सोमवार, मार्च ०८, २०२१

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी,शस्त्रबंदी आदेश लागू_अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांची माहिती

 

नांदेड दि. ८ मार्च) :- नांदेड जिल्ह्यात 8 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 22 मार्च, 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात सोमवार 8 मार्च 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 22 मार्च 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

महिला दिन विशेष : महिलांसाठी ठरली प्रेरणादायी समुह संसाधन आय सी आर पी- रेखाताई कांबळे

54 गटांना 1 कोटि 64 लाखांचे कर्ज दिले मिळवून देऊन केली चांदी

कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर,गरिबांना अन्य धान्य वाटप, रक्तदान शिबिर, सामाजिक कार्यात

महिला दिन विशेष

नायगाव,दि. ८ मार्च २०२१

 नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात तसेच त्यांच्यात घराचा उंबरठा ओलांडून काही तरी नवीन काम ,उधोग करण्याची प्रेरणा मिळावी त्याचप्रमाणे आजच्या युगात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना पासून सुरक्षा मिळवून त्यांना स्वयं सुरक्षेचे प्रशिक्षण मिळावे यासाठी येथील रमाबाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा व महिला दक्षता समितीच्या अध्यक्ष व समुह संसाधन व्यक्ती म्हणून कार्यरत आहेत .त्यांचा कार्याचा लाभ अनेक महिलांना मिळत आहे


कुंटूर तालुका नायगाव येथील रहिवासी असलेली महिला रेखाताई अनिल कांबळे कुंटूरकर ही महिला सासरी आल्यानंतर नववी पास होती तिने आपल्या जिद्दीने शिक्षण पुढे घेत दहावी अकरावी बारावी व बीएचे शिक्षण आज घेत आहे . तिने पहिला बचत गट स्थापन करून आज रोजी कुंटुर मध्ये 60 गटाची बांधणी केली व परिसरातील दहा खेड्यांमध्ये गटाची बांधणी करून त्यांना रोजगार मिळवून देऊन त्यांना उद्योगासाठी कर्ज ही देण्यात आले


त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन ग्रामीण भागातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन त्यांनी मेळावे भरून त्या मेळाव्यामध्ये भरीव योगदान करण्यात आले. व त्यांना विविध पुरस्कारही देऊन गौरविण्यात आले .तसेच महिलांना घर व मूल सांभाळून आपल्या परिवाराचा गाडा चालवण्यासाठी पैसे मिळावेत अशी तरतूद करून देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी मोलाचे सहकार्य करत आहेत      


आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा हा महिलांना एक प्रेरणादायी ठरू शकतो.पाच वर्षे खाली प्रथम रमाबाई आंबेडकर महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली .पहिला गट गावांमध्ये सुरुवात करण्यात करण्यात आले .त्यात त्यांनी सर्वप्रथम महिलांसाठी मेळावे घेतले त्यात महिलांना शारीरिक आरोग्य . स्वच्छता ची माहिती देण्यात आली


त्यांना प्रतिकूल परिस्थितीत होणाऱ्या घटना पासून संरक्षण करण्यासाठी माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना ग्रामीण भागातील महिलांना व स्त्रियांना आज तांत्रिक युगात अग्रेसर राहण्यासाठी डिजिटल मोबाईल चे संगणकाचे प्राथमिक ज्ञान यावर भर दिला. महिला आणि युवतींना मार्गदर्शन प्राथमिक शाळेमध्ये महिला सबलीकरण महिला बचत गट महिलावरील अत्याचार , आरोग्य मार्गदर्शन, रक्तदान शिबिर, हुंडा प्रतिबंधक मार्गदर्शन, विधवा , निराधार योजना श्रावणबाळ योजना लाभार्थी मदत, सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम सदा अग्रेसर ,त्याचबरोबर बचत गटांना गृह उद्योग व उद्योग प्रशिक्षण याबाबत सखोल मार्गदर्शन संस्थेकडून घेतले . आज घडीला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील पाचशे महिला ना प्रशिक्षण देत आहेत


ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय शेळी पालन, कुक्कुट पालन, हस्त कला, कीरान दुकान , पीठाची गिरणी, झाडु बनवने, मिर्ची पावडर व हळद, साडी सेंटर, जनरल स्टोअर, शिवन काम, घोंगडी यवसाय, असं अनेक यवसाय महिलांना रोजगाराच्या संधी रेखाताई कांबळे कुंटुर यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत


महिलांच्या अंगी अफाट संयमाचा बांध स्त्री संघर्षमय जीवनाच्या पटलावर मात्र कायम मागे राहत नाही .सृष्टीला नवजीवन देणारा सूर्य सुद्धा जसा परिवर्तनाच्या चक्रात सुटू शकला नाही अगदी तसेच महिलांनी पण त्या तेजस्वी सूर्यापासून प्रेरणा घेत प्रगतीचे नवनवे टप्पे पार केले कुुटुंब घर याच फेऱ्यात गुंतून स्वतःला न राहता विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी करून आज महिला बचत गटाला एक प्रकारची नवे वैभव देऊन बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालण्यासाठी बळकट करणार्‍या रेखाताई कांबळे यांनी सहज मदत केली आहे


त्यांना या क्षेत्रात आणून आज त्यांच्या पायावर उभे राहून ते स्वतः कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करतात . असे प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण बनवण्यात मोलाचे कार्य केले आहेत. त्यांना तालुका व जिल्हा स्तरावर विविध पुरस्कार पटकावले आहेत , राजमाता जिजाऊ स्वावलंबन उत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यशोदा माता महिला व बालकल्याण समितीच्या पुरस्कार, देण्यात आले.


रुळलेल्या वाटेवरून चालताना कुणालाही सहज शक्य होते मात्र स्वतःची एक वेगळी वाट तयार करून ते लक्ष गाठणे हे एखाद्या क्रांतीच लक्षन आसुशकते . विविध रोजगारातून रोजगाराच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचा लढा उभारावा हीच प्रेरणा घेऊन कार्य करीत आहेत.

http://WWW.msrlm.gov.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com