सोमवार, फेब्रुवारी २२, २०२१

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस ५० हजार घेताना लाचलुचपतचा छापा_लाचखोराला पकडले रंगेहाथ

 ब्रेकिंग ! पिंपरी-चिंचवड : पोलीस कर्मचारी पन्नास हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात



पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकत 50 हजार रुपयांची लाच घेताना एका कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले आहे काही वेळापूर्वी ही कारवाई झाली आहे.

सचिन जाधव असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सचिन जाधव हे वाकड पोलिस ठाण्यात कर्तव्य आहेत दरम्यान यातील तक्रार याच्यावर 498 चा गुन्हा दाखल आहे यात मदत करण्यासाठी लोकसेवक सचिन यांनी 75 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती त्यानंतर तक्रारदार यांनी पुणे एसीबी कडे तक्रार केली होती त्यानुसार या लाचेची पडताळणी केली त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार आज तडजोडी अंती 50 हजार रुपयांची लाच घेताना जाधव यांना एसीबीने रंगेहात पकडला आहे.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकावर सपंर्क साधण्याबाबतचे आवाहन श्री. राजेश बनसोडे, पोलीसउप-आयुक्त/पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.

हेल्पलाईन टोल फ्रीक्रमांक १०६४

अॅन्टीकरप्शन ब्युरो, पुणे -दुरध्वनी क्रमांक - ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३

व्हॉट्स-ऑप क्रमांक पुणे - ७८७५३३३३३३

व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई- ९९३०९९७७

ई-मेलआयडी- पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in

फेसबुकपेज- www.facebook.com-maharashtraACB

वेबसाईट- www.acbmaharashtra.gov.in

*Respected sir*

*Trap Case Report:*

➡ घटक :- पुणे,

➡ तक्रारदार :- पुरुष 33 वर्षे

➡ आरोपी:- लोकसेवक - सचिन कुबेर जाधव, पो.नाईक -1008, वय-37, नेमणुक वाकड पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय.

▶पडताळणी दिनांक :- 22/01/2021 

➡️ लाचेची मागणी ः- 200000/-

➡️लाच स्वीकारली ःः- 50,000/- 

➡️ सापळा दिनांक :- 22/01/2021

➡ हकीकत :- यातील तक्रारदार व त्यांचे कुटुंबियांचे विरुद्ध वाकड पोलीस ठाणे येथे भा.द.वि.स. कलम 498(अ) प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. 

अटकेची प्रक्रिया करून जामिनावर सोडण्यासाठी व दोषारोप लवकर पाठविण्यासाठी प्रथम - 200000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 100000 / - स्वीकारण्याचे मान्य करून 50,000/- रुपये लाच स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले आहे.

➡ सापळा पथक : -अलका सरग - पोलीस निरीक्षक,सुनील बिले- पोलीस निरीक्षक,पो. शिपाई गणेश भापकर,पो. शिपाई रतेश थरकार,

➡मार्गदर्शन अधिकारी :- श्री राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.पुणे परिक्षेत्र. 

श्री. सुरज गुरव,अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.पुणे.

श्री सुहास नाडगौडा,अपर पोलीस अधीक्षक ला प्र वि पुणे.


👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

शुभ मंगल सावधान-पटलं तर टिकलं,नाहीतर फेकलं !

 


        विवाह म्हणजे डीजे डॉल्बीवरचा धिंगाणा आणि मौज मस्ती नाही, तर व्रतस्थ जीवनाचा तो एक शपथविधी आहे. आज या शपथविधीला समाज विसरायला लागलेला आहे आणि विवाहाचे स्वरूप म्हणजे पैशाची उधळपट्टी आणि एक जंगी पार्टी असे झालेले आहे. त्यामुळे उच्चकोटीच्या संस्कृतीने ठरविलेला, त्याच्या पाठीमागे असलेला उदात्त हेतूच गायब झालेला आहे.

     पटलं तर टिकलं, नाहीतर फेकलं !

     असे आज बहुतांशी तरुणांचे वैवाहिक जीवन झालेले आहे. आज लग्न होणाऱ्या तरुणांइतकीच घटस्फोटित तरुणांची संख्या आहे. घटस्फोट घेतलेल्या तरुणाला किंवा तरुणींना पूर्वी इतके चांगले स्थळ कधीच मिळत नाही. 

     ज्या गोष्टीवरून आपला वाद झाला, त्याच्यापेक्षा भयानक तडजोडी त्यांना जीवनात कराव्या लागत आहेत. आई-वडिलांनी लेकरांचे कल्याण व्हावे म्हणून आयुष्यभर जपलेल्या आणि स्वतःच्या इच्छा, अपेक्षा मारून जमविलेल्या संपत्तीचे मूल्य, घटस्फोट झाल्यानंतर मातीमोल होते. मुलांची आणि मुलींची काळजी करून आई-वडिलांना जो मनःस्ताप होतो, त्यामुळे जडलेल्या व्याधी आणि खचलेले मन, यामुळे त्यांचे आयुष्य निश्चित कमी होते.

       आपण आई वडिलांना सुख नाही देऊ शकलो तरी हरकत नाही, पण किमान आपल्यामुळे त्यांना दुःख तरी होऊ नये, एवढे तरी काळजी पोटच्या मुलांनी घ्यायला हवी.

       विवाहा सारख्या मंगल आणि पवित्र कार्यात सप्तपदी हा एक अतिशय उत्कृष्ट विधी आहे. ज्याच्या स्मरणाने वैवाहिक जीवनात कधीच दुःख येणार नाही. हा विधी प्रत्येक विवाहित व्यक्तीच्या नित्य स्मरणात असायला हवा.

      हा खरा वैवाहिक जीवनाचा शपथविधी आहे. त्यात जबाबदारी, कर्तव्य, समर्पण, प्रेम, त्याग, विश्वास आणि एकनिष्ठतेचे वचन अग्निदेवाला साक्षी ठेवून घेतले जाते आणि दिले जाते. पृथ्वीवर गंगा आणि अग्नि यांना सर्वात पवित्र संबोधले आहे.

       तुका म्हणे गंगा अग्नीशी विटाळ l लावी तो चांडाळ दुःख पावे ll

     संतांनी संबोधलेल्या या दोन्ही गोष्टी विवाह विधीत प्रधान असतात. मंगलाष्टके सुरू असताना वर आणि वधू यांच्या बरोबर मध्ये कलश ठेवलेला असतो, त्यामध्ये गंगा असते आणि त्याच्यावर दोघांच्यामध्ये अंतरपाट धरलेला असतो.

     सप्तपदीच्या वेळी आपल्या पत्नीच्या हाताला धरून, यज्ञकुंड पेटवून, अग्नीला साक्षी ठेवून, शपथ घ्यायची असते. प्रत्येक पावलाला एक वचन, अशी सात वचने शपथ रूपाने दोघांनी स्वीकारायचे असतात. म्हणूनच हिंदू संस्कृतीमध्ये विवाह विधीस *"शुभ मंगल विवाह"* असे म्हणतात आणि आशीर्वाद देताना *"शुभ मंगल सावधान"* असे म्हणतात. हा सावधान शब्द *व्रतस्थ* जीवनासाठी आहे.

    उध्वस्त होत चाललेले संसारिक जीवन आणि मोडकळीस आलेली कुटुंब व्यवस्था, पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी आपल्याला आपल्या सर्व विधींचा अर्थ आणि बोध झाला, तरच ते टिकणार आहे. आपले वैवाहिक जीवन सुखी होणार आणि राहणार आहे अन्यथा आपल अर्धे आयुष्य कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्यात आणि अर्धा पैसा वकिलाची फी भरण्यातच वाया जाणार आहे.

👇उदाहरणा दाखल एक सत्य सांगणारा व्हिडिओ


👇समाजातील वास्तव सांगणारा दुसरा व्हिडिओ


👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नायगाव येथे उत्साहात साजरी_मित्र मंडळाच्यावतीने अन्नदान

 


नायगावात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

मित्र मंडळाच्यावतीने अन्नदान 

  महाराष्ट्र आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नायगाव (बा) वसंत चव्हाण कॉम्प्लेक्स शेळगाव रोड नायगाव बाजार येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नायगाव विधानसभेचे आमदार मा.राजेशजी पवार,जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे,नगरसेवक देवीदास पाटील बोमनाळे,नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमाकांत पडवळ साहेब यांच्या हस्ते अन्नदान वाटप करण्यात आला यावेळी उपस्थीत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पाटील पवार होटाळकर,बळीराम पाटील वडजे,संभाजी गायकवाड, अविनाश पाटील अनेराये शेळगावकर,देशमुख शिवाजी, सज्जन बाळू,परमेश्वर वाघमारे, पवन शिंदे,सचिन गायकवाड व सर्व मित्र मंडळ उपस्थित होते.

👇विर शिवाजी मालिका

https://youtu.be/z98Nr5TUjpw

 👇छत्रपती कोणाला म्हणतात?

https://youtu.be/vFQ49qO0-Sg

👇महाराजांची गारद म्हणजे काय?

https://youtu.be/LONgHTyt3vM

👇राजे पुन्हा जन्माला या

https://youtu.be/F_skDMACE1s

👇ऐतिहासिक नेसरी खिंड

https://youtu.be/yLqp7LbcjKI

👇महराजांचे अष्टप्रधान मंडळ

https://youtu.be/EXhKS88xgv0

👇महाराजांच्या संपूर्ण कुटुंब कबिल्याची माहिती

https://youtu.be/O_R3354FP

👇छत्रपती शिवराय ह्यांचे अष्टप्रधान मंडळ

https://dev-shivswarajyaprtisthan.pantheonsite.io/

👇छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती

https://dev-shivswarajyaprtisthan.pantheonsite.io/node/1

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

पुरंदरचा तह माहीत आहे पण,

पुरंदरच्या तहातील २३ किल्ले कोणते होते ते माहीत नाहीत.

https://youtu.be/OuqMW7AVN3s

👇छत्रपती संभाजी राजे यांच्या पराक्रमाचा किस्सा

https://youtu.be/6SVxXtCsY60

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका सर्व एपिसोड

https://youtube.com/playlist?list=PLfvU7SiklyfOrY9DYZou8RDzUdcg-SdTh

👇शिवरायांचे मावळे

The Unsung Warriors :- 

 १.वीर बाजीप्रभू देशपांडे इतिहास👇 

https://youtu.be/Yoadm3wWozs

२.सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा साल्हेर येथील पराक्रम👇

https://youtu.be/ojHX7b5ZjA0

 ३.वीर बाजी पासलकर👇 

https://youtu.be/qkF6RPgundA

 ४.मुरारबाजी देशपांडे👇

https://youtu.be/bmauFIgvUuo

 ५.येसाजी कंक👇 

https://youtu.be/0JJrb5oyMAU

 ६.शूरवीर तानाजी मालुसरे👇 

https://youtu.be/MML22aIcU-o

 ७.सरसेनापती प्रतापराव गुजर👇  

https://youtu.be/fTZ3GOvFblU

 ८.वीर शिवा काशीद👇 

https://youtu.be/89ukDaRS7Jc

  भोसले घराण्याची वंशावळ

•••••••••••••••••••••••••••••••

आनंद घोरपडे आपल्या पुस्तकात लिहितात " अल्लाउद्दीन खिअलजीने ज्यावेळी इ.स.१३०३ मध्ये चित्तोडवर स्वारी केली, तेव्हा झालेल्या लढाईत राणा लक्ष्मणसिंह ठार झाला. राणी पद्मिनीने इअतर राजस्त्रीयांसहीत आत्मत्याग केला.लक्ष्मणसिंहाचे सात मुलगे या लढाईत ठार झाले. आठवा मुलगा अजयसिंह चित्तोडच्या गादीवर आला. अजयसिंहाला सजनसिंह आणि क्षेमसिंह असे दोन मुलगे होते. एका लढाईत दोघांनाही आलेल्या अपयशामुळे रागावलेल्या अजयसिंहाने पुतण्या हमीरला गादीवर बसवले. त्यामुळे नाराज होऊन हे बंधू इ.स.१३२० च्या सुमारास मेवाड सोडुन दक्षिणेकडे आले. सजनसिंह आणि त्याचा पुत्र दिलिपसिंह यांनी बहामनी राज्याची स्थापना करणार्‍या हसन गंगू बहामनी यांच्याकडे नोकरी पत्करली. याच दिलिपसिंहापासूनच्या १२व्या पिढित (सन १५३३) बाबाजी यांचे पुत्र मालोजी हे जन्माला आले. मालोजी हे शहाजी राजांचा जन्म झाला. दिलिपसिंहाच्या नातवाचे नाव 'भोसाजी' असे होते. याच नावामुळे पुढे हा वंश भोसले म्हणुन ओळखला जाउ लागला असे काही जाणकार मानतात.

काही इतिहासकरांच्या मते भोसले हे नाव 'भूशल' पासुन पडलं अस्ल्याचं अधिक संभवनीय वाटतं. त्यांच्या मते 'भूशल' चा एक अर्थ 'भूतलावरील शस्त्रधारी' म्हणजेच 'क्षत्रिय योध्दा' असा आहे. त्यामुळे भूशलचे वंशज हे भौषल, भौसल, भोसल, भ्सला, भोसल अशी भोसले या शब्दाची परंपरासिद्ध, इतिहास सुसंगत व्युत्पत्ती ठरते.

पण हे भोसले घराणे चित्तोडच्या राजपुत सिसोदे वंशातील अस्ल्याची वंशावळ उपलब्ध आहे. तसेच खुपशा जुन्या कागदपत्रांमध्ये शहाजीराजे आणि शिवाजी राजांचा उल्लेख राजपुत म्हणुन केल्याची नोंदही मिळते.

हे झाले आनंद घोरपडे यांच्या पुस्तकाबाबत. प्रा. रा आ. कदम यांनी तर आपल्या पुस्तकात सजनसिंहापासुनची वंशावळच दिली आहे. तीच सर्वापर्यंत पोहोचवण्यासाठी हा खटातोप मी केला आहे.

_________________________

वंशावळ

१. सजनसिंघ

२. दिलिपसिंघ

३. सिंघजी

४. भोसाजी

५. देवराज

६. इंद्रसेन

७. शुभकृष्ण

८. रुपसिंघ

९. भुमिंद्र

१०. धापजी

११. बरहटजी

१२. खेलोजी

१३. कर्णसिंघ

१४. संभाजी

१५. बाबाजी

१६. मालोजी

१७. शाहाजी राजे

१८. शिवाजी राजे

१९. संभाजी राजे

संदर्भ - सिद्धांत विजयः पृष्ट ८४-८५)

🚩जय राष्ट्रमाता जिजाऊ साहेब🚩

🚩 जय छत्रपती शिव-शंभू राजे🚩

🚩जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩

👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेऊन विकास-शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा_सहकार मंत्री_लोकराज्य मासिक मनोगत

 


 नांदेड (२१ फेब्रुवारी) :  राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्वाचे योगदान आहे. सहकारासंस्था, बाजारसमित्या, थेट शेतकऱ्यांशी निगडीत असल्याने कृषी-औद्योगिक अर्थकारण ग्रामीण पत क्षेत्रात सहकार आणि पणन क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने सामान्य माणूस, शेतकरी बांधव केंद्रस्थानी ठेऊन विकासावर लक्ष्य केंद्रित केले आहे. मागील चार वर्षापासून शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमुक्त करणारी सहज, सोपी आणि पारदर्शक अशी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ महाविकास आघाडी सरकारने जाहीर केली आहे. या योजनेची प्रभावी अमंलबजावणी सुरू आहे. कोरोनासारख्या महामारीच्या कालावधीत सुध्दा ग्राहकांना आणि शेतकरी बांधवांना अडचणी येऊ नयेत म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करून बाजार समित्यांचे व्यवहार सुरू ठेवले आणि ग्राहकांना सुध्दा भाजीपाला पुरवठा सुरू ठेवला.   


‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’

          दि. 1 एप्रिल, 2015 ते दि.31 मार्च,2019 पर्यतच्या कालावधीत शेतकऱ्यांनी घेतलेल्या सर्व अल्पमुदत पीककर्ज,पुनर्गठीत/फेर पुनर्गठीत झालेले पीककर्ज, ज्यांची थकबाकी दि. 30 संप्टेबर, 2019 रोजी रू 2 लाख पर्यंत होती, ती कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात थेट जमा करण्यात आली. आतापर्यंत जवळपास 30.77 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात रू. 19643 कोटींची रूपये जमा करण्यात आले आहे.जवळपास 97 टक्के लाभार्थ्यांना जुलै, 2020 पर्यंत राज्यात लॉकडाऊन असतांना देखील कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला.

          सन 2020-21 या वर्षातील खरीप हंगामासाठी राज्याचा रु.45,785 कोटी एवढा लक्षांक निश्चित करण्यात आला होता. दि. 1 एप्रिल 2020 ते 30 संप्टेंबर 2020 या कालावधीत. पीक कर्ज वाटपाचे प्रमाण 76.26 टक्के असून मागील वर्षाच्या तुलनेत 27 टक्के जास्त आहे. 

          जुलै व ऑगस्ट 2019 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते.यात कोल्हापुर, सांगली , सातारा, पुणे, सोलापुर,अहमदनगर, औरंगाबाद, अमरावती व नागपुर या जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करण्यात आले.

          शेतकऱ्यांच्या हितासाठी या वर्षात शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विक्री करण्याची वेळ येऊ नये, यासाठी लॉकडाऊन असतांना सुध्दा कापूस खरेदी संदर्भात तातडीने उपाययोजना करून गेल्या दहा वर्षातील विक्रमी अशी कापूस खरेदी केली. पावसाळ्यामध्ये देखील मान्सून शेड उभारून बहुतांश कापूस हा खरीप २०२०--२१ च्या पेरणी पूर्वी खरेदी करून शेतकऱ्यांची देयके देखील वेळेत देण्यांत आली.

          कोवीड-19 च्या रुग्ण संख्येत दररोज होणारी वाढ विचारात घेऊन सहकारी संस्थांच्या निवडणुका दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल आहे. तसेच सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण करण्यास आणि संस्थेची वार्षिक साधारण सभा घेण्यास सुध्दा मुदतवाढ देण्यात आली. अशा परिस्थितीत संचालक मंडळाच्या नियंत्रणापलीकडील बाबीमुळे निवडणुक होवु न शकल्यास अशा संस्थेचे नवीन संचालक मंडळाची निवड होईपर्यंत सध्या कार्यरतअसलेल्या संचालक मंडळास काही महत्वाचे निर्णय घेण्याचे सुध्दा अधिकार देण्यात आले आहे. तसेच सहकार संस्था , बाजार समित्या, निर्यात क्षेत्रावर झालेला लॉकडाऊनचा परिणाम आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती अभ्यास करून आपला अहवाल शासनाला सादर करेल आणि शासनाच्या वतीन आवश्यक उपाययोजना करण्यात येथील त्यामुळे अर्थव्यवस्थेचे अर्थचक्र पुन्हा सुरू होण्यास मदत होईल.

          कोवीड-19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे अशा मोठया शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांना थेट फळे व भाजीपाला पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र विकास महामंडळाच्या स्तरावर वेबसाईटद्वारे जीवनावश्यक वस्तुंच्या ऑनलाईन बुकींगची व्यवस्था केली.या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाशी संलग्न असलेल्या 75 शेतकरी उत्पादक कंपन्या / सहकारी संस्थांमार्फत सुमारे 414 सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील 11,899 सभासदांना 1464 क्विंटल एवढा जीवनावश्यक वस्तुंचा माफक दरात पुरवठा केला.

          या हंगामात सहकारी साखर कारखाने सुरु करण्यासाठी कारखान्यांना पुरेशा प्रमाणात कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत आत्मनिर्भर योजना तयार करण्यात आली आहे.आतापर्यंत बँकेकडे 19 कारखान्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तसेच ज्या सहकारी साखर कारखान्यांचे उक्त मुल्य व एनडीआर उणे आहे अशा ३२ सहकारी साखर कारखान्यांना नाबार्डच्या धोरणा नुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अथवा संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज पुरवठा करु शकणार नाहीत. अशा 32 सहकारी साखर कारखान्यांच्या रुपये 516.२० कोटी अल्पमुदतकर्ज घेण्यास शासन हमी. 

      सॉफट लोन योजनेस पात्र 147 कारखान्यांसाठी 4 वर्षाचे व्याजाचे अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत 54 पात्र सहकारी साखर कारखान्यांना सन 2017-18 मधील सॉफट लोन व्याज अनुदानाची उर्वरित रक्कम रु. 33.83 कोटी वितरीत करण्यात आली आहे.

          देशपातळीवर पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर सद्यस्थितीत 6% च्या आसपास असुन सन 2022 पर्यंत हे प्रमाण 10% करण्याचे व सन 2030 पर्यंत 20%/ वाढविण्याचे उद्दीष्ट आहे.राज्यातील इथेनॉल निर्मितीची वार्षिक क्षमता 166 कोटी लिटर्स असली तरी राज्यासाठी सन 2020-21 साठी इथेनॉल पुरवठा करण्याचे लक्ष 108 कोटी लिटर्स निश्चित करण्यात आले आहे. 

              सामाजिक दायित्वाच्या जाणिवेतुन कारखान्यांनी किमान 25 बेडचे हॉस्पीटल उभारण्याचे व त्यामध्ये कोरोनाच्या उपचाराशी संबंधित सुविधा देण्याची काही साखर कारखान्यांनी तयारी केली आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखाना, सहयाद्री सहकारी साखर कारखाना, कृष्णा सहकारी साखर कारखाना आदी कारखान्यांनी कोव्हीड सेंटरची उभारणी केली आहे.

          आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क- MAGNET (Maharashtra Agribusiness Network) या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प एकूण 142.9 दशलक्ष डॉलर्स (सुमारे रु. 1000 कोटी) इतक्या रक्कमेचा असून त्यापैकी 70% निधी (100 दशलक्ष डॉलर्स) आशियाई विकास बँकेकडून कर्ज स्वरुपात, 30% निधी (42.9 दशलक्ष डॉलर्स) राज्य शासनाचा स्वत:चा निधी असणार आहे. यामुळे फळे व भाजीपाला उत्पादनास मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळेल आणि राज्यात पुढील 5 वर्षांपर्यंत फळ भाजी पाल्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता या मॅग्नेट नेटवर्कमधून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. तसेच शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाताना काही अडचणी आल्या किंवा शेतमालास योग्य किंमत मिळत नसल्यास महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक करता यावी यासाठी राज्य वखार महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा बँकेत जाण्याचा वेळ आणि पैशाची बचत होण्यास मदत होते.

          यामध्यामातून शेतक-यांना ऑनलाईन कर्जाची सुविधा फक्त एक ते दोन दिवसात पुर्ण केली जात आहे. तारण कर्जाची मर्यादा प्रति शेतकरी 5 लाखापर्यत असून तारण कर्जाचा व्याजदर 9 टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी व्याजदर आहे. 

          महाराष्ट्र राज्य पणन मंडळामार्फत जानेवारी 2020 ते जून 2020 अखेर सुविधा केंद्रावरून 9912 मे टन शेतमाल आखाती देश व युरोपिय देशांमध्ये निर्यात करण्यात आलेला आहे.त्यामध्ये प्रामुख्याने फळे फुले भाजीपाला पशुखाद्य कांदा इ. चा समावेश आहे. रासेच या केंद्रामध्ये एकूण 1173 जणांना प्रत्यक्षा रोजगार मिळालेला आहे. लॉकडाऊन कालावधीत आंतरराज्यीय फळे व भाजीपाला वाहतूक नियंत्रण कक्ष’सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून शेतमाल बाहेरील राज्यात पाठविण्यात यश आले आंतरराज्यीय फळे व भाजीपाला वाहतूक नियंत्रण कक्ष 24 तास सुरू ठेवण्यत आले होते. मोठ्या महानगरात भाजीपाला-धान्य-फळांचा तुटवडा निर्णाम होऊ नये आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बाजार समिती आवारात स्वछता, सामाजिक अलगिकरणाचे (SocialDistancing) सर्व नियम पाळले, बाजार आवरात येणाऱ्या व्यक्तीसाठी प्रवेश द्वाराजवळच, तसेच बाजार आवारात ठीक ठिकाणी पुरेशा प्रमाणात हात धुण्यासाठी व्यवस्था,पाण्याचा नळ आणि निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायजरची व्यवस्था करून बाजार समित्यांचे कामकाज सुरू ठेवले.कोरोनाचा सामना करत शेतकरी हितासाठी अनेक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने महाराष्ट्र घडलेला आहे सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून या महाराष्ट्राची जडणघडण झाली. या राज्याचे पहिले मुख्यमंत्री सातारा जिलह्याचे भूमीपुत्र यशवंतराव चव्हाण यानी पुरोगामी महाराष्ट्राची ही घडी अधिक मजबूत केली. पुढे वसंतराव नाईक वसंतदादा पाटील, मा. नामदार शरद पवार यांच्या सारख्यांच्या नेतृत्वात या राज्याने प्रगतीचे नवनवे यशो शिखर निर्माण केली तीच विकासाची परंपरा कायम ठेऊन आमचे सरकारने कार्य करत आहे. 

     शब्दाकांन काशीबाई थोरात-धायगुडे


👇 जिल्हा माहिती कार्यालय नांदेड ब्लॉग स्पॉट

dionanded.blogspot.com


👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

आर्चिला लेंगी महोत्सवाला बोलावण्याची हौस पडली महागात


नांदेड (२१ फेब्रुवारी) : सारखणी इथल्या लेंगी महोत्सवाच्या आयोजकांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या लेंगी महोत्सवाला सैराट फेम आर्चीला बोलावल्याने 16 फेब्रुवारीला मोठी गर्दी झाली होती. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी

मास्कचा वापर केला न्हवता, तसेच सोशल डिस्टन्सचे Open in app पालन कल न्हवते. याबाबत किनवट तालुका महसूल विभागाच्या वतीने सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. त्या नुसार एकूण सहा आयोजकांवर सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरोना प्रतिबंधक नियम आणि भांदवीच्या कलम 188, 269, 270 आणि 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे सारखणी इथले या कार्यक्रमाचे संयोजक असलेले सहा जण अडचणीत आले आहेत.
👇Daily Crime Report ( D.C.R)Nanded


👇Explore live radio by rotating the globe


👇Radio Stations – Saptarang Creation Ned.



✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

गडगा अपहार प्रकरण पोचले विधानसभेत-ग्रामसेवक पठाण यांनी २० लाखांचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न

 


नायगाव (दि.२० फेब्रुवारी) : ग्रामसेवक एम.ए. पठाण यांनी १५ महीण्याच्या काळात गडगा ग्रामपंचायतमध्ये तब्बल १७ लाखांच्या वर १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील रक्कमेचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झालेले असताना गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे सदरचे प्रकरण थेट विधानसभेत पोहचल्याने भ्रष्ट ग्रामसेवकाला पाठीशी घालणाच्या पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, गुन्हा नोंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

मागच्या पाच वर्षापासून गडगा ग्रामपंचायतीच्या कारभा-यांनी  भ्रष्टाचार करण्याचा सपाटाच लावला आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेसह १४ व्या वित्त आयोग आणि दलित वस्तीच्या कामातील अनियमितता व अर्थिक अपहारप्रकरणी यापूर्वी पाच ग्रामसेवकावर गुन्हे नोंद झाल्यानंतर गडगा ग्रामपंचायतमधील अपहार थांबेल असे वाटत असताना पुन्हा एम.ए. पठाण यांनी अपहार केल्याची घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.

ग्रामसेवक पठाण यांनी अपहार तर केला पण चौकशी करण्यासाठी गेलेल्या विस्तार अधिका-याला अभिलेखेही उपलब्ध करून दिले नाहीत. तर दुसरीकडे तातडीने चौकशी होण्यासाठी गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे या प्रकरणी चौकशी होण्यासाठी बराच विलंब झाला. 

सदर प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी ४ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार कारवाई करुन फौजदारी गुन्हा दाखल करुन अपहार करण्यात आलेली रक्कम प्रचलीत नियमानुसार वसूल करण्याऐवजी निलंबनाची कारवाई करून मोकळे झाले. गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी भ्रष्ट ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याने आमदार राजेश पवार यांनी हा प्रश्न थेट विधानसभेत उपस्थित केला. त्यामुळे पंचायतीतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून वरिष्ठांना उतर देण्याबरोबरच फौजदारी कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सदर प्रकरणी गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्य जनतेच्या, गोरगरीब जनतेच्या,शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे राजेश पवार यांनी म्हटले आहे.

कोणतीही शासकीय /सरकारी योजना ही प्रशासनाच्या कर्तव्यदक्ष सहभागाशिवाय अमलात येऊ शकत नाही . बहुतांश अधिकारी / कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करित असतात परंतु त्यातील काही मोजके मात्र भ्र्रष्टाचाराचा कळस गाठतात .त्यामुळे माझ्या नायगाव विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्या अधिकारी / कर्मचारी वर्गावर अंकुश आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही .


👇 महाराष्ट्र शासनाची वेबसाईट/संकेतस्थळ

www.maharashtra.gov.in

👇जिल्हा परिषदेची वेबसाईट

www.zpnanded.in

👇 जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट

www.nanded.gov.in

👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com