.भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याअगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली अटक व्हावी,” अशी मागणी त्यांनी आपल्या पत्रात केली आहे. 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परंबिर सिंह यांनी केलेल्या आरोपांबाबत चौकशीचे आदेश देण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असून तेच याबाबत योग्य तो निर्णय घेतील असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे ते आज नवी दिल्लीत आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पुराव्यासह केलेले आरोप पाहता गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे

मलबार हिल पोलिस स्टेशन

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

300 चौ.मी पर्यंतचा घर बांधकाम परवाना ग्रामपंचायतीकडेच,या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सिईओंना पाठवले पत्र

 बांधकामासाठीचे विकास शुल्क ग्रामनिधीमध्ये जमा होणार असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात होणार वाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

ग्रामीण भागातील बांधकाम परवानगीसंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी सूचना निर्गमित

मुंबई, दि. १९ : राज्यातील ग्रामीण भागातील ३ हजार २२९ चौरस फुटापर्यंतच्या (३०० चौरस मीटर) भूखंडावरील बांधकामांना नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नसल्याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. याऐवजी ग्रामस्थांना आता बांधकामासाठी काही कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे सादर करावयाची असून विकास शुल्क आणि बांधकाम कामगार उपकर भरावयाचा आहे. यासंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे अवगत करण्यात आले असून ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढणार

नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या युनिफाईड डीसीआर (एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली) यास अनुसरुन नुकताच ग्रामीण बांधकामासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आता नव्या निर्णयानुसार बांधकामासाठी भरावयाचे विकास शुल्क हे बांधकामइच्छुक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे भरावयाचे असून यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही मोठी वाढ होणार आहे, अशीही माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

विकास शुल्क किती असेल?

विकासनिधीची स्वतंत्र नोंद होणार

ग्रामीण भागात होणाऱ्या विविध बांधकामांच्या परवानगीच्या अनुषंगाने विकास शुल्क व बांधकाम कामगार उपकर लागू राहील. नगरविकास विभागाच्या एमआरटीपी कायद्यानुसार जमीन विकास शुल्क हे रहिवासासाठी त्या जागेच्या रेडीरेकनर दराने होणाऱ्या किमतीच्या अर्धा टक्के असेल, तर वाणिज्यसाठी त्या जागेच्या रेडीरेकनर दराने होणाऱ्या किमतीच्या १ टक्के असेल. बांधकाम विकास शुल्क हे रहिवासासाठी त्या जागेच्या रेडीरेकनर दराने होणाऱ्या किमतीच्या २ टक्के असेल, तर वाणिज्यसाठी त्या जागेच्या रेडीरेकनर दराने होणाऱ्या किमतीच्या ४ टक्के इतके असेल. जमीन विकास शुल्क आणि बांधकाम विकास शुल्क मिळून एकूण विकास शुल्क होईल. हे विकास शुल्क संबंधित ग्रामपंचायतीकडे ग्रामनिधीमध्ये जमा करुन घेण्यात यावे व त्याची स्वतंत्रपणे नोंद ठेवण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय बांधकाम किमतीच्या १ टक्के इतका बांधकाम कामगार उपकर असेल. हा उपकर संबंधित प्राधिकरणाकडे जमा करावयाचा आहे.

ग्रामपंचायतींकडून कागदपत्रांची तपासणी

युनिफाईड डीसीआरमधील तरतुदीनुसार ३०० चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या भूखंडावरील गावठाण हद्दीतील इमारत बांधकामाकरिता ग्रामपंचायतींकडून कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक आहे. यामध्ये जागेच्या मालकीची कागदपत्रे, मंजूर लेआऊट (plan layout), बिल्डिंग प्लान (p-Line सहित), विकास शुल्क व बांधकाम कामगार उपकर सबंधित प्राधिकरणाकडे भरल्याची पोच/पावती, आर्किटेक्टचा विहित नमुन्यातील दाखला (proposal is Strictly in accordance with the provisions of UDCPR २०२०) यांचा समावेश राहील.

नगररचना अधिका-याचे मार्गदर्शन घ्या

नगरविकास विभागाकडून डिसेंबर २०२० मध्ये अधिसूचनेन्वये एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (Unified Development Control And Promotion Regulations) निर्गमित करण्यात आली आहे. या नियमावली अन्वये ग्रामीण भागातील इमारत बांधकामाबाबत बांधकाम परवानगीचे निकष निश्चित केले आहेत. बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने अधिक स्पष्टीकरणासाठी नगरविकास विभाग शासन अधिसूचना दिनांक २ डिसेंबर, २०२० मधील तरतुदी प्रमाणभूत समजण्यात याव्यात. तसेच उक्त बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने अंमलबजावणी करताना अडीअडचणी आल्यास जिल्ह्यातील सबंधित नगररचना अधिकारी यांचे मार्गदर्शन घेण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Tags: विकास शुल्क

नगरविकास विभाग शासन अधिसूचना दिनांक २ डिसेंबर, २०२०

बांधकाम परवाना

👇संबंधित बातमी

ग्रामीण भागात ३,२०० चौरस फुटापर्यंतच्या भूखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com