गुरुवार, मार्च ११, २०२१

सेवानिवृत्तदाराचे GIS प्रकरण : जिल्हा कोषागार कार्यालयातील लालची उप लेखापाल सुंदर निघाला लाचखोर,१,००० ची लाच स्वीकारताना लाचखोराला एसीबी(ला.प्र.वि) पथकाने रंगेहाथ पकडले

 


:: प्रेस नोट :: क्रमांक १३७२

दिनांक :- 10.03.2021.

जिल्हा कोषागार कार्यालय, जालना येथील उपलेखापाल श्री. सुंदरराव पुंजाजी वाहुळकर यांना 1,000/- रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालनाच्या पथकाने पकडले.

  1. आरोपीचे नाव,हुद्दा व पत्ता - लोकसेवक श्री. सुंदरराव पुंजाजी वाहुळकर, वय 50 वर्ष व्यवसाय नोकरी, उप लेखापाल जिल्हा कोषागार कार्यालय, जालना रा. समर्थ एसटीडीजवळ, जमुनानगर जालना मुळ रा. कोडी कारला ता.जि. जालना (वर्ग - 3 )
  2. गुन्हा घ ता व ठि - दि-10.03.2021 रोजी अंबड चौफुली वर जालना येथे
  3. लाचेची रक्कम - 1,000/- रुपये.


याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली की, त्यांचे वडील जुलै 2020 मध्ये जिल्हा परीषद जालना येथुन सेवानिवृत्त झाले असुन, त्यांनी मागील सात महिन्यांपूर्वी जिल्हा कोषागार कार्यालय, जालना येथे वडीलांचे सेवानिवृत्ती नंतर मिळणारे गट विमा योजनेचे (GIS) रक्कम 37,281/- रुपये मंजुर करुन देण्यासाठी अर्ज दिला होता, सदरचे अर्जावरुन त्यांचे वडीलांचे गट विमा योजनेचे (GIS) रक्कम 37,281/- रुपये मंजुर करुन देण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयातील उपलेखापाल श्री. सुंदरराव वाहुळकर यांनी तक्रारदार यांचेकडे 1,000/- रूपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदारास उपलेखापाल श्री. सुंदरराव वाहुळकर यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली.


सदर तक्रारीवरून दि. 10.03.2021 रोजी पडताळणी केली असता उपलेखापाल श्री. सुंदरराव वाहुळकर यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे वडीलांचे गट विमा योजनेचे (GIS) रक्कम 37,281/- रुपये मंजूर करुन सदर रकमेचा धनादेश देण्यासाठी 1,000/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पण्ण झाले. तसेच आज दि. 10.03.2021 रोजी आलोसे उपलेखापाल श्री. सुंदरराव वाहुळकर यांनी तक्रारदार यांचेकडुन त्यांचे वडीलांचे गट विमा योजनेचे (GIS) रक्कम 37,281/- रुपये मंजूर करुन सदर रकमेचा धनादेश देण्यासाठी 1,000/- रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्थिकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाचे पथकाने लक्की ज्युस सेंटर, नुतन वसाहत रोडवर अंबड चौफुलीजवळ, जालना येथे रंगेहाथ पकडले.


लोकसेवक श्री. सुंदरराव पुंजाजी वाहुळकर, वय 50 वर्ष व्यवसाय नोकरी, उप लेखापाल जिल्हा कोषागार कार्यालय, जालना रा. समर्थ एसटीडीजवळ, जमुनानगर जालना मुळ रा. कोडी कारला ता.जि. जालना (वर्ग - 3 ) यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालू आहे.


तसेच अॅन्टी करप्शन ब्युरो कडून आवाहन करण्यात येते की, कोणी लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास 02482 220252, तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं. 8975762906, पोलीस निरीक्षक मो.नं. 8390757835, 9823216788 वर संपर्क करावा.

www.acbmaharashtra.gov.in

पोलीस उप अधिक्षक,

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जालना.



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

गुरुद्वारा नगीनाघाट येथे जत्थेदार संत बाबा संतोकसिंघ यांचा खून

 


नांदेड-महाशिवरात्रीची पहाट नांदेड शहरात एका संतांच्या खूनामुळे निराशाजनक ठरली. गुरूद्वारा नगीनाघाट साहिबच्या मागे असलेल्या एका गुरूद्वाऱ्यातील जत्थेदारजींचा खून रात्री 2.30 ते 3 या वेळेत घडला आहे.

मारेकरी मोटारसायकलवर फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.आज महाशिवरात्र पर्व आहे. आजचा सूर्योदय होण्याअगोदरच गुरूद्वारा लंगरसाहिबच्या पाठीमागे जत्थेदार संत बाबा संतोकसिंघ मोहनसिंघ नहेंग यांचा गुरूद्वारा आहे. पहाटे 3 वाजेच्यासुमारास गुरूद्वाऱ्यातील सेवक गुरमितसिंघ उर्फ बादल देवेंद्रसिंघ महाजन यांनी संत बाबा संतोकसिंघ यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला. याबाबतची माहिती पोलीसांना दिल्यानंतर अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, वजिराबादचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ शिंदे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. संत बाबा संतोकसिंघ यांच्या पाठीवर, मानेवर तलवारीने मारण्यात आले होते आणि त्यांचा मृतदेह तेथेच पडलेला होता.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

पोलीस निरीक्षक ठरले देवदूत, अपघात झालेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण

 
नांदेेड : दिनांक ९ मार्च रोजी दुपारी 2 च्या सुमारास वसमत फाटा येथे मुनिर धाब्यासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने ऐका मोटर सायकलस्वारास धडक दिली ज्यात मोटार सायकल स्वार व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारासाठी नेण्यासाठी स्वतः पोलिस निरीक्षक केंद्रे यांनी उचलून ऍबूलन्समध्ये टाकले. या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

वसमत फाटा येथे ट्रक क्र आरजे 11जीबी 2127 हे वाहन नांदेड ते नागपूरकडे जात असतेवेळी अर्धापुर ते नांदेडकडे मोटर सायकलवर जाणारे माधव नरशींगराव चिकाळकर (42) यांना ट्रकने जबर धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी महामार्ग पोनी अरुण केंद्रे साहेब यांनी तत्काळ त्यांना स्वतः उचलून महामार्ग च्या रूग्णवाहिकेत टाकून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. 

यावेळी त्यांना चालक शिंदे, डुकरे, माणिकपेठे, गजानन कदम, ज्ञानेश्वर तिडके, केंद्रे, कल्याणकर यांनी मदत केली. पोलिस निरीक्षक श्री केंद्रे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

http://www.mahapolice.gov.in/

https://www.indiacustomercare.com/maharastra-police-contacts

https://trafficpolicemumbai.maharashtra.gov.in/dos-and-donts-2/

https://trafficpolicemumbai.maharashtra.gov.in/senior-officer-contacts/

http://trafficpolicemumbai.maharashtra.gov.in/wp-content/uploads/2021/02/Traffic-Division.pdf

https://images.mahatrafficechallan.gov.in/AddTrafficGuide.htm

https://images.mahatrafficechallan.gov.in/PublicNotice.htm

https://trafficpolicemumbai.maharashtra.gov.in/mtp-helpline/

https://www.crossroadshelpline.com/

https://ihmcl.com/fastag/

https://indianhelpline.com/HIGHWAY-NUMBERS/

http://35.200.174.45:8080/stjohnassociationfirstaid/

http://www.feelsafefoundation.com/

https://www.thesafetynet.in/

https://www.nhp.gov.in/miscellaneous/first-aid

https://www.medindia.net/patients/firstaid.asp

https://www.thebetterindia.com/155315/first-aid-medical-emergencies-news/

https://www.sja.org.uk/get-advice/

https://indianhelpline.com/FIRST-AID-GUIDE/

https://indianhelpline.com/

https://indianhelpline.com/MAHARASHTRA/

https://echallan.parivahan.gov.in/index/accused-challan

https://mahatrafficechallan.gov.in/payechallan/PaymentService.htm?_qc=a858b1fc0c920de6d113aecce114759b

https://mahatrafficechallan.gov.in/payechallan/mobileToLink.htm?_qc=8ecc7a372a65082e4cbb7fd864b03d14


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

तहसिलदाराचे आदेश असताना फेरफार नोंद करण्यासाठी लाचखोर तलाठ्याने १० हजाराची लाच मागितल्याने एसीबी पथकाने गुन्हा दाखल करुन लाचखोरास ताब्यात घेतले

 

प्रेसनोट

०५/०३/२०२१

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/घटक - नागपूर
  2. गुन्हा नोंद क्रमांक व कलम - पोलीस स्टेशन सावनेर जि. नागपूर ग्रामिण येथे अप क्र. ११७/२०२१ कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद.
  3. आरोपीचे नाव व कार्यालय - नितीन प्रेमनाथजी निमजे, वय ४२ वर्षे, पद - तलाठी, मौजा तेलकामठी, ता. कळमेश्वर जि. नागपूर.
  4. मागणी केलेली लाचेची रक्कम - 
  5. विभाग - महसुल विभाग, वर्ग - ३
  6. लाच मागणी रक्कम - 10.000/-रू मागणी
  7. लाच स्विकारलेली रक्कम - 10.000/-रू मागणी
हकिकत - याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, यातील तक्रारदार हे म्हसाळा टोळी.म्हसाळा ता जि नागपूर येथील राहणारे असून ते शेतीचा व्यवसाय करतात. त्यांनी मौजे तेलगाव येथील शेतमालका कडून ८१ हेक्टर आर जमिन खरेदी केली आहे. सदर शेतीचे फेरफार नोंद करण्यासाठी सेतु कार्यालय, तहसिल कळमेश्वर येथे दि.०१/१०/२०२० रोजी आवश्यक कागदपत्रासह अर्ज केला होता त्याप्रमाणे शेतीचा फेरफार करण्यासाठी तक्रारदार हे मौजा तेलकामठी ता.कळमेश्वर जि. नागपूर येथील तलाठी कार्यालयात येथे जावुन तलाठी निमजे यांना भेटले असता, तक्रारदारास निमजे यानी फेरफार करुन देण्यासाठी १०.०००/- रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने त्याविरूध्द दि. ०५/०३/२०२१ रोजी पोलीस स्टेशन सावनेर जि. नागपुर ग्रामिण येथे भ्रषचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्ट्राचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क करावा.

SP ACB NAGPUR

LANDLINE NO 0712/2561520

TOLL NO 1064

Website: www.acbmaharashtra.gov.in

Mobile app: www.acbmaharashtra.net

Facebook page: www.facebook.com/MaharashtraACB

Whatsapp: 9930997700


(गोरख कुंभार)

 पोलीस निरीक्षक (वाचक) अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

गुन्ह्यामध्ये जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी लाचखोर सहायक फौजदार २० हजाराची लाच स्वीकारताना चतुर्भुज

 


प्रेसनोट

दिनांक ०८/०३/२०२१

शिर्षक :- लोकसेवक प्रल्हाद श्रीरंग पाटोळे, पद - सहा.फौजदार, नेमणूक-कोरेगाव पोलीस स्टेशन यांना २०,०००/- रूपये लाच स्विकारले प्रकरणी. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग - पुणे परिक्षेत्र, सातारा युनिट
  2. गुन्हा नोंद क्रमांक - कोरेगांव पो.स्टे. गु.र.नं.६५/२०२१
  3. कलम - भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे
  4. आरोपीचे नाव व कार्यालय - प्रल्हाद श्रीरंग पाटोळे, वय- ५२ वर्षे, पद - सहा,फौजदार, नेमणुक कोरेगांव पोलीस स्टेशन, रा.मु.पो. दरुज ता.खटाव जि.सातारा, वर्ग-३ पोलीस खाते
  5. मागणी केलेली लाचेची रक्कम - २०,०००/-
  6. स्विकारलेली लाचेची रक्कम - २०,०००/-

तक्रारदार यांचे भावाविरुद्ध कोरेगांव पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये व जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी यातील लोकसेवक पाटोळे यांनी २०,०००/- रुपयांची लाच रक्कम दि.०५/०३/२०२१ रोजी मागणी करुन ती लाच रक्कम दि.०६/०३/२०२१ रोजी स्विकारुन वैध परिश्रमिकाहुन अन्य पारितोषिक म्हणुन आर्थिक फायदा मिळविला म्हणून त्यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येतेकी, भ्रष्ट्राचारा संबधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,म.रा.शी संपर्क करावा.

संपर्क पत्ताः- पोलीस उपअरधीक्षक,अॅन्टी करण्शन व्युरो, सिटी सर्वे नं. ५२४, सदरबझार सातारा

संकेत स्थळ:www.acbmaharashtra.gov.in

ई-मेल:-acbwebmail@mahapolice.gov.in

ऑनलाईन तक्रार अँपः- www.acbmaharashtra.net

टोल फ्री क्रमांक:- १०६४

दूरध्वनी क्रमांक:- ०२१६२-२३८१३९

व्हॉटसअॅप क्रमांक :-७८७५३३३३३३


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

परिचारिका ४०० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

 


प्रेसनोट 

दि.०७/०३/२०२९

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग - मुंबई विभाग

गुन्हा नोंद क्रमांक - १२/२०२१

कलम - ७ भ्र.प्र.अधिनियम १९८८

आरोपीताचे नाव व कार्यालय - आरोपी - श्रीमती हेमलता दिलीप सोलंकी, वय ३३, पद - कामगार, सेंट जॉर्जस हॉस्पिटल, फोर्ट, मुंबई

मागणी केलेली लाचेची - रु. १.०००/-

स्विकारलेली लाचेची रक्कम - रु.४००/

फिर्यादी यांची पत्नी ही कोविड-१९ व इतर आजाराने आजारी असल्याने त्या सेंट जॉर्जस रुग्णालय, १ ला मजला, वार्ड क. ३ येथे दि. ०३/०३/२०२१ रोजी पासून आंतररुग्ण म्हणून दाखल असून त्यांना बेडवरुन संडास व लघवीला स्वतःहुन जाता येत नाही.

दिनांक ०७/०३/२०२१ रोजी फिर्यादी हे त्यांचे पत्नीस भेटावयास गेले असता आलोसे यांनी फिर्यादीस दि. ०३/०३/२०२१ रोजी पासून ते आतापर्यंत त्यांच्या पत्नीच्या केलेल्या सेवेच्या मोबदल्यात रु. १.०००/- लाचेची मागणी केली परंतू फिर्यादी यांची आलोसे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. ०७/०३/२०२१ रोजी ला.प्र.वि. कार्यालयाचे अधिकारी यांचेशी संपर्क साधून तकार दिली.

थोडक्यात माहिती - फिर्यादी यांनी दि. ०७/०३/२०२१ रोजी केलेल्या तक्रारची तात्काळ पडताळणी केली असता, आलोसे यांनी तडजोडअंती ठरल्याप्रमाणे रु. ४००/- इतकी रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. फिर्यादी यांनी आलोसे यांचे विरुध्द दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक मुंबई विभागाकडुन नमूद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(सतिश चिंचकर)

सहायक पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्ट्राचारा संबधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबददल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागाशी संपर्क साधावा.

संकेतस्थळ-www.acbmaharastra.gov.in

ईमेल- १) acbwebmail@mahapolice,gov.in

२)addicpacbmumbai@mahapolice.gov.in.

ऑनलाईन तक्रार अर्ज-www.acbmaharastra.net.

टोल फ्री. क्र. १०६४

दुरध्वनीक, ०२२ २४९२१२१२ फैक्स, क. ०२२२४९२२६१८. वहाटसअप क्र. ९९३०९९७७००



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

शिक्षणाचे धडे शिकविणारा शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचा लालची मुख्याध्यापक निघाला लाचखोर,क्रीडा शिक्षकाकडून २ हजार लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

 


प्रेसनोट

दिनाक-०९/०३/२०२१

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आंबेसरी, ता डहाणू जि.पालघर येथील मुख्याध्यापक यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे (कॅम्प पालघर) यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.

१) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/घटक - पालघर कॅम्प अॅन्टी करप्श व्युरो, ठाणे अंतर्गत.

२) गुन्हा नोंद कमांक - डहाणू पोलीस ठाणे

३) कलम - भ्रष्टाचार प्रतिबध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) चे कलम प्रमाणे

४) लोकसेवकाचे नाव व कार्यालय - आरोपी उत्तम हिंदुराव भोसले वय ५३ वर्षे मुख्याध्वयापक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, आंबेसरी, ता डहाणू. जि.पालघर वर्ग -२ ए/१०१, साईसंस्था हिल केस्ट, टेंबीपाडा रोड, भांडुप प. मुबई

५) मागितलेल्या लाचेची रक्कम २,०००/--रूपये 

६) स्विकारलेली लाचेची २,०००/- रुपये

यातील तकारदार हे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, आवेसरी, ता डहाणू, जि.पालघर येथे किडा शिक्षक असून आलोसे हे सदर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आहेत. तकारदार याचे पगारंबिल मंजूर करण्यासाठी आलोसे यानी ३,०००/ रूपये लाचेची मागणी केली म्हणून तकारदार यांनी दिनाक ०९/०३/२०२१ रोजी अंन्टी करप्शन ब्युरो ठाणे (कॅम्प पालघर) कार्यालयात तकार दिली आहे.

थोडक्यात हकीकत - तक्ररदार यांनी दिलेल्या तक्ररीचे अनुषंगाने दिनांक ०९/०३/२०२१ रोजी तक्ररदार याना आरोपी लोकसेवक यांचे कार्यालयात पंचासह पाठवून पड़ताळणी केली असता. आरोपी लोकसेवक यांनी तक्ररदार याचेकडे त्याचे कामाचे अनुपंणाने तडजोडी अंती २,०००/- रूपये लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम लागलीच दि.०९/०३/२०२१ रोजी १९.३० वा. च्या सुमारास शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आंबेसरी, ता डहाणू, जि पालघर येथे आलोसे यांच्या रूममध्ये स्विकारली असता नमूद आलोसे यांना अॅन्टी करप्शन व्युरो, ठाणे, (कॅम्प पालघर) कार्यालयाचे सापळा पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

पालघर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे (कॅम्प पालघर) यांचेशी संपर्क करावा.

संपर्क पत्ता - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे (कंम्प पालघर) पालघर प. ४०१ ४०४

संकेतस्थळ - www.acbmaharashtra@mahapolice.gov.in

ई-मेल - acbmaharashtra@mahapolice.gov.in

ऑनलाईन तक्रार - acbmaharashtra.net

टोल फ्री - 1064

दुरध्वनी व क्रमांक - 02525-297297

मोबाईल क्रमांक - -9850158810/ 9923699430



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

लाचखोर पोलीस शिपायाने गवंड्याकडून ८० रुमाचे अवैध बांधकाम केले म्हणून १ लाख लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले


प्रेसनोट -

दिनाक ०९/०३/२०२१

लागलचपत प्रतिबंधक विभाग - बृहन्मुंबई विभाग

 गुन्हा नोद क्रमाक- १३/२०२१

कलम - भ्रष्टाचार प्रतिवधक अधिनियम १९८८

आरोपोचे नाव व कार्यालय - गणेश गुलाबराव साळुंके, वय ३८ वर्षे, धंदा- पोलीस शिपाई क्र ०५०२८५,नेमणूक- मालवणी पोलीस ठाणे, मुबई

मागणी केलेली लाचेची रक्कम - रुपये १,००,०००/

स्विकारलेली लाचेची रक्कम - रुपये १,००,०००/

थोडक्यात माहिती - फिर्यादी है अबुजवाडी, मालवणी, मालाड (प) परिसरात गवंडी कम तसेच छोटे मोठे घर दुरुस्तीचे काम करतात. आरोपीत लोकसेवक यानी तक्रारदार याना बोलावून "तुम्ही ८० रुम अवैध बांधल्या आहेत तुमचे व तुमच्या मुलाचे पोलीस ठाण्यात नाव आले असून, तुम्हाला एमपीडीए लागेल" असे सागून त्या मोबदल्यात तक्रारदार यांना १,००,०००/- रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडीअती र ५०,०००/- लाच स्विकारण्याचे कबूल केले, त्यानंतर तक्ररदार यांनी भितीपोटी त्याच्यावर व त्याच्या मुलावर कारवाई न करण्यासाठी आरोपी लोकसेवक याना रुपये ३०,०००/- दिले.

उर्वरित रक्कम तक्ररदार  यांना लोकसेवक यानी दिनाक २०/०३/२०२१ रोजी घेवून येण्याबाबत सांगितले परंतु तक्रारदार यांना लोकसेवकास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुबई, वरळी मुबई येथे दिनाक ०८/०३/२०२१ रोजी लोकसेवका विरुद्ध लेखी तक्रर दिली.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनाक ०९/०३/२०२१ रोजोल्या पड़ताळणी दरम्यान लोकसेवक यानी रु १,००,০००/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याप्रमाणे लावण्यात आलेल्या सापळा कारवाईच्या वेळी लोकसेवक गणेश साळुके याना रुपये १,००,०००/- लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुबई विभागा तर्फे नागरीकाना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा सबधी काही माहिती असल्यास अगर लाय मागणाऱ्या लोकसेवका बदल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिवधक विभाग,बृहन्मुबई विभागाशी संपर्क साधावा.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहमुबई विभाग, ९१., सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुबई 

सकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in

acbwebmail@mahapolice.gov.in, 

(2) addicpactbmumbai@mahapolice.gov.in 

ऑनलाईन तक्रार ऑलीकेशन - www.acbmaharashtra.net

टोलफ्री क्र १०६४,

दूरध्वनी क्र ०२२-२४९२१२१२,

फक्स क्र ०२२-२४९२२६१८,

व्हॉट्स अप क्रमांक - ९९३०९९७७००


(आबासाहेब पाटील )

सहाय्यक पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बृहन्मुबई विभाग, मुबई

प्रेस नोट वर प्रिंट मिस्टेक १ लाखाच्या जागी १० लाख,५०हजाराच्या
जागी ५ लाख चूकिनेे पडले आहे 



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

१९ हजार लाच घेणारा लाचखोर पोलिस नाईक एसीबीचे डिव्हाईस घेऊन पळाला मग काय एसीबीने लाचखोर भगोड्या पोलीस नाईक वर भ्र.प्र.कायद्यासह ३९२,२०१,१८६ केले दाखल

 


जळगाव : धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या भा.द.वि. 420 च्या गुन्ह्याचे अनुकुल दोषारोपपत्र न्यायालयात रवाना करण्याकामी 19 हजार रुपयांच्या लाचेची मागणी पोलिस नाईकाला भोवली आहे. धरणगाव येथे कार्यरत असणा-या विलास बुधा नाईक असे लाच मागणा-या पोलिस नाईक कर्मचा-याचे नाव आहे.

धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील तक्रारदाराविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला भा.द.वि. 420 अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र अनुकुल पद्धतीने न्यायालयात पाठवण्याकामी पोलिस नाईक विलास बुधा नाईक यांनी तक्रारदाराकडे 19 हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान आपण एसीबीच्या जाळ्यात अडकत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस नाईक विलास नाईक यांनी तक्रारदाराकडील एसीबीचे डीव्हाईस हिसकावून घेतले. याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गु.र.नं. 119/21 नुसार भ्र.प्र.अ.-कलम-7 सह कलम-392, 201, 186 अन्वये आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे डिवायएसपी गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. निलेश लोधी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ. ईश्वर धनगर यांच्या पथकाने या सापळ्यात सहभाग घेतला.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com