सोमवार, फेब्रुवारी १५, २०२१

ग्रामीण भागाच्या विकासास प्राधान्य द्यावे–उपमुख्यमंत्री अजित पवार

 


औरंगाबाद विभागासाठी 2240 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

औरंगाबाद, (दि.15 फेब्रुवारी) :- ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रीत करुन जिल्हा नियोजनचा निधी ग्रामीण भागातील विकासासाठी योग्य पद्धतीने खर्च करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज सन-2021-22 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) चा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद विभागाची बैठक झाली. या बैठकीत औरंगाबाद विभागासाठी 2240 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.

बैठकीस संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, वित्त व नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्याधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, आदींसह विभाग प्रमुख उपस्थित होते.

बैठकीची जिल्हानिहाय माहिती खालीलप्रमाणे आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासाठी 365 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

औरंगाबाद जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 प्रारुप आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठकीत मान्यता दिली.

यावेळी उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भूमरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, खासदार इम्त‍ियाज जलील, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, विक्रम काळे, हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, अतुल सावे, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींसह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्याला आवश्यक असलेल्या निधीची मागणी विस्तृत स्वरूपात बैठकीत सादर केली. यामध्ये सन 2021-22 च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी 265.68 कोटीच्या वित्तीय मर्यादेत आराखडा तयार करण्याबाबत शासनाकडून सूचना होत्या. परंतु यंत्रणांची मागणी व योजनांवरील मागील वर्षातील खर्च आदी बाबी विचारात घेऊन प्रारूप आराखड्यात गाभा, बिगर गाभा क्षेत्रासाठी शासनाकडून प्राप्त कमाल आर्थिक मर्यादेनुसार 265.68 कोटी आणि वाढीव 94.32 कोटी याप्रमाणे एकूण 360 कोटी रूपये एवढ्या वाढीव निधी मागणीचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. औरंगाबाद मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा असून जिल्ह्याची गरज लक्षात घेत 365 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास वित्तमंत्री श्री.पवार यांनी मान्यता दिली.

कोरोनाचे संकट भयंकर, खबरदारी घ्या

कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढू नये, यासाठी वेळीच खबरदारी घेऊन यंत्रणांनी कठोर कारवाई करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज दिल्या. त्याचबरोबर मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि हात वारंवार धुण्याबाबत यंत्रणांनी नागरिकांत अधिक सजगता निर्माण करावी. कोरोनाचा प्रसार होणार नाही, यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात, असेही श्री. पवार म्हणाले. महावितरणने थकबाकी वसुलीला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. तसेच घाटीतील माताबाल संगोपन केंद्रास अनुकुल असून केंद्र चालू ठेवण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाहीही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिली.

जालना जिल्ह्यासाठी 260 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

सन 2021-22 या आर्थिक वर्षात 260 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली. शासनाने 181 कोटी रुपयांची आर्थिक मर्यादा निश्चित करुन दिली होती. त्यामध्ये 79 कोटी रुपयांची वाढ उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी मान्य केली.

या बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार अंबादास दानवे, आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त व नियोजन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद प्रताप सवडे जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले, जालना जिल्ह्याच्या विकासासाठी 260 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत असून यापैकी 10 कोटी रुपये क्रीडा संकुळासाठी देण्यात येत आहेत. उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करण्यात यावीत. सर्वसामान्यांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात मिळाव्यात यासाठी आरोग्य सेवा सक्षमीकरनावर अधिक भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

बीड जिल्ह्यासाठी ३४० कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत बीड जिल्ह्यासाठी २४२.८३ कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती. परंतु त्यामध्ये आज झालेल्या बैठकीत ९७.१७ कोटी रुपयांनी वाढ करून सर्वसाधारण योजनेसाठी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी ३४० कोटी मंजूर करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले.

बैठकीस राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, प्रधान सचिव नितिन गद्रे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, बीड जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या शिरसाट, आमदार प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षिरसागर, आ. संजय दौंड, आ. विक्रम काळे, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती अपर्णा गुरव, जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, बीड जिल्ह्याचा विकासासाठी निधीची गरज ध्यानात घेता गाव रस्ते, अंगणवाड्या, आरोग्य सुविधा व शिक्षण यासाठी हा निधी वापरला जावा असे सांगून ते म्हणाले गावातील रस्त्यांसाठी निधीचा वापर करताना पहिल्या वर्षी खडीकरण करून रस्ते तयार केले जावेत व दोन वर्षानंतर डांबरीकरण करणे शक्य होईल जिल्ह्यातील गावांमधील रस्त्यांचा प्रश्न यामुळे सुटू शकेल व निधीची उणीवही भासणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी जिल्ह्यातील विकासाच्या विविध कामांसाठी निधीची कमतरता भासत असून यावर्षी राज्य शासनाने मंजूर केलेला नियतव्यय हा मागच्या पेक्षा कमी असल्याने जिल्ह्यास भरीव निधी वाढवावा अशी मागणी केली.

याप्रसंगी बैठकीमध्ये मराठवाड्यासाठी असलेली कृषी पंप थकबाकी पंधरा हजार कोटी पर्यंत पोहोचली असून यापैकी दोन तृतीयांश रक्कम राज्य शासनाने माफ केली आहे, बीड जिल्ह्याच्या 2 हजार 228 कोटी रुपये थकबाकी पैकी जवळपास पंधराशे कोटी माफ करण्यात आले आहेत. जे तालुके विज थकबाकी भरतील त्यांना महावितरणमधून पुढील विकासाचा निधी देता येईल अशी सूचना करण्यात आली. तसेच केलेली मागणी विचारात घेता माजलगाव येथील नाट्य गृहासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात आली असून जिल्हा नियोजन मार्फत यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

परभणी जिल्ह्यासाठी 225 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा आजच्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानात कसोटीवर उतरविणे कसरतीचे झाले आहे. राज्याच्या आर्थिक उत्पन्नात कोरोना प्रार्दुर्भावामुळे जी घट निर्माण झाली आहे ती लक्षात घेता उपलब्ध असलेल्या निधीचे जबाबदारीने वाटप हे सूत्र अंगिकारल्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले.

या बैठकीस आमदार सर्वश्री बाबाजानी दुर्राणी, सुरेश वरपूडकर, डॉ.राहुल पाटील, मेघना बोर्डीकर, माजी राज्यमंत्री तथा खासदार फौजीया खान, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) देबाशीष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद टाकसाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुध्द राजूरकर, आदींची उपस्थिती होती.

ग्रामीण भागात यावर्षी सर्वदूर चांगला पाऊस असल्याने पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. यामुळे कृषी क्षेत्रासाठी ऊर्जेची मागणी वरचेवर वाढल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या बाजूला राज्यात सर्वाधिक विजेची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्ह्यातील विद्युत विभागाच्या विकास कामांवर याचा अप्रत्यक्ष परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. लोकांनी थकबाकी जर भरली तरच हा विभाग ग्रामीण पातळीवर असलेल्या दुरूस्तीसह इतर विद्युत विकासाची कामे मार्गी लावू शकेल हे आपण निट लक्षात घेतले पाहिजे. पायाभूत विकासासाठी लागणारा निधी हा त्या-त्या सेक्टरमधून सेवा देयकाच्या माध्यमातून येत राहिला तरच त्यातुन मार्ग निघू शकेल, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीतील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. यातून उभी राहणारी रक्कम ही त्या-त्या भागात विकास कामासाठी उपयोगात घेता येईल असे सूचक विधानही त्यांनी केले.

मराठवाडा विभागातील विद्युत थकबाकी चिंतेचा विषय झाला असून यात अधिकाधिक लोकसहभाग घेऊन वेळप्रसंगी कठोर निर्णय व्हावेत या दृष्टीने त्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना यात समन्वय साधून योग्य ते कारवाईचे निर्देष दिले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व आरोग्य उपाययोजनांसाठी शिल्लक असलेला 12 कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या समन्वयातून आरोग्य विभागासाठीच खर्ची करावा असे निर्देशही त्यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी पालकमंत्री नवाब मलिक यांनी आग्रह धरुन निधी वाढ मिळावी यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.

लातूर जिल्ह्यासाठी 255 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2021 -22 च्या लातूर जिल्ह्यासाठी 255 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला मान्यता देण्यात आली. बैठकीस मंत्री वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री लातूर अमित देशमूख, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), राज्यमंत्री संजय बनसोडे, रोजगार हमी, भुकंप पुनर्वसन व संसदीय कार्य लोकसभा सदस्य ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, उस्मानाबाद, या बरोबरच सर्वश्री आमदार विक्रम काळे, संभाजी पाटील निलंगेकर, धीरज देशमुख, अभिमन्यू पवार, अप्पर मुख्य सचिव (नियोजन विभाग) देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर, औरंगाबाद, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनवकुमार गोयल, लातूर महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल, व लातूर जिल्हयातील कार्यान्वयीत यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी कोरोना संकटामुळे राज्याचा महसूल कमी झालेला आहे. तरी उपमुख्यमंत्री जेवढा निधी वाढविता येईल तितका निधी लातूर जिल्ह्यासाठी वाढवून द्यावा, असे निवेदनही केले.

यानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आलेला निधी हा आरोग्य योजनांसाठीच खर्च करण्यात यावा. सन 2020-23 पासून प्रत्येक महसूली विभागात ‘चॅलेंज फंड’ म्हणून रु. 50.00 कोटी अतिरिक्त निधी एका जिल्ह्याला दिला जाईल. यासाठी वेळेत प्रशासकीय मान्यता देणे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी नियमित आयोजित करणे. आय-पॉस प्रणालीचा वापर करणे इत्यादी निकष आहेत. आय-पॉस प्रणालीचे लॉग इन सर्व संबंधितांना उपलब्ध करून द्यावे.



नांदेड जिल्ह्यासाठी 355 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी

मागील वर्षात कोरोनाच्या संकटामुळे 1 लाख कोटी रुपयांनी राज्याचे आर्थिक उत्पन्न कमी झाले. अनेक आर्थिक आव्हानातून जिल्हा विकास आराखड्याच्या प्रारुपावर व यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त तरतूदीवर यामुळे मर्यादा आल्या असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केले.

यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर, आमदार सर्वश्री श्यामसुंदर शिदे, राजेश पवार, तुषार राठोड, सतीष चव्हाण, अपर मुख्य सचिव (नियोजन) देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, नियोजन अधिकारी सुधाकर आडे, तसेच नांदेड जिल्ह्यातील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

जिल्ह्याच्या विकास कामांसाठी लागणारी आर्थिक मागणी ही दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही. परंतु ही मागणी करताना राज्याच्या वित्त व नियोजन विभागातर्फे आयपास प्रणालीचा शंभर टक्के वापर, वेळेच्या आत प्रशासकीय मान्यता, जिल्ह्यातील शाश्वत विकासाचे मापदंड, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती योजनांची उत्तम अंमलबजावणी, सर्वसामान्य लोकांना केंद्रीत ठेवून नाविन्यपूर्ण योजना असे निकष ठरविण्यात आले आहेत. या निकषाची जे चांगली पूर्तता करतील त्यांच्यासाठी 2022-23 मध्ये 50 कोटी रुपयांचा अतिरिक्त चॅलेंज फंड देऊ असेही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले. जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालकल्याणसाठी 3 टक्के निधी राखून ठेवा असे ते म्हणाले.

मराठवाड्यातील मागासलेपणाचा अनुशेष दूर करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात भरीव तरतूदीची गरज असून मागील काही वर्षात जो अनुशेष निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी शासनस्तरावरुन मराठवाड्याच्या वाट्याला अधिक तरतूद कशी देता येईल याचा प्रयत्न वित्त विभागाने करावा असा आग्रह नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला.

शासनाने जिल्ह्यासाठी 255.32 कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा दिली. त्यानुसार 2/3 गाभा क्षेत्रात 161.71 कोटी रुपये, 1/3 बिगर गाभा क्षेत्रात 80.84 कोटी व 5 टक्के नाविन्य पूर्ण योजना व शाश्वत विकास ध्येय, मूल्यमापन व डाटा ऐन्ट्री असे एकूण 12.77 कोटी अशी तरतूद करण्यात आलेली आहे. शासनाच्या दिलेल्या नियतव्ययाच्या 255.32 कोटी मर्यादेत प्रारुप आराखडा तयार करुन आरोग्य, उर्जा, अंगणवाडी बांधकाम, ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, सामान्य शिक्षण, ग्रामविकास, पर्यटन/तीर्थस्थळ, पशुसंवर्धन, वने नगरविकास, गृहविभाग, तांडा विकास, सामान्य आर्थीक सेवा इत्यादी विविध योनजेसाठी 200 कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आली होती.

मुलींचा जन्मदर वाढीसाठी 'बेटी बचाओ बेटी पढाओ' अभियानाला उपमुख्यमंत्र्यांच्या सदिच्छा

नांदेड जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराचे कमी असलेले प्रमाण लक्षात घेता नांदेड जिल्हा प्रशासनाकडून 'बेटी बचाओ बेटी पढाओ' हा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाच्या पुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अशोक चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नांदेडमधील मुलींच्या जन्माचे प्रमाण 888 इतके कमी असून ते प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक जनजागृतीची मोहिम हाती घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली.

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 280 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

जिल्ह्यात रस्ते, आरोग्य, जलसंधारण यांसह सर्व आवश्यक बाबींच्या पुर्तततेसाठी गुणवत्तापूर्ण कामे करण्याकरीता निधीचा योग्य वापर करावा. चालू आर्थिक वर्षात उपलब्ध करून दिलेला निधी वेळेत खर्च करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, खासादर ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सर्वश्री ज्ञानराज चौगुले, कैलास घाडगे पाटील, सतिश चव्हाण, विक्रम काळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यंत्रणांनी जिल्ह्यांतर्गत विकासकामे दर्जेदार करण्यावर भर द्यावा . जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाठी प्राप्त निधी योग्य पद्धतीने खर्च करावा, असे निर्देश देत कर वसूलीवर भर देण्याच्या सूचना दिल्या. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी शासनाकडून जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत 160 कोटी 80 लाख रुपयांची कमाल आर्थिक मर्यादा कळविलेली आहे. त्या अनुषंगाने नियमित आणि नीति आयोग अंतर्गत प्रस्तावित 20 कोटी रुपये आणि एकूण अतिरिक्त मागणी 103 कोटी 64 लाख रुपये ग्राह्य धरून एकत्रित अंतिम 304 कोटी 64 लाख रुपये इतका आराखडा प्रस्तावित केला होता . त्याबाबत सविस्तर आढावा घेत वित्त मंत्र्यांनी 280 कोटी रूपयांच्या आराखड्यास आज मंजुरी दिली .

त्याचप्रमाणे कोविडअंतर्गत प्राप्त शिल्लक निधी पालकमंत्र्यांच्या सल्याने आरोग्य यंत्रणांच्या बळकटीकरणासाठी 31 मार्चपूर्वी खर्च करावा. तसेच जिल्हा आव्हान निधी योजनेअंतर्गत 50 कोटी रुपये 2022-23 पासून दिले जाणार आहेत . यामध्ये आय-पास प्रणालीचा वापर, कमीत कमी अखर्चित निधी, सामाजिक न्यायासाठी असलेल्या निधीचा संपूर्ण वापर, आदिवासी उपयोजना निधीचा पूर्ण वापर, नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश, शाश्वत विकास घटकांचा समावेश आदी निकष असणार आहेत तरी या संधीचा लाभ घेत त्यात सहभाग घ्यावा. लोकप्रतिनिधी आणि यंत्रणांनी समन्वयातून विकास कामांवर निधीचा योग्यरित्या वापर करावा, असे निर्देशही श्री. पवार यांनी यावेळी संबंधितांना दिले.

पालकमंत्री श्री. गडाख यांनी जिल्ह्यासाठी 304 कोटी रुपयांच्या वाढीव आराखड्याची मागणी करत आरोग्य सेवांसाठी जास्त खर्चाची तरतूद असून अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या कामांमध्ये जलसंधारणाची कामे, बंधारे दुरूस्ती यासाठी वाढीव प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले.

हिंगोली जिल्ह्यासाठी 160 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

हिंगोली जिल्ह्यातील विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना 2021-22 या अर्थिक वर्षाकरीता सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत प्रत्यक्ष 101 कोटी 68 लाख रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली आहे. औरंगाबाद येथे आज आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 322 कोटी 28 लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. त्यापैकी सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत 58.32 कोटी (57.36 टक्के) अतिरिक्त निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) आराखडा 160 कोटी रुपयांचा झाला असून त्यास वित्त व नियोनज मंत्री अजित पवार यांनी मंजूरी दिली आहे.

बैठकीस पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, सर्वश्री आमदार राजू नवघरे, सतिष चव्हाण, विक्रम काळे अप्पर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, हिंगोली जिल्ह्याचे पालक सचिव एन.आर. गद्रे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली. तसेच बैठकीत वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी कोविड-19 मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच हिंगोली जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती निधी मधून कोविड-19 करीता भौतिक पायाभूत उत्कृष्ट सोयीसुविधा, रामलीला मैदानाचे सुशोभिकरण, वन पर्यटन आदी उत्कृष्ट कामे केल्याबद्दल 58.32 कोटी अतिरिक्त निधी वाढवून देत असल्याचे सांगून सदर निधी हा जिल्ह्यातील विविध विकास कामांवर योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करण्याच्या सूचना श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत


 जखमींच्या उपचाराचाही खर्च करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

Nandednews

मुंबई, दि. १५ : जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन त्यात १५ मजूर मृत्यूमुखी पडले. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

मृत मजूर हे रावेर तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे. मृतांमध्ये सहा महिला व नऊ पुरूष आहेत. हा अपघात दुर्देवी असल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मृत मजुरांच्या कुटुंबियाप्रती आपली सहवेदना व्यक्त केली आहे. याशिवाय अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली. तसेच संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.


👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com






Comments


ADS GO HERE

Popular posts from this blog

अखेर नायगाव नगरपंचायत येथे विविध विकास कामे न झाल्याने न प कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू

February 10, 2021

Image

नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण यांचा पाठिंबा नायगाव,दि. 10 : नायगाव नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील वार्ड क्रमांक 4 व शहरातील विविध विकास कामाच्या संदर्भात वेळोवेळी निवेदनााद्वारे मागणी करूनही विकास न झाल्याने अखेर नगरपंचायतीच्या समोर सोनालीताई हंबर्डे यांचे आमरण उपोषण सुरू. नायगाव शहरातील आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते या अमर उपोषणास जाहीर पाठिंबा देतो व नायगाव शहरातील विविध विकास कामे जोपर्यंत पूर्ण होत नाहीत व न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्या सोबत सदैव आहोत अशी भावना व्यक्त करत अभिप्राय देण्यात आले तसेच सोनालीताई हंबर्डे यांच्या आमरण उपोषणाला नायगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वजण पाठिंबा देत आहोत. या ठिकाणी उपस्थित देवदास पाटील बोमनाळे, भाऊराव पाटील चव्हाण, रघुनाथदादा सोनकांबळे, गजानन पाटील चव्हाण, कैलास भाऊ भालेराव, माधव पाटील कल्याण, संतोष पाटील कल्याण, सुधाकरजी पायरे, शंकर भाऊ वडपत्रे, अतुल पाटील मंगरुळे, प्रदीप भाऊ देमेवार यासह असंख्य कार्यकर्ते या आमरण उपोषणास पाठींबा देताना उपस्थित होते. उपोषण करत्यांना नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्

READ MORE

नांदेड हैद्राबाद शिवशाही बसच्या कामारेड्डी जवळ तीन पलट्या,17 जन गंभीर जखमी,त्यात नायगावच्या सहा जणांचा समावेश,एकाची प्रकृती चिंताजनक

February 15, 2021

Image

 नांदेड ,(दि.14 फेब्रुवारी) : नांदेड आगाराची शिवशाही बस क्रमांक एम एच ०६ बी डब्ल्यू ४४१३ दि. १३/०२/२०२१ रोजी रात्री ११:०० वाजता च्या नांदेड – हैदराबाद फेरीवर धावत असताना दिनांक १४/०२/ २०२१ रोजी सकाळी ०४:०० वाजता कामारेड्डी (तेलंगणा राज्य) च्या अलीकडे सदर बस रस्त्याच्या खाली उतरून २-३ पलट्या घेतल्याने अपघात झाला. बस मध्ये अपघाताच्या वेळी एकूण ३६ प्रवासी होते. सदर अपघातात १७ प्रवाशांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली.सदर अपघातात रा. प. चालकाच्या डोक्याला मार लागला असून वाहकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. चालक वाहक व सर्व जखमी प्रवाशांना कामारेड्डी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कामगिरी वरील चालक- श्री. विजयकुमार वाघवसे, बि. क्र. – १८६८८ व वाहक – श्री अब्दुल करीम, बि. क्र. – १५८२६ हे होते. प्रथम दर्शनी सदर अपघात बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याने रा. प. चालक जबाबदार दिसून येत आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक बिलोली श्री.चंद्रशेखर समर्थवाड घटनास्थळी रवाना झाले असून यंत्र अभियंता (चालन) तथा विभाग नियंत्रक श्री.अशोक पन्हाळकर घटनास्थळा कडे तात्काळ रवान

READ MORE

नांदेड परिक्षेत्र : अंबुलगा येथील ग्रामसेवक घरकुल बिलासाठी २००० लाच घेताना जेरबंद

February 12, 2021

Image

 Respected Madam, *यशस्वी सापळा कार्यवाही* ➡ युनिट :- लातूर ➡ तक्रारदार :- पुरूष, वय- 49 वर्ष ➡ आरोपी - 1) वैजीनाथ मोहन चात्रे वय 39 वर्षे, पद- ग्रामसेवक, वर्ग-3 नेमणूक- ग्रामपंचायत अंबुलगा, ता. निलंगा जि, लातूर रा.हानमंतवाडी,ता.निलंगा जि. लातूर 2) दत्ता शिवाजी सूर्यवंशी वय-35 वर्षे,पद - पाणीपुरवठा सेवक, ग्रामपंचायत अंबुलगा. ➡ लाचेची मागणी- 2,000/- रुपये ➡ लाचेची मागणी/पडताळणी दिनाक. 12/02/2021 ➡ लाच स्विकारली -दिनांक 12/02/2021 रोजी 2,000/- रुपये. ➡ लाचेचे कारण :- तक्रारदार यांच्या घरकुलाचा तिसरा हप्ता बॕक खात्यावर जमा होण्यासाठी आवश्यक असलेल्या फॉर्मवर स्वाक्षरी करुन दिली म्हणून आलोसे क्रं. 1 ग्रामसेवक यांनी 2,000/-रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम आरोपी क्रं. 2 यांचे मार्फत स्विकारली. ➡ आरोपी :- आरोपी लाचेच्या रक्कमेसह ताब्यात. ➡ यशस्वी सापळा दिनांकः- 12/02/2021 रोजी 13.57 वा.अंबुलगा (बु.) ग्रामपंचायत कार्यालया समोर ता.निलंगा जि.लातूर ➡ मार्गदर्शन:- श्रीमती कल्पना बारवकर,पोलिस अधीक्षक,नांदेड परिक्षेत्र. श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलिस अधीक्षक,नांदेड परिक्षेत्



आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घ्यावा


नांदेड,(दि.15 फेब्रुवारी):-  केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री योजना असंघटीत व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योगासाठी सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी आहे. ही योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जाणार आहे. वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांनी एमआयएस (MIS) पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. या संबंधीची माहिती www.mofpi.nic.in  PMFME या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय नांदेडच्या  (02462-284252) या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.  

केंद्र शासनाने ‍ आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उदयोग उन्नयन योजना सन 2020-21 ही केंद्र पुरस्कृत योजना देशभरामध्ये राबविण्याचे नियोजन केले आहे. ही योजना असंघटीत व अनोंदणीकृत अन्नपक्रिया उद्योगाकरिता आहे. याचा कालावधी सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाचा असून एक जिल्हा एक उत्पादन (One District One Product) या धर्तीवर राबविली जाणार आहे. नांदेड जिल्हयासाठी हळद व इतर मसाले पदार्थ हे उत्पादन मंजूर आहे. या योजनेअंतर्गत अन्नपक्रिया उद्योगाकरिता सामाईक पायाभुत सुविधा केंद्राकरिता 35 टक्के अनुदान, ब्रॅडींग व मार्केटींगसाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता गटांना बीज भांडवल लहान उपकरणे खरेदीसाठी 40 हजार प्रती सभासद (4 लाख) पर्यंत अनुदान देय राहील. योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक, शासन यंत्रणा किंवा खाजगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी सामायिक पायाभूत सुविधा या घटकांतर्गत नविन प्रकल्पाचे प्रस्ताव ओडीओपी  उत्पादनावर देता येतील. तसेच सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रक्रीया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी एक जिल्हा एक उत्पादनाच्या व्यतिरीक्त इतर प्रस्ताव देखील या योजनेमध्ये सादर करता येतो. गट लाभार्थींनी ऑफलाईन पध्दतीने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयास अर्ज निश्चित केलेल्या एक जिल्हा एक उत्पादनासाठी सादर करता येतील, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


नांदेड जिल्ह्याच्या 355 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजूरी-राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठक


▪ 100 कोटी रुपयांची भरीव वाढ

▪ जिल्ह्यात खालावलेला मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी 'बेटी बचाव बेटी पढाओअभियानाचा प्रारंभ 

नांदेड,(दि.15 फेब्रुवारी) : मागील वर्षात कोरोनाच्या संकटामुळे लाख कोटी रुपयांनी राज्याचे आर्थिक उत्पन्न कमी झाले. अनेक आर्थिक आव्हानातून जिल्हा विकास आराखड्याच्या प्रारुपावर व यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त तरतूदीवर यामुळे मर्यादा आल्या असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी केले. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय प्रारुप आराखडा आढावा बैठकीत ते बोलत होते. 

औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या राज्यस्तरीय बैठकीस यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाणजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकरविधान परिषद सदस्य सतिश चव्हाणआमदार सर्वश्री राम पाटील रातोळीकरआमदार श्यामसुंदर शिदेआमदार राजेश पवार,  अपर मुख्य सचिव (नियोजन) देबाशिष चक्रवर्तीविभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरजिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकरजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूरमनपा आयुक्त डॉ सुनील लहानेनियोजन उपायुक्त रवींद्र जगतापजिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडेतसेच नांदेड जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. 

जिल्ह्याच्या विकास कामांसाठी लागणारी आर्थिक मागणी ही दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही. परंतु ही मागणी करताना राज्याच्या वित्त व नियोजन विभागातर्फे आयपास प्रणालीचा शंभर टक्के वापरवेळेच्या आत प्रशासकीय मान्यताजिल्ह्यातील शाश्वत विकासाचे मापदंडअनुसूचित जातीअनुसूचित जमाती योजनांची उत्तम अंमलबजावणीसर्वसामान्य लोकांना केंद्रीत ठेवून नाविन्यपूर्ण योजना असे निकष ठरविण्यात आले आहेत. या निकषाची जे चांगली पूर्तता करतील त्यांच्यासाठी 2022-23 मध्ये 50 कोटी रुपयांचा अतिरिक्त चॅलेंज फंड देऊ असेही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले. जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बालकल्याणसाठी टक्के निधी राखून ठेवा असे ते म्हणाले. 

राज्यात अकोलाअमरावती भागात कोरोनाचे प्रमाण वाढत असून याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शासनाच्या आरोग्य विभागातर्फे व इतर सर्व यंत्रणा यासाठी अहोरात्र राबत आहेत. मात्र नागरिकानींही कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने मास्क वापरणेसॅनिटायझरचा वापर करणेआदी ज्या सूचना दिल्या आहेत त्याचेही काटेकोर पालन केले पाहिजे. लोकांना आवाहन करुनही मास्क वापराचे महत्व जर कळत नसेल तर जिल्हा प्रशासनाने पोलीस यंत्रणेची मदत घेऊन सक्तीने मास्क लावण्यासाठी उपक्रम हाती घेऊन जे वापरत नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल करावा असे संतप्‍त उद्गार अजित पवार यांनी काढले. कोणत्याही परिस्थितीत कोरोना प्रार्दुभाव वाढणार नाही यावर लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.  

जिल्ह्याचे मोठे क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार वाढीव निधीची

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून आग्रही मागणी

मराठवाड्यातील मागासलेपणाचा अनुशेष दूर करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात भरीव तरतूदीची गरज असून मागील काही वर्षात जो अनुशेष निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी शासनस्तरावरुन मराठवाड्याच्या वाट्याला अधिक तरतूद कशी देता येईल याचा प्रयत्न वित्त विभागाने करावा असा आग्रह नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. जिल्ह्याला 68 ॲम्ब्युलन्सची गरज असल्याची मागणी त्यांनी करुन एसडीआरएफ मधून याच्या खरेदीची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या, 16 तालुक्यांमध्ये साधलेला विस्तारमानवनिर्देशांक या बाबी प्राधान्याने विचारात घेऊन जिल्ह्याच्या विकास आराखडा मागणी केल्याप्रमाणे तरतूद वाढवून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले.   

शासनाने जिल्ह्यासाठी 255.32 कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा दिली. त्यानुसार 2/3 गाभा क्षेत्रात 161.71 कोटी रुपये, 1/3 बिगर गाभा क्षेत्रात 80.84 कोटी व टक्के नाविन्य पूर्ण योजना व शाश्वत विकास ध्येयमूल्यमापन व डाटा ऐन्ट्री असे एकूण 12.77 कोटी अशी तरतूद करण्यात आलेली आहे.  शासनाच्या दिलेल्या नियतव्ययाच्या 255.32 कोटी मर्यादेत प्रारुप आराखडा तयार करुन आरोग्यउर्जाअंगणवाडी बांधकामग्रामीण मार्गइतर जिल्हा मार्गसामान्य शिक्षणग्रामविकासपर्यटन/तीर्थस्थळपशुसंवर्धनवने नगरविकासगृहविभागतांडा विकाससामान्य आर्थीक सेवा इत्यादी विविध योनजेसाठी 200 कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आली होती. 

राज्याची आर्थीक स्थिती लक्षात घेता नियोजन विभागाने ठरविलेल्या निकषा अंतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी वाढवून सन 2021-22 करिता 355 कोटी रुपयांचा आराखडा आजच्या बैठकीत अंतिम करण्यात आला. नांदेड जिल्ह्याचा विस्तार व इतर निकष लक्षात घेऊन 100 कोटी रुपयांची वाढ दिल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

मुलींचा जन्मदर वाढीसाठी 'बेटी बचाओ बेटी पढाओअभियानाला उपमुख्यमंत्र्यांच्या सदिच्छा 

नांदेड जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराचे कमी असलेले प्रमाण लक्षात घेता नांदेड जिल्हा प्रशासनाकडून 'बेटी बचाओ बेटी पढाओहा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाच्या पुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवारपालकमंत्री अशोक चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नांदेडमधील मुलींच्या जन्माचे प्रमाण 888 इतके कमी असून ते प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक जनजागृतीची मोहिम हाती घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकरजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली. 

जिल्हा प्रशासनातर्फे यासाठी विविध प्रोत्साहनपर उपक्रम हाती घेतले असून  'मुलीचे नाव घराची शान' या विशेष उपक्रमाचे कौतुक त्यांनी केले. गाव तिथे स्मशानभूमीपंचतारांकीत आरोग्य केंद्र उपक्रमअंगणवाडी विकासासाठी विशेष मोहिमपंचतारांकीत शाळाया अभिनव उपक्रमांचीही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती घेऊन या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.





✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.


👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


नांदेड हैद्राबाद शिवशाही बसच्या कामारेड्डी जवळ तीन पलट्या,17 जन गंभीर जखमी,त्यात नायगावच्या सहा जणांचा समावेश,एकाची प्रकृती चिंताजनक


 नांदेड ,(दि.14 फेब्रुवारी) : नांदेड आगाराची शिवशाही बस क्रमांक एम एच ०६ बी डब्ल्यू ४४१३ दि. १३/०२/२०२१ रोजी रात्री ११:०० वाजता च्या नांदेड – हैदराबाद फेरीवर धावत असताना दिनांक १४/०२/ २०२१ रोजी सकाळी ०४:०० वाजता कामारेड्डी (तेलंगणा राज्य) च्या अलीकडे सदर बस रस्त्याच्या खाली उतरून २-३ पलट्या घेतल्याने अपघात झाला.

बस मध्ये अपघाताच्या वेळी एकूण ३६ प्रवासी होते. सदर अपघातात १७ प्रवाशांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली.सदर अपघातात रा. प. चालकाच्या डोक्याला मार लागला असून वाहकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.



चालक वाहक व सर्व जखमी प्रवाशांना कामारेड्डी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कामगिरी वरील चालक- श्री. विजयकुमार वाघवसे, बि. क्र. – १८६८८ व

वाहक – श्री अब्दुल करीम, बि. क्र. – १५८२६ हे होते.

प्रथम दर्शनी सदर अपघात बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याने रा. प. चालक जबाबदार दिसून येत आहे.

सदर अपघाताची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक बिलोली श्री.चंद्रशेखर समर्थवाड घटनास्थळी रवाना झाले असून यंत्र अभियंता (चालन) तथा विभाग नियंत्रक श्री.अशोक पन्हाळकर घटनास्थळा कडे तात्काळ रवाना झाले आहेत. तेलंगाना राज्य परिवहन चे अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले आहेत.

 सदर अपघातात नायगाव हुन हैद्राबाद साठी निघालेल्या सहा जणांना जबर मार लागला आहे.त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे 

     नायगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी माधव कवटीकवार यांचे परवाच निधन झाले होते, वडिलांच्या अस्थी काशीला घेऊन निघालेले त्यांचे चिरंजीव शिवाजी माधव कवटीकवार 45, नातू,सचिन वसंत कवटीकवार 35 ,दोघे रा.नायगाव तर कवटीकवार परिवाराचे जावई चंद्रकांत रुद्रकंठवार रा.कलंबर 55 वर्ष हे हैद्राबाद हुन विमानाने काशी उत्तरप्रदेश येथे जात होते.तर दुसऱ्या एका कुटुंबातील काहीजण लग्न कार्यासाठी या बसने हैदराबादला जात होते.या अपघातात शेख अहेमद खाजा मिया वय 56 वर्ष यांचे माकड हाड मोडले.पत्नी हजरा बेगम शे. अहमद 50 वर्ष दोन्ही हात मोडले आणि डोके फुटले. मुलगी मिसबाह नुरी शे. अहमद 22 वर्ष यांनाही जबर मार लागला.सर्वजण नांदेडच्या डॉ. कतूरवार अर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 मध्य रात्री 12 वा नायगाव येथे येणारी ही शिवशाही बस एक तास उशिरा आली आली होती

    विशेष म्हणजे नायगाव हुन निघाल्या नंतर नरसी चौकातून बोधन मार्गे जाणारी बस बेधुंद चालकाने नरसी देगलूर रस्त्यावरही नेली होती नंतर प्रवासी व वाहक यांनी आरडाओरड केल्या नंतर परतून घेऊन बोधन मार्गावर आणली.साखरझोपेची वेळ असल्याने सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना कामारेड्डी जवळ जागेवर दोन कोलांट ऊडया खात बस दरीत कोसळली 

   नायगाव येथील तरुण व्यापारी सचिन वसंत कवटीकवार याच्या डोक्याला जबर मार लागला असून 10 ते 15 टाके पडले आहेत.तर सराफी व्यापारी शिवाजी माधव कवटीकवार ,चंद्रकात रुद्रकंठवार हेसुध्दा जखमी झाले आहेत.

    ड्रायव्हर ने मद्य प्राशन केले होते असे कंडक्टर चे म्हणणे आहे तसेच यात नायगाव येथील तीन जण गंभीर जखमी आहेत त्यांचे व इतर प्रवाशांचे अपघात झाल्यानंतर मोबाईल मौल्यवान वस्तू व पैसे गहाळ झाल्याची चर्चा आहे. या अपघातातील जखमी सुखरूपपणे घरी आले असल्याचे कळते


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

कृषि योजनांसाठी प्रथमच ऑनलाईन सोडत; पारदर्शक पद्धतीने २ लाख शेतकऱ्यांची निवड – कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती


 मुंबई, (दि. १३ फेब्रुवारी) : शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच प्रथमच ऑनलाईन सोडत काढण्यात आली. त्याद्वारे राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे निवड करण्यात आली आहे. यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, विशेष घटक योजना, नविन विहीरी व फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. ज्यांची निवड झाली आहे त्यांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे.

यापूर्वी कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना योजनानिहाय वेगवेगळे अर्ज करावे लागत होते. तसेच अर्ज केलेल्या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ मिळाला नाही तर पुढील आर्थिक वर्षात नव्याने अर्ज करावा लागायाचा त्याचबरोबर प्रत्येक अर्जासोबत कागदपत्रेही स्वतंत्रपणे जोडावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन कृषि विभागाच्या सर्व योजनांसाठी एकच अर्ज करण्यासाठी महाडीबीटी प्रणाली विकसित करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गावातुनच अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली तसेच आवश्यक कागदपत्रे एकदाच जोडण्याची सोय झाल्याने प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्रपणे कागदपत्रे सादर करण्याची गरज राहली नाही. या आर्थिक वर्षात जर शेतकऱ्यास लाभ मिळाला नाही तर पुढील आर्थिक वर्षात शेतकऱ्यास नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्याचा मागील वर्षाचा अर्ज पुढील वर्षीही ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे कृषीमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

नव्याने विकसित केलेल्या या प्रणालीस राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ११ लाख ३४ हजार शेतकऱ्यांनी या प्रणालीवर नोंदणी करुन विविध योजनांतर्गत मागणी नोंदवली. प्रत्येक योजनेच्या आर्थिक लक्षांकानुसार राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची ऑनलाईन सोडतीद्वारे निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने यांत्रिकीकरण, सिंचनाच्या विविध बाबी, फलोत्पादन, नवीन विहीरी बांधणे आदी विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीवर लॉग इन करुन त्यांच्या निवडीबाबतची माहिती मिळू शकते तसेच या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर निवडीबाबत संदेशही प्राप्त होतील. जे शेतकरी निवडीनंतर मुदतीत घटकांची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांची निवड रद्द करुन संगणकीयप्रणालीद्वारे प्रतिक्षा यादीतील क्रमवारीनुसार पुढील शेतकऱ्यांची निवड केली जाईल. तसेच ज्या शेतकऱ्यांची चालु आर्थिक वर्षात निवड होणार नाही त्यांचे अर्ज पुढील आर्थिक वर्षात ऑनलाईन सोडतीसाठी विचारात घेण्यात येतील त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

मांजरम महसूल मंडळामधील सर्व नागरिकांना सुचना : नायगाव प्रशासन मांजरम या आपल्या गावी १६ फेब्रुवारीला येत आहे हो... नायगाव तहसील च्या वतीने आवाहन

मांजरम महसूल मंडळामधील सर्व ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी मांजरम येथील शिबीराला हजर रहावे
(मांजरम,वाडी,मोकसदरा,गडगा,नावंदी,केदारवडगाव, टेंभुर्णी,आलुवडगाव,कार्ला,माहेगांव,रातोळी/कॅम्प, कोलंबी,दरेगाव,गोदमगाव,अंचोली)


संपूर्ण जिल्ह्यात *प्रशासन आपल्या गावी* हे महसूल मंडळनिहाय एका आठवड्यात एका मंडळात शिबीर आयोजित करण्यात येत आहे.या शिबीराला तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सर्व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की,आपल्या समस्या घेऊन उपस्थित राहावे,आपले प्रश्न येथील कार्यक्रमात सोडविले जातील असे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
नागरिकांची वेगवेगळ्या विभागांची, वेगवेगळ्या कार्यालयातील, वेगवेगळ्या योजनेची व बॅंकेची कामे,अडचणी या शिबीरात मार्गी लागणार आहेत
दि.१६/०२/२१.बुधवार.
वेळ-११.०० ते ०५.००.
स्थळ-जिल्हा परिषद शाळा,मांजरम ता.नायगाव(खै)


परिपत्रक 
-989 G:\naisrgik Aapti 2017.doc

तहसिल कार्यालय, नायगाव (खै.)

ई-मेल - tahnaigaon@gmail.com

शाखा:- नैसर्गिक आपत्ती

दूरध्वनी क्रमांक 02485-203502

जा.क्र.-2021/कारबी- दि.10 फेब्रुवारी 2021


प्रति

1)गटविकास अधिकारी, पंचायत समिती नायगांव (खै.)

(मांजरम महसूल मंडळामधील ग्रामसेवक मार्फत बीडीओ)

2)तालुका भुमिलेख अधिकारी नायगांव (खै.)

3)वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय नायगांव (खै.)

4)वैदयकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय नायगांव (बा.)

5)तालुका कृषी अधिकारी नायगाव (खै.)

(कृषी मंडळ अधिकारी व कृषी सहायक मार्फत ता.कृ.अ)

6)महिला व बालविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास कार्यालय, पंचायत समिती नायगाव (खै.)

7)गटशिक्षण अधिकारी (प्राथमिक) पंचायत समिती नायगांव (खै.)

8)गटशिक्षण अधिकारी (माध्यमिक) पंचायत समिती नायगांव (खै.)

9)अध्यक्ष महिला व आर्थिक विकास महामंडळ नायगांव (बा.)

10)एकात्मिक बालविकास अधिकारी नायगाव (खै.)

11)पशु वैद्यकीय अधिकारी नायगाव (बा.)

12)सहायक अभियंता विदयुत वितरण विभाग नायगांव (बा.)

(सहायक अभियंता, सर्व लाईनमन मार्फत उप अभियंता नायगाव)

13)सहायक निबंधक अधिकारी नायगाव (खै.)

14)सर्व शाखा व्यवस्थापक स्टेट बैंक ऑफ इंडिया

नायगाव (बा.) व रामतिर्थ

15)मंडळ अधिकारी मांजरम व मांजरम महसूल मंडळातील सर्व सज्जांचे तलाठी मार्फत तहसिलदार

विषय : ''प्रशासन आपल्या गावी'' या उपक्रमाअंतर्गत दि.16/02/2021 रोजी 11:00 वाजता मांजरम मंडळा अंतर्गत मांजरम येथे शिबीर आयोजित केले बाबत. 

संदर्भ:-मा जिल्हाधिकारी नांदेड यांचे पत्र कं.2021/मशाका 2/अना/मराअ/शासन निर्णय/सीआर दि. 19.01.2021

उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की,नागरीकांची कामे विविध विभागाशी संबंधित असतात व त्यांना त्यांची कामे पूर्ण होण्यासाठी विविध कार्यालयामध्ये जावे लागते,नागरीकांची कामे तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी 'प्रशासन आपल्या गावी' हा उपक्रम राबविणे बाबत मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने दिनांक 16/02/2021 रोजी ठीक 11:00 वाजता स्थळ मांजरम येथे शिबीर ठेवण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमास मा.आमदार नायगांव विधानसभा मतदार संघ नायगांव व मा.जिल्हाधिकारी नांदेड यांची उपस्थित लाभणार आहे.

करीता सर्व कार्यालय प्रमुखांना कळविण्यात येते की 'प्रशासन आपल्या गावी' हा कार्यक्रम दि.12/02/2021 रोजी मांजरम येथे आयोजित करण्यात आले होते. परतु दि 12/02/2021 रोजी मांजरम येथे सरपंच व उपसरपंच निवड असल्यामुळे सदर शिबीर दिनांक 16/02/2021 रोजी मांजरम येथे घेण्यात येणार जाहे.


       तहसिलदार नायगाव (खै)

10/02/2021

प्रत,

1. मा.जिल्हाधिकारी नांदेड यांना माहितीस्तव सविनय सादर. 

2.मा,उपविभागीय अधिकारी, बिलोली याना माहितीस्तव सविनय सादर.

स्वा

तहसिलदार, नायगाव (खै.)


👇शासन निर्णय pdf
👇जिल्हाधिकारी पत्र pdf
#प्रशासन आपल्या गावी

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com