बुधवार, मार्च १७, २०२१

ब्रेकिंग न्यूज : गुन्हेगारांचे बाजूने मदत करण्यासाठी दोन लाचखोर पोलीस हवालदारांना ५ हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात



आदरणीय सर,जय हिंद

*सापळा अहवाल* 

▶️ युनिट- औरंगाबाद

▶️ तक्रारदार- पुरुष, वय-33 वर्ष रा. नारेगाव, औरंगाबाद.

▶️ आरोपी :-1) श्री शेख अफसर शेख इलोमोद्दीन वय 52 वर्षे,धंदा नोकरी( पोलिस हवालदार midc सिडको पो. स्टे.) रा.हुसेन कॉलनी गल्ली न. 6 पुंडलीकनगर रोड,  औरंगाबाद. (वर्ग 3)

2) श्री रत्नाकर पुंडलिक बोर्डे वय 50 वर्षे धंदा नोकरी (पोलिस हवालदार midc सिडको पो. स्टे.) रा. घर नं. 1180 म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर, औरंगाबाद (वर्ग 3)

▶️ लाचेची मागणी- 5,000/- रूपये 

▶️ लाच स्वीकारली- 5,000/- रुपये 

▶️ लाचेची मागणी 

दि.12.03.2021

▶️ लाचेची स्वीकृती 

दि.17.03.2021 रोजी नारेगाव पोलीस चौकी, नारेगाव ता.जी. औरंगाबाद.                             

▶️  कारण -  तक्रारदार यांचे विरुध्द  midc सिडको पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना मा. न्यायालयाने लावलेली हजेरी बंद करून गुन्हाचे तपासामध्ये तक्रारदार यांचे बाजूने मदत  करण्यासाठी यातील आलोसे नं. 1 व 2 यांनी तक्रारदार यांचेकडे 5,000/- रुपये लाचेची मागणी करून  आलोसे नं. 1 यांनी पंच साक्षीदारा समक्ष 5,000/- रुपये लाच स्वतः स्वीकारली.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️ सापळा अधिकारी- विकास घनवट पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि औरंगाबाद

▶️मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे,मा.पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.

औरंगाबाद.  

मा.डाॅ.अनिता जमादार मॅडम,अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. औरंगाबाद.,

मा.गावडे पोलीस उप अधीक्षक, औरंगाबाद 

➡️सापळा पथक- पो अं मिलिंद इप्पर,संतोष जोशी, पो.ह. राजेंद्र जोशी ,चालक पोकॉ देवीशिंग ठाकूर ला. प्र. वि. औरंगाबाद

Toll free - 1064

www.acbmaharashtra.gov.in

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

समृद्ध जीवन घोटाळ्यातील गुन्हेगाराने दगडू शेठ गणपती मंदिराला दान दिलेले दिड किलो सोने सीआयडीने घेतले ताब्यात


पुणे : समृद्ध जीवन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या महेश मोतेवारयांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दान केलेले सोन्याचे दीड किलोचे दागिने गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ताब्यात घेतले आहेत. महेश मोतेवारने सन २०१३ मध्ये दगडूशेठ गणपतीला सोन्याचा हार त्रिशुळ, परशू असे ६० लाख ५० हजार रुपयांचे दीड किलोचे दागिने अर्पण केले होते.

धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. मोतेवारने ठेवीदारांच्या पैशातून 'दानधर्म केल्याची माहिती सीआयडीच्या तपासात समोर आली होती.

समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने देशभरातील लाखो गुंतवणूकदारांना तब्बल २ हजार ५१२ कोटींचा गंडा घातला आहे. या प्रकरणी मोतेवारची २०७ कोटींच्या संपत्तीवर ईडीने आणली आहे. या प्रकरणात मोतेवारला सन २०१५ मध्ये अटक करण्यात आली आहे.

'दगडूशेठ न्यासा'च्या विश्वस्तांनी संपूर्ण सहकार्य करुन हे दागिने सीआयडीकडे सुपूर्द केले.

  • दगडूशेठ न्यासाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी 'लोकमत ला सांगितले, गोरगरिबांचा तळतळाट घेऊन अर्पण केलेले दागिने बाप्पाही स्वीकारणार नाही. अशी आमची भावना आहे. बाप्पाला कोणी काही अर्पण करत असेल, त्यावेळी तो कोण आहे, याची माहिती आम्हाला नसते.
  • भावना आणि कायदा यांच्यात गल्लत करता कामा नये. आम्ही कायदेशीर मागनि कार्य करतो. धर्मादाय आयुक्त हे आमचे प्रमुख आहे. त्यांच्या आदेशानुसार आम्ही दागिने 'सीआयडीच्या ताब्यात दिले.

https://www.dagdushethganpati.com/

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

ब्रेकिंग : गुन्ह्यात मदत करण्यासाठी २ लाखाची लाच स्वीकारताना लाचखोर पोलीस निरीक्षकाला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले



ब्रेकिंग न्यूज ... 👏

आदरणीय सर, जयहिंद

सापळा अहवाल

▶️ युनिट - औरंगाबाद,

▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 44वर्ष

▶️ आरोपी  लोकसेवक:- श्री. विलास दिनकरराव निकम  ,वय 57 वर्षे,  पद-पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन मंठा,ता.मंठा,जि. जालना (वर्ग-1)

लाचेची मागणी-  200000/-रूपये व तडजोड अंती 1,50000 दि. 16/3/2021 रोज़ी  

व स्विकृती, 50,000 दिनांक 16/3/2021रोजी

▶️  कारण -  यातील तक्रारदार  यांचा विरुद्ध पो .स्टे . मंठा  येथे दाखल असलेल्या गुन्हासंबधाने मा.उच्चन्यायलय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल असलेल्या पुनर्विचार याचिका व मा.उच्चन्यायलय खंडपीठ औरंगाबाद येथे FIR क्वेश साठी दाखल करण्यात येणाऱ्या अर्जप्रकरणात  मागवले जाणारे   से (म्हणणे) सादर प्रकरणात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी ,   तक्रारदार यांचेकडे पंच साक्षीदार समक्ष 200000/- रुपये लाचेची मागणी करून   तडजोड अंती 1,50000 स्वीकारण्याचे मान्य केले   पंच साक्षीदारा समक्ष 50,000/ रुपये लाच स्वतः स्वीकारली 

लाच स्विकृती ठिकाण-वैभव ज्वेलर्स समोर मंठा ता.मंठा जिल्हा. जालना

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

▶️ सापळा अधिकारी, श्रीमती . रेशमा सौदागर , पोलीस निरीक्षक , ला.प्र.वि. औरंगाबाद.

▶️मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद

मा.डाॅ. अनिता जमादार मॅडम. अपर पोलीस अधीक्षक, मा .श्री.गावडे पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद.

➡️सापळा पथक, पो.हवालदार एस ,जि, बदाने ,पो.ना रवींद्र आंबेकर, पो.ना.बाळासाहेब राठोड ,  पो.अं.चांगदेव बागुल

टोल फ्री - 1064

http://acbmaharashtra.gov.in/PressRelease

www.acbmaharashtra.gov.in

http://acbmaharashtra.gov.in/Statistics

http://acbmaharashtra.gov.in/RFir

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

जगभरातील विविध देशांमध्ये आहेत ७ हजार भारतीय कैदी_भारत सरकारने दिली माहिती


कर्ज बुडवून परदेशात फरारी झालेल्या निरव मोदी, विजय मल्ल्या यांना देशात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असतानाच जगभरातील विविध देशात ७ हजार भारतीय कैदी असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभा सदस्य मनोज झा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही आकडेवारी दिली आहे. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२० अखेर परदेशी तुरुंगात ७१३९ भारतीय कैदेत आहेत.

अर्थात हा आकडा या पेक्षा मोठा असू शकतो कारण ज्या देशांबरोबर भारत सरकारने माहिती देवाण घेवाण करार केला आहे त्यानुसार मिळालेली ही माहिती आहे. ज्या देशांबरोबर असा करार झालेला नाही तेथील माहिती मिळू शकलेली नाही. परदेशातील तुरुंगात बंद असलेल्या भारतीयांची सर्वाधिक संख्या सौदी येथे आहे. तेथील तुरुंगात १५९९ भारतीय कैदी आहेत. तस्करी, लैंगिक शोषण, मद्यपान, मारामारी. लाच, अमली पदार्थ अश्या अनेक आरोपांचा त्यात समावेश आहे. ४५ कैद्यांवर हत्येचा आरोप आहे. मात्र ही संख्या २०१९ च्या तुलनेत कमी आहे. त्या वर्षी १८११ भारतीय कैदी होते.

युएईच्या कुवेत तुरुंगात ५०० भारतीय कैदी असून शेजारी पाकिस्तान मध्ये सर्वात कमी म्हणजे ६२ भारतीय कैदी आहेत. नेपाळ मध्ये ८८६, चीनमध्ये १४४ तर श्रीलंकेत ८३ व बांगलादेश तुरुंगात १७८ भारतीय कैदी आहेत.

https://loksabha.nic.in/

https://rajyasabha.nic.in/

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नियमित तसेच कंत्राटी स्वरुपातील अधिकारी /कर्मचारी /सल्लागार यांच्या ड्रेस कोडच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल

ड्रेस कोड बाबत मार्गदर्शक सूचना शासन शुद्धीपत्रक

 

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नियमित तसेच कंत्राटी स्वरुपातील अधिकारी /

कर्मचारी / सल्लागार यांच्यासाठी कार्यालयात परिधान करावयाच्या पोशाखासंदर्भात(ड्रेसकोड) मार्गदर्शक सूचना       

           महाराष्ट्र शासन

     सामान्य प्रशासन विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक : संकीर्ण २०२०/प्र.क्र.७१/१८ (र.वका.)

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय (विस्तार), मुंबई ४०० ०३२

दिनांक : १६ मार्च, २०२१.

वाचा : शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : संकीर्ण २०२०/ प्र. क्र. ७१/ १८ (र.व का.), दिनांक ८ डिसेंबर, २०२०.

शुद्धीपत्रक :-

उपरोक्त विषयावरील दिनांक ८ डिसेंबर., २०२० च्या परिपत्रकातील परिच्छेद २ मधील मुद्दा क्रमांक (ब) मधील "तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जीन्स व टी-शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये." या वाक्याऐवजी "तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी टी- शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये." असे वाचावे.

२. सदर शासन शुद्धीपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२१०३१६१७२३५९९७०७ असा आहे. हे शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

                                        (महेन्द्र ब. वारभुवन)

                                       सहसचिव

प्रत :

१. मा.राज्यपाल यांचे सचिव (५ प्रती),

२. मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई

३.मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई 

४.मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

५.मा.उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई 

६.मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई

७.सर्व सन्माननीय विधानसभा, विधानपरिषद व संसद सदस्य, 

८.मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव(५ प्रती), मंत्रालय, मुंबई ४०००३२.

पृष्ठ १ पैकी २

शासन शुद्धीपत्रक क्रमांकः संकीर्ण २०२०/प्र.क्र.७१/१८ (र.वका.)