शनिवार, मार्च १३, २०२१

बेटमोगरा येथील जिपहा शाळेचे मुख्याध्यापक बहिरवाड यांचा महापराक्रम,शालेय पोषण आहार व गणवेश वाटपात मोठा भ्रष्टाचार,तर शाळा देखभाल दुरुस्तीसाठी आलेल्या अनुदानाची व शाळेच्या बँक खात्यांची चौकशी करा-भारत सोनकांबळे यांची शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

 

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना यादीमध्ये आपल्या शाळेतील मुलींची नांवे समावीष्ठ न करता शाळेबाह्य मुलींचे नांवे नोंदवले

मुखेड  : तालुक्यातील बेटमोगरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झालेली पाहावयास मिळते. या शाळेचे मुख्याध्यापक भैरवाड यांनी शालेय पोषण आहार व गणवेश वाटप तसेच शालेय विकास कामासाठी आलेल्या विविध निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे एकेकाळी बेटमोगरा येथील जिल्हा परिषद शाळा हे नांदेड जिल्ह्यामध्ये दहावी बोर्ड परीक्षा सह विविध क्षेत्रात अव्वल नंबर ची शाळा म्हणून पहावयास मिळत होती आज सद्यस्थितीत या जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळते कारण या शाळेचे मुख्याध्यापक भैरवाड यांनी शालेय पोषण आहार गणवेश वाटप डिजिटल शाळा करण्याचे कामे व ओबीसी व्हि.जे.एन.टी.मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेमध्ये आपल्या जि.प.हा. शाळा बेटमोगरा मधील पाचवी सहावी सातवी च्या मुलींची नावे यादीमध्ये समावेश न करता शाळेबाहेरील त्यांचे शाळेमध्ये नाव नसताना शाळाबाह्य अपरिचित ओबीसी ,

व्हि.जे.एन.टी मुलींचे नावे समाविष्ट केले आहे.बेटमोगरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांनी दि.१० मार्च रोजी भाजपा ता. सचिव मष्णाजी पाटील यांच्या समवेत खालील मागणीचे संदर्भात मा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे निवेदन दिले.

१) सन २०१२ ते आज पर्यंतच्या शाळा अनुदान काना शिक्षक अनुदान देखभाल दुरुस्तीसाठी प्रत्येक वर्षी आलेल्या अनुदानाची चौकशी करण्यात यावी व शासनाकडून आलेल्या निधीचा चिकट बुक वरील बोगस पावत्यांची चौकशी करण्यात यावी.२) शाळेच्या नावे असलेल्या सर्व बँक खात्यांची चौकशी करण्यात यावी सन 2012 ते आज पर्यंत च्या कार्यकाळात ग्रामपंचायत अंतर्गत तेरावा चौदावा पंधरावा वित्त आयोगाच्या माध्यमातून शाळेसाठी कोणकोणत्या कामासाठी किती निधी देण्यात आला आणि त्याचा विनियोग अशा पद्धतीने करण्यात आले त्याची चौकशी करावी. ३) सन 2019 मध्ये शाळेतील सात संगणक संच हे चोरी गेल्याची खोटी तक्रार पोलीस स्टेशनला देऊन तो संगणक चोरीचा विषय सदर मुख्याध्यापकांनी चार ते सहा महिन्यातच विषय बंद का करण्यात आला तरी यात मुख्याध्यापकांनी व काही शिक्षकांच्या संगनमताने सदर शाळेतील संगणक संच लंपास केले असावेत असा संशय असून त्याची चौकशी करण्यात यावी.४) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मध्ये इयत्ता पाचवी सहावी सातवी च्या मुलींना शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते या योजनेच्या यादीत शाळाबाह्य व अपरिचित मुलींची नावे नोंद घेण्यात आले आहेत याची चौकशी करण्यात यावी ५) सर्विस बुक,दीर्घ रजा बुक व शिक्षक हजेरी बुक यामध्ये मोठी तफावत असून त्याची चौकशी करण्यात यावी.६) सदर मुख्याध्यापकाने शाळेतील अंदाजे दोन टेम्पो रद्दी विक्री केली असून त्याची चौकशी करावी या मुख्याध्यापकाने शिक्षक हजेरी बुक वर ओव्हर राईटिंग केलेले असून ( पं.स.मुखेड,जि.प.नांदेड) असे आपल्या मर्जीतील शिक्षकांच्या नावापुढे लिहिण्यात आले असून याची चौकशी करावी. ७)शिक्षकांच्या व मुख्याध्यापकाच्या घेतलेल्या अर्जित रजा व सेवा पुस्तिका यांची चौकशी करण्यात यावी ८) कोरोना काळात शाळेसाठी आलेला निधी किती व कुठे गेला कोणते साहित्य खरेदी केले ना मास्क ना सॅनीटायजर चौकशी करावी, ९) सदर मुख्याध्यापक भैरवाड व शिक्षक चव्हाण पदवीधर विषय शिक्षक असताना बदलीचा ऑनलाइन फॉर्म भरत नाहीत याची चौकशी करा. १०) या शाळेतील शौचालयाचे दारे बंद असून त्यामध्ये व सभोवताली घान साचलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मुलींना लघवीसाठी साठी शौचास जाण्यास शाळेत कुठलीच सोय नाही. काही शिक्षक व शिक्षिका शाळेला कधी येतात आणि कधी निघून जातात याचा काही नेम नाही शालेय व्यवस्थापन समितीची नेमणूक का घेण्यात आली नाही.मासिक बैठकीत शिक्षकांना धमकावतात व माझ्या दोषी चुका सांगाल तर तुमचे वाटोळं करील असे म्हणत सर्व शिक्षकांना तुमच्या सर्वांच्या खोट्या माझ्या हातात आहेत असे म्हणतात याची चौकशी करावी.

मुख्याध्यापक वा डी भैरवाड यांची दैनंदिन दिरंगाई व दररोज कधी या कारणामुळे तर कधी त्या कारणामुळे अशा विविध बहाण्याने स्वतः गैर हजर राहतात त्यामुळे सद्यस्थितीत शिक्षक व विद्यार्थी यांच्यावर कसल्याच प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही कोणता शिक्षक कधी येतो आणि कधी निघून जातो याचा काही नेम राहिलेला नाही काही शिक्षक व शिक्षिका शाळा सुटायच्या अगोदर निघून जातात .शाळेतील शिक्षकांची हजेरी पट व त्यांनी घेतलेल्या दीर्घ रजे मध्ये मोठी तफावत आणि ताळमेळ लागत नाही.सदर मुख्याध्यापक वाय.डी.बहिरवाड हे क्रीडा शिक्षक आहेत त्यांनी कोणतेही ग्राउंड आखले नाहीत आणि ग्राउंड आखून विद्यार्थ्यांना विविध प्रकारची खेळे खेळविलेली नाहीत संबंधित मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक असून त्या शिक्षका ची गणना नवीन शासन निर्णयानुसार विषय शिक्षकांमध्ये करण्यात आली आहे असे समजते त्यामुळे ते मुख्याध्यापक पदावर राहू शकतात का असा प्रश्न पडतो मुख्याध्यापक भैरवाड हे शाळेचे प्रत्येक प्रशासकीय काम करण्याऐवजी जिल्हा परिषद कडून मार्गदर्शन घेण्याच्या नावाखाली दिवसेंदिवस शाळेतून गायब आहेत त्यामुळे प्रशालेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

लाचखोर कार्यालय अधीक्षक दिड लाखाची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले एसीबीच्या जाळ्यात

 


जळगाव : एरंडोल नगरपालिका संकुलातील मुदत संपलेल्या गाळे नोटीस न काढता लिलावात ताब्यात द्यावे यासाठी दीड लाख रूपयांची लाख घेणाऱ्या कर निर्धारण व प्रशासकीय विभागातील कार्यालय अधीक्षकाला धुळे लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. एरंडोल पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या नगरपालिका दुकान संकुलातील करार संपल्याने सील केलेले गाळे लिलावामध्ये ताब्यात देवून तसेच तक्रार यांच्या इतर गाळ्यांना नोटीस न देण्यासाठी कर निर्धारण व प्रशासकीय विभागातील कार्यालय अधिक्षक संजय दगडू ढमाळ (वय-५१) रा. म्हाडा कॉलनी अमळनेर यांनी दोन लाख रूपयांची लाचेची मागणी केली होती. 

तडजोडीअंती दीड लाख रूपये देण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार 12 रोजी लाचलुचपत विभागाने दुपारी सापळा रचून संशयित आरोपी संजय ढमाळ यांनी दीड लाख रूपये स्विकारतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी रात्री  एरंडोल पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई धुळे एसीबी उपअधिक्षक सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर सोनवणे, संतोष हिरे , कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, राजन कदम,सुधीर मोरे यांनी केली.

www.acbmaharashtra.gov.in

Toll free : 1064

#tag : bribe


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

नायगाव पंचायत समितीत पुनश्च येरे माझ्या मागल्या...! बिडीओच्या दालनासह अनेक विभाग वेळ संपण्याअधिच कुलूपबंद!

 


नायगाव (बा) : येथील बहुचर्चित पंचायत समितीमधील संवर्गनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गटविकास अधिकारी पि.पि.फाजेवाड यांचाही कोणताच वचक राहिला नसून त्यांच्या दालनासह बहुतांश विभाग दि.१० मार्च रोजी कार्यालयीन वेळ संपण्याआधीच कुलूपबंद असल्याचे तर, अनेकांच्या खुर्च्या रिकाम्याच दिसून आल्याने येरे माझ्या मागल्या या उक्तीनुसार येथे परिस्थिती जैसै थे असल्याने स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

    सविस्तर वृत्त असे की,गत काही वर्षांपासून येथिल पंचायत समितीमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह अधिकारीवर्गाच्या तकलादू भूमिकेतून स्थानिक कार्यालयासह गांव पातळीवरील बहुतांश कर्मचारी हम करे सो कायदा ! म्हणीत कर्तव्य बजावत आहेत अनेकांना मुख्यालयाचे वावडे असून त्यात गटविकास अधिकारी पि.पि.फाजेवाड व त्यांचे सर्वच संवर्गातील कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी अग्रक्रमी आहेत काहीजण गटा-गटाने स्वतःच्या चारचाकीतून थेट नांदेडहून ये-जा करीत असल्याने त्यांची कर्तव्यतत्परता त्यांच्याच मर्जीवरच अवलंबून आहे तोच कित्ता गावपातळीवरील अनेक ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून गिरविला जात आहे त्यामुळेच पंचायत समितीत असो वा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत संबधित अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य जनतेला त्यांच्या कामांसाठी कार्यालयात व वेळेत मिळेलच याबाबतीतील शाश्वतीच राहिलेली नाही. याबाबतीत गत वार्षिक सर्वसाधारण आमसभेत स्थानिक आ.राजेश पवार यांनीही चांगलीच झाडाझडती घेत संबंधितांना समक्ष निर्देश दिले होते त्याचबरोबर,जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती संजय बेळगे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनेकदा पाहणी,तपासणीत दांडीबहाद्दरांवर कडक कारवाईचे स्पष्ट आदेश मिळाल्यानंतरही केवळ नोटीसा बजावण्यात धन्यता मानून स्थानिक पातळीवर दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यात आलेली नसल्याने परिस्थितीत अद्याप बदल नाही.

   महत्त्वाचे म्हणजे कांही महिन्यांपूर्वी गटविकास अधिकारी म्हणून पि.पि.फाजेवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना 'काही' प्रसंगांना सामोरे जावे लागल्याने त्यांचेकडून परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता होती मात्र ती जणू धुसर बनली असून त्यांचा गावपातळीवरील दूरच पण स्थानिक कार्यालयातच वचक नसल्याचा प्रत्यय पून्हा एकदा दि.१० मार्च रोजी दुपारनंतर पहाणीत दिसून आला.त्यामुळे कामासाठी आलेल्या अनेकजणांना माघारी परतावे लागले.

विशेष बाब म्हणजे गटविकास अधिकारी यांच्या दालनासह लेखा,घरकुल व अन्य महत्वपूर्ण विभाग कार्यालयीन वेळ संपण्याआधीच चक्क कुलूपबंद होते तर,तब्बल ४२ अधिकारी- कर्मचारी असलेल्या या कार्यालयात केवळ बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी उपस्थित होते.परंतू,सक्षम असा एकही अधिकारी यावेळी उपस्थित नव्हते.गटविकास अधिकारी यांच्याकडे कामानिमित्त आल्यानंतर ते अनुपस्थित असल्याने त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतर त्यांनी आपण नांदेड येथे असून कार्यालय सुरुच असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना परिस्थितीची जाणीव करून देत पुराव्यासह माहिती दिल्याने नरमते घेत त्यांनी सहाय्यक प्रशासन अधिकारी टोंपे यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी उद्या सुट्टी असल्याने काहीजण लवकर गेल्याचे अफलातून उत्तर दिले.

  दरम्यान गटविकास अधिकाऱ्यांकडून दांडीबहाद्दरांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आलेले असले तरीही त्यांची 'कामानिमित्त' व सहा.गटविकास अधिकारी एम.एन.केंद्रे,कार्यालयीन अधीक्षक बासरकर व अनेकांची पून्हा अनुपस्थिती आढळून आल्याने त्यांचेसह संबंधितांवर कडक कारवाई होणे अत्यावश्यक असल्याने याबाबत नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष व तालुका प्रभारी लक्ष्मणराव भवरे यांनी या प्रकरणात दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली असून याबाबत लवकरच वरिष्ठ स्तरावर पुराव्यासह तक्रार करणार असल्याचे सांगितले.


 मुकाअ श्रीमती ठाकूर यांच्याकडून केवळ फार्स.. ?

   महत्वाची बाब म्हणजे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्रीमती वर्षा ठाकूर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कासारखेडा व मालेगाव येथे तपासणीत आरोग्य विभागातील कांही कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली होती तर,जिल्हा परिषदेतील दांडीबहाद्दरांनाही नोटीसा दिल्या होत्या त्याचबरोबर,जिल्ह्यात अनेक कार्यालयांना भेटी देऊन दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले होते.माञ प्रत्यक्षात ठोस कारवाई नसल्याने त्यांच्या दोषींविरुद्धच्या कारवाया व दौरे जणू फार्सच असल्याचे स्पष्ट दिसून येत असून कार्यालयीन वेळेपूर्वीच चक्क एखाद्या पंचायत समितीमधील कांही विभाग कुलूपबंद असतील तर,त्यांचा वचक कसा आहे यास यावरून पुष्टी मिळते.त्यामुळे त्यांनीच स्वतः दांडीबहाद्दर व मनमानी अधिकारी- कर्मचारी यांची झाडाझडती घेऊन कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

www.zpnanded.in   www.maharashtra.gov.in




✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

आता ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला उपस्थित राहण्यापासून कुणी नकार देऊ शकत नाही

 

      पालघर : ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना सर्वसामान्य ग्रामस्थांना बसता यावे यासाठी चिंचणीमधील नीलेश बाबरेसह अन्य ग्रामस्थांनी मंत्रालयीन पातळीपर्यंत नेलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना आता यापुढे मासिक सभेत उपस्थित राहण्यास कोणी कुठलीही आडकाठी करू नये, याबाबत उचित कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे हा आदेश राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना लागू होणार आहे.ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा म्हणून राज्य शासनाने १९ सप्टेंबर १९७८ रोजी काढलेल्या शासकीय परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या मासिक सभांमध्ये सर्वसामान्य ग्रामस्थांना उपस्थित राहता यावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना सूचना प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या परिपत्रकानुसार बाबरे आणि ग्रामस्थांनी चिंचणी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत उपस्थित राहण्याबाबत विरोध होऊ लागल्याने ४ जानेवारी २०१३ पासून याविरोधात लढा उभारला. त्यांना निवृत्त मुख्याध्यापक हरेश्वर आंभिरेंसह काही ग्रामस्थांची साथ मिळाली. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली असली तरी त्यांनी हिंमत न हरता आपला लढा सुरूच ठेवला. पालघर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी १६ एप्रिल २०१९ मध्ये ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांना बसण्याचे आदेश दिले, परंतु त्या आदेशाला न जुमानता ग्रामपंचायत सदस्यांनी याविरोधात एकमताने ठराव करीत ग्रामस्थांना बसण्यास मज्जाव केला होता. शेवटी ग्रामस्थांनी विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेतली असता त्यांनी ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यांनी १ मार्च रोजी पाठविलेल्या पत्रात ग्रामपंचायतीच्या सभेबाबत महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. पीआरसी १०७७/ २७०३/ सीआर (२७३२) दि. ११/९/१९७८ व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील मुंबई ग्रामपंचायत (सभा) बाबत नियम १९५९ (क. १७६ (२) खंड (७) मधील नियम १ टीप १ मधील ग्रामसभांना उपस्थित राहण्याबाबत तरतुदी या स्वयंस्पष्ट आहेत, असे महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाचे कार्यासन अधिकारी सुहास जाधवर यांनी कळविले. त्यामुळे आता सर्व ग्रामपंचायतींमधील ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांना आता उपस्थित राहता येणार असून, भ्रष्टाचाराचे प्रमाण घटण्यास मदत होणार आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९
ग्रामपंचायत मासिक सभेला ग्रामस्थांच्या उपस्थिती बाबत




#tag : ग्रामपंचायत मासिक सभा

✍️✍️✍️संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर7767912933बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कराopen this link in a new windowwww.nandednewsupdate.blogspot.com