बुधवार, मार्च ०३, २०२१

वाहतुक पोलीस अमलदाराचे थकित पगार काढण्यासाठी ६० हजाराची लाच स्वीकारताना वरिष्ठ लिपिक नडे एसीबीच्या जाळ्यात

 


-: प्रेस नोट :-

दि. ०२/०३/२०२१

यातील फिर्यादी हे पोलीस वाहतुक विभागात अंमलदार असुन त्यांचे दहा महिन्याचे थकीत वेतनाची मंजुर झालेली रक्कम फिर्यादीस देण्यात आली होती, त्यांचा मोबदला म्हणुन यातील आरोपीताने फिर्यादीकडे रु.१,००,०००/- रक्कमेची मागणी करुन तडजोडीअंती रु.६०,०००/- लाचेची रक्कम स्विकारली म्हणुन गुन्हा नोंद.

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : मुंबई विभाग
  2. गुन्हा नोंद क्रमांक : ९/२०२१
  3. आरोपीताचे नाव व कार्यालय : सचिन आत्माराम नडे हिं. ४१ वर्षे वरिष्ठ लिपीक (रजा कक्ष), मुंबई वाहतुक मुख्यालय,सरपोचखानवाला रोड, वरळी, मुंबई.
  4. मागणी केलेली लाचेची रक्कम : रु.१,००,०००/_
  5. स्विकारलेली लाचेची रक्कम : रु.६०,०००/_

थोडक्यात माहिती : फिर्यादी हे वाहतुक विभाग येथे पोलीस अमलदार असुन त्यांना गंभीर आजार झाला असल्याने ते ४७६ दिवस वैद्यकिय रजेवर होते. फिर्यादी यांचे सदर वैद्यकीय कालावधी मधील १० महिन्याचे वेतन रोखण्यात आले होते. सदर वेतन पारित करण्याकरीता आरोपीत लोकसेवकाने फियादीकडे रू. १.००.०००/- इतकी लाचेची रक्कम मागणी केली होती. सदर १० महिन्याचे वेतन पारित केल्यानंतर केलेल्या कामाचा मोबदला म्हणुन मागणी केलेली रक्कम रू.१.००,०००/- देण्यास यातील फिर्यादीस विलंब झाला. म्हणुन यातील आरोपीत लोकसेवकाने फिर्यादीचे सेवापुस्तक आरोपी लोकसेवकाच्या ताब्यात असून फिर्यादीने लाचेची रक्कम न दिल्यास त्यांना अदा करण्यात आलेल्या वेतनाची संपुर्ण वसुली करण्यात येईल अशी भिती फिर्यादीस दाखवली.

फिर्यादीस आरोपीत लोकसेवकास लाच दयावयाची नसल्याने फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी मुंबई येथे दि. ०२/३/ २०२१ रोजी प्रत्यक्ष येवून लेखी तक्रार दिली.

दि.०२/०३/२०२१ रोजी फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन पडताळणी केली असता यातील आरोपीत लोकसेवकाने फिर्यादी यांना पारित केलेल्या १० महिन्याचे थकित बेतनाचा मोबदला म्हणून रु.७०,०००/- इतक्या रक्कमेची मागणी करून तडजोडी अंती रू. ६०.०००/- रक्कमेची लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरुन आज दि. ०२/०३/२०२१ रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपीत लोकसेवकाने रु. ६०.०००/- लाचेची रक्कम फिर्यादीकडून स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.


( अलका स. देशमुख) 

सहायक पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संवधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकावददल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागाशी संपर्क साधावा.

संपर्क- लाचलुवपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग ९१. सरपोचखानवाला रोड, वरळी, मुंबई ३०

संकेतस्थळ-www.acbmaharastra.gov.in

ईमेल-१)Vacbwebmail@mahapolice.gov.in 

२)addicpacbmumbai@mahapolice.gov.in.

ऑनलाईन तकार अर्ज-www.acbmaharastra.net.

टोल फ्री.क्र.१०६४

दुरध्वनीक. ०२२ २४९२१२१२ 

फैक्स. क्र. ०२२२४९२२६१८ 

व्हॉटसअप क्र. ९९३०९९७७००



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

विरुद्ध सापळा अहवाल : पोलीस उप निरीक्षक शैलेश जोगदंड यांना लाच देणारा वाळू ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात

 लाच देणे आणि घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे

विरुद्ध सापळा कारवाई

औरंगाबाद (०२ मार्च) : वाळूचे अवैद्य दोन टेम्पो चालवू देण्यासाठी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षकाला इच्छा नसताना २५ हजारांची लाच देणाऱ्या वाळू ठेकेदाराला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी साडे चारच्या सुमारास करण्यात आली. गोकुळ बाळासाहेब सूर्यवंशी (४०, रा.बळेगाव, ता.वैजापूर) असे अटकेतील वाळू ठेकेदाराचे नाव आहे.

पोलीस उपनिरीक्षक शैलेश उद्धवराव जोगदंड हे देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गोकुळ सूर्यवंशी हा वाळूची ठेकेदारी करतो. त्याने त्याचे दोन टेम्पो सुरू करण्यासाठी उपनिरीक्षक जोगदंड यांना इच्छा नसताना एका टेम्पोचा हप्ता म्हणून २५ हजारांची लाच देऊ केली.

मात्र, जोगदंड यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी सापळा लावून सूर्यवंशी याला रंगेहात पकडले.

औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात एकीकडे देवगाव रंगारी येथे कार्यरत असलेले पोउपनिरीक्षक शैलेश जोगदंड याने लाच देणाऱ्याला एसीबी च्या हवाली केले तर दुसरीकडे पिशोर पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेले रणजित गंगाधर कासले यांनी तक्रारदाराकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदरणीय सर,जय हिंद

➡️विरुद्ध सापळा अहवाल 

▶️ युनिट- जालना

▶️ तक्रारदार- शैलेश उद्धवराव जोगदंड वय 38

पोलीस उप निरीक्षक, पो.स्टे.देवगाव (रंगारी)जि. औरंगाबाद ग्रामीण

▶️ आरोपी खाजगी इसम :- श्री.गोकुळ पिता बाळासाहेब सूर्यवंशी, वय 40 वर्षे धंदा- वाळू वाहतूक रा.बळेगाव,ता.वैजापूर जिल्हा औरंगाबाद.

▶️ देउ केलेली लाचेची रक्कम- 25,000/- रूपये

▶️ लाच दिली -25,000/- रुपये

▶️ लाच दिलेली ता.

   दिनांक 02.03.2021 रोजी 16.30 वाजता                              

▶️ कारण - तक्रारदार हे पो.स्टे.देवगाव रंगारी येथे नेमणुकीस असून त्यांची लाच घेण्याची इच्छा नसताना यातील आरोपी याने त्याचे दोन टेम्पो अवैद्य वाळू वाहतुकीवर चालवू देण्यासाठी एका टेम्पोचा हफ्ता म्हणून 25000/-रुपये लाच दिली असताना पंचाचे समक्ष सापळा पथकाने आरोपीस पकडले.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.

 ▶️ सापळा अधिकारी, श्री.एस.एस.शेख,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.जालना.

▶️मार्गदर्शक-मा.डॉ राहुल खाडे,पोलीस अधीक्षक, मा.डाॅ.अनिता जमादार,

अपर पोलीस अधीक्षक, आर. डी. निकाळजे, पो उप अधिक्षक, ला प्र वि जालना 

➡️सापळा पथक - पो. कॉ.गणेश चेके,गजानन कांबळे,शेख जावेद,प्रवीण खंदारे,ला. प्र. वि. जालना.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com