पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Self Help Group : बँकांनी स्वयंसहाय्यता समुहांना संवेदनशीलता ठेऊन आर्थिक पाठबळ द्यावे–एमएसआरएलएम सिईओ डॉ.हेमंत वसेकर

इमेज
  मुंबई, दि. 29 डिसेंबर : सर्व बँकर्सनी ग्रामीण भागातील बचतगटांना कर्ज वितरण करताना संवेदनशील दृष्टीकोन ठेवायला हवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी केले. नवी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या राज्य कक्षातर्फे राज्यातील सर्व सार्वजनिक, खाजगी व सहकारी क्षेत्रातील बँकर्सच्या राज्यस्तरीय प्रमुखांच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. राज्यातील स्वयंसहायता समूहांना योग्यवेळी पतपुरवठा उपलब्ध करणे, खाते उघडणे, समूह सदस्यांना विमा सुरक्षा कवच उपलब्ध करणे हे विषय कार्यशाळेत चर्चिले गेले. राज्यातील सर्व बँकर्स सोबत आयोजित चर्चासंवादात बँकांनी केलेल्या कामगिरीबाबत बँकनिहाय आढावा घेण्यात आला. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांनी सादरीकरण केले. रिझर्व बँकेच्या निर्देशांप्रमाणे बँकांनी प्राधान्य क्षेत्राला पतपुरवठा करणे अपेक्षित आहे. त्यामुळे वंचित घटकांना उपजिविकेची साधने उपलब्ध होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असे प्रतिपादन...

राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान

इमेज
  मुंबई, दि. २९ डिसेंबर २०२१ - राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. या अभियानादरम्यान कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. असंख्य अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ०३ जानेवारी रोजी साजरी करण्यात येते. तसेच त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षणदिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिवरायांना शूर, पराक्रमी, धाडसी योद्धा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग समाजासमोर सुजाण पालकत्वाचे आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत. यशस्वी जीवनासाठी आवश्यक मूल्ये शालेय विद्यार्थ...

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक (सदस्य संख्या, प्रभाग रचना व आरक्षण ) कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी

इमेज
  नायगाव,दि.३० डिसेंबर २०२१ : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या चालू असलेल्या प्रभाग रचनेला २४ डिसेंबर २०२१ रोजी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक (सदस्य संख्या, प्रभाग रचना व आरक्षण ) कार्यक्रमास स्थगिती देण्याचे आदेश दिले होते.निवडणूक आयोगाने परत सुधारित आदेश काढून नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण गटाला देण्यात येवून प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम पुढे चालू ठेण्याची परवानगी देली आहे.त्यामुळे जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने २४ नोव्हेंबर २०२१ च्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक (सदस्य संख्या, प्रभाग रचना व आरक्षण ) २०२१ च्या आदेशान्वये ग्रामपंचयात प्रभाग रचना व आरक्षणाबाबत सविस्तर कार्यपध्दती दिलेली आहे. तसेच दिनांक २६/११/२०२१ च्या आदेशान्वये राज्यातील माहे जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच यापूर्वी दिनांक २९/११/२०१९ रोजी दिलेला प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम चुकीच्या पध्दतीने राबविल...

धर्माबाद तालुक्यात शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन होऊ शकते तर नायगावसह इतर तालुक्यांना काय अडचण आहे? ते कुणाच्या आदेशाची वाट पाहत बसले आहेत? गटशिक्षण अधिका-यांमध्ये त्यांच्या स्तरावर आदेश काढण्याची हिम्मत नाही का? की अधिकार नाहीत

इमेज
  नायगाव,दि.२९ डिसेंबर २०२१ : महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळा ०१ डिसेंबर पासून सुरू झाल्या आहेत.नांदेड जिल्ह्यात दुस-या पंधरवड्यात शाळांना सुरुवात करण्यात आली आहे.शाळा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यासह धर्माबाद तालुक्यात शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन होत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून येत आहेत.असे असताना नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या मुदत संपलेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडी विषयी कुठली चर्चा किंवा कुठला गाजावाजा पाहायला मिळत नाही. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये  बालकांचा मोफत व सक्तीच्या अधिकार अधिनियम २००९ मधील कलम (२१) अन्वये व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या अधिकार नियम २०११ मधील नियम (१३) अन्वये  शालेय व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघ यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.कोरोना महामारीमुळे जवळपास मागिल दोन वर्षांपूर्वी बंद झालेल्या शाळा डिसेंबर २०२१ मध्ये सुरुवात होऊन शाळेत मुले येऊ लागल्यामुळे शाळा गजबजू लागल्या आहेत. शाळा सुरु होण्यापूर्वी समित्या नव्याने स्थापन करणे श...

आ.राजेश पवार यांच्या स्वखर्चाने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची निर्मिती; गावकऱ्यांनी केले आ.पवार दाम्पत्याच्या सामाजिक दायित्वाचे कौतुक

इमेज
आ.राजेश पवार यांच्या स्वखर्चाने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची निर्मिती; गावकऱ्यांनी केले आ.पवार दाम्पत्याच्या सामाजिक दायित्वाचे कौतुक. गडगा,दि. २८ डिसेंबर २०२१ : नायगाव तालुक्यातील गडगा येथील गेल्या वीस वर्षांपासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद होता.त्यामुळे मरणानंतरही मरणयातना सहन करण्याचे दुर्भाग्य गडगा गावकऱ्यांच्या नशीबी आले होते.दरम्यान, गावच्या समस्या जाणून घेण्यासाठी थेट गावातील गल्लीबोळात जावून ग्रामस्थांशी संवाद साधत लोकाभिमुख लोकप्रतिनिधी आमदार राजेश पवार यांनी समस्या ऐकून घेतल्या.स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता बंद असल्याचे ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता स्वखर्चाने हा रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन आमदार महोदयांनी दिले.त्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी कामाला सुरुवात झाली.११ दिवस हे काम चालले त्यानंतर एक की.मी.अंतराचा अतिशय दर्जेदार रस्ता निर्माण करण्यात आला. नायगाव विधानसभा मतदारसंघातील तिनही तालुक्यातील अनेक गावात आमदार राजेश पवार तसेच मांजरम गटाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.पुनमताई राजेश पवार यांनी स्वखर्चाने स्व.संभाजीराव पवार प्रतिष्ठान आलूवड...
इमेज
  नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या घुंगराळा येथील अपचारी कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदमला तुर्तास निलंबित करु; डिईनंतर सेवेतून बडतर्फ केले जाईल-उप मुख्यकार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे पत्रकार संजय पाटील चिखले मरवाळीकर नायगाव,दि.२७ डिसेंबर २०२१ : नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम सह फुलवाल्याला २५ हजार लाच स्वीकारताना ०३ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.त्यानंतर नायगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधिक्षक ला.प्र.वि नांदेड यांचे द्वारे या प्रकरणी सक्षम अधिकारी मुख्यकार्यकारी अधिकारी, नांदेड यांना कारवाई नंतर एक दोन दिवसात पत्र पाठवून या घटनेची माहिती देण्यात आली असली तरी एसीबीच्या जाळ्यात अडकलेला अपचारी कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम याला जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी अद्याप निलंबित केले नसल्याची बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या वेबसाइटवर सांख्यिकी सदरात प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केल्यावरुन स्पष्ट झाली आहे. नांदेड लाचलुचपत प्रति...

मराठा वधू-वर परिचय मेळावा हा मराठा सेवा संघाचा स्तुत्य उपक्रम -माजी आ. वसंत चव्हाण

इमेज
  नायगाव,दि.२५ डिसेंबर २०२१ : मराठा सेवा संघ तालुका शाखा नायगाव च्या वतीने आयोजित  मराठा वधू-वर परिचय मेळावा हा स्तुत्य उपक्रम आहे. बदलत्या काळानुसार वधू-वर परिचय मेळावा घेणे गरजेचे होते. ती समाजाची गरज ओळखून सेवा संघाने आयोजित केला आहे. यावेळी व्यासपीठावर माजी.आ.वसंतराव पाटील चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर, संजय पाटील शेळगावकर, श्रावण पाटील भिलवंडे, भास्कर पा.भिलवंडे, डाॅ दत्तात्रय शिपांळे, प्रा संतोष देवराये, शे. रा. पाटील, जीवनराव पाटील वडजे, पंडीत पवळे, डाॅ विश्वास चव्हाण, सूर्यकांत कदम, बाबुराव आडकीणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना माजी आ. चव्हाण म्हणाले की, सेवा संघाने यापुढे वैयक्तिक खर्चातून मेळाव्याचे आयोजन न करता समाजातील दाते यांचे सहकार्य घ्यावे त्यासाठी मी ही एक समाजातील घटक म्हणून आपल्या सोबत सदैव राहील. यापुढे ही जाऊन या मेळाव्याच्या माध्यमातून जेवढी विवाह जुळून येतील त्या सर्वांची सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून विवाह संपन्न करण्यासाठी तालुक्यातील सर्वच मराठा राजकीय मंडळी व समाजातील सर्व समाज घटकांचे सहकार्य घेऊन विवाह संपन्न करण्यासाठी माझा ही आपल्...

मराठा सेवा संघ नायगाव च्या वतीने 25 रोजी मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

इमेज
  🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩 नायगाव,दि.24 डिसेंबर 2021 : मराठा सेवा संघ नायगांव च्या वतीने मराठा समाजातील बांधवासाठी वधू आणि वर यांची ओळख व्हावी यातून ऋणानुबंधाच्या गाठी बांधल्या जाव्यात या उद्देशाने "मराठा वधू-वर परिचय मेळावा" दिनांक २५/१२/२१ रोजी साईतीर्थ मंगल कार्यालय शेळगाव रोड नायगाव बा. येथे सकाळी ठिक 11:00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.तरी पंचक्रोशीतील मराठा वधू-वर पित्यांनी आपल्या एकविस वर्षांवरील मुलांचा व अठरा वर्षावरील मुलींचा बायोडाटा देवून नोंदणी फाॅर्म भरुन निःशुल्क नोंदणी करावी. मराठा सेवा संघ, नायगांव च्या वतीने एक सामाजिक बांधिलकी च्या नात्याने वधू-वर यांचा एकाच ठिकाणी परिचय व्हावा व यातून समाजातील मुलांच्या व मुलींच्या लग्नाच्या रेशीम गाठी बांधल्या जाव्यात या उद्देशाने निशुल्क परिचय मेळावा आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये शिक्षीत व उच्चशिक्षीत अशा अनेक स्थळांची माहिती उपलब्ध होणार आहे. तेंव्हा आपल्या १८ वर्षावरील मुलींचे व २१ वर्षावरील मुलांची निःशुल्क नोंदणी करा व हवे तसे स्थळ मिळवा.  तसेच त्या दिवशी मुलांना व मुलींना परिचयासाठी घेऊन यावे.अशी कळकळीची नम्र विनंत...
इमेज
शाळा व्यवस्थापन समिती (SMC) व पालक शिक्षक संघ (PTA) यांना शाळा सुरू होईपर्यंत दिलेली मुदतवाढ संपुष्टात आणून नव्याने समित्या  स्थापन कराव्यात  नायगाव,दि.23 डिसेंबर 2021 : बालकांचा मोफत व सक्तीच्या अधिकार अधिनियम २००९ मधील कलम ३८ (२)(१) अन्वये, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क अधिनियम २०११ मधील कलम (२१) अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम (२६)(i)() अन्वये प्राप्त अधिकारान्वये शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 04 जून 2020 च्या शासन निर्णयानुसार शालेय व्यवस्थापन समिती,पालक शिक्षक संघ व कार्यकारी समितीस  मुदतवाढ देण्याकरीता पुढील प्रमाणे निर्णय घेतला होता. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणू (Covid-१९) या आजारास जागतिक महामारी म्हणून घोषित केलेले आहे. या आजाराच्या संसर्गाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 13 मार्च 2020 च्या अधिसूचने अन्वये राज्यात साथरोग अधिनियम १८१९ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अमंलबजावणी सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. दरम्यानच्या काळात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार ...

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, माहूर, नायगाव नगरपंचायत निवडणुकीसाठीच्या मतदानाकरीता मतदारांचा पुढाकार

इमेज
  अर्धापूर 77.59 टक्के, माहूर 76.09 टक्के, नायगाव 79.06 टक्के  नांदेड,दि. 21 डिसेंबर 2021 :- नांदेड जिल्ह्यात दिनांक 21 डिसेंबर रोजी अर्धापूर, माहूर,  नायगाव या तीन नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांनी चांगला सहभाग घेत मतदानाची टक्केवारी वाढविली. तीनही नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रत्येकी 17 प्रभाग होते. यातील अर्धापूर नगरपंचायतीसाठी 13 प्रभागाची, नायगाव नगरपंचायतीसाठी 14 प्रभागाची तर माहूर नगरपंचायतीसाठी 13 प्रभागाची संख्या होती. अर्धापूरमध्ये 57 उमेदवार, नायगावसाठी 27 उमेदवार तर माहूरमध्ये 63 उमेदवार उभे होते.   अर्धापूर नगरपंचायतीसाठी एकुण 17 हजार 104 मतदारांपैकी 13 हजार 271 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नायगाव निवडणुकीसाठी एकुण 8 हजार 93 मतदारांपैकी 6 हजार 398 तर माहूर नगरपंचायतीसाठी एकुण 7 हजार 101 मतदारांपैकी 5 हजार 403 मतदारांनी आपला हक्क बजावला. अर्धापूरसाठी मतदानाची एकुण टक्केवारी 77.59, नायगावसाठी 79.06 तर माहूरसाठी 76.09 एवढी मतदानाची टक्केवारी झाली. सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत मतदान झाल्याची ही टक्केवारी आहे.
इमेज
  धक्कादायक : मरवाळी तांडा येथील ग्रामसेवक पचलिंगने ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेल्या नोव्हेंबर मधील ग्रामसभेचे आयोजन केलेच नाही नायगाव,दि.१९ डिसेंबर : कोरोना-१९ च्या महामारीमुळे राज्यात दोन वर्षांत एकही ग्रामसभा झाली नाही.ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या दृष्टीने नोव्हेंबर मधील ग्रामसभेचे आयोजन करणे आवश्यक असताना मरवाळी तांडा येथील ग्रामसेवक पचलिंगने या ग्रामसभेचे आयोजन केले नसून अद्याप ग्रामसभा झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सविस्तर माहिती अशी की,मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात,राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले.मे महिन्यातील आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेसह अन्य ग्रामसभांना राज्य शासनाने पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली होती.मुदत संपलेल्या कोरोना महामारीमुळे निवडणूका पुढे ढकलण्यात आलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणूका जानेवारी २०२१ मध्ये घेण्यात आल्या व आखरी टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूका लांबणीवर टाकण्यात आल्या.त्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली.नायगाव तालुक...
इमेज
नायगाव विधानसभेच्या आमदाराचे माहेर घर भाजपा तर दिलेले घर रिपाई...नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे तीन उमेदवार बिरोध ! माजी आमदार वसंतराव चव्हाण म्हणतात खेल और बाकी है माधव पवार नायगाव/रुई प्रतिनिधी : राज्यातले राजकारण असो की जिल्ह्यासह तालुक्याचे राजकारण असो राजकीय वर्तुगळात कोणत्या पक्षाचा खेळखंडोबा होईल हे निश्चित नसते परंतु नांदेड जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळीचे लक्ष लागून असलेल्या नायागांव नगरपंचायत निवडणूकीत एक वेगळेच चित्र पाहावयास मिळाले असून या निवडणूकी दरम्यान भाजपाचे तीन उमेदवार उडून काँग्रेस पक्षाच्या  घर्ट्यात गेल्यामुळे काँग्रेस पक्षाचे तीन बिनविरोध निघाल्याने नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी विद्यमान आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण ये तो सुरुवात है और खेल तो बाकी है अशी प्रतिक्रिया देत म्हणाले की नायागांवच्या आमदाराचे भाजपा माहेर घर तर दिलेले रिपाईचे घर असल्यामुळे आमदार राजेश पवारची बोलती बंद झाली आहे जिल्ह्यातील नायगाव नगरपंचायत निवडणुकीची रचना १७ वार्डाची असल्यामुळे येथील तीन वार्डाची निवडणूक ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्यामुळे १४ वार्डाचे म...
इमेज
राजकारणातील राजकीय सोंगाड्याांनी ग्रामीण भागात यात्रेसह कुस्त्यावर बंदी घातली असल्यामुळे प्रशासनावर नामांकित पैलवान चक्रधर शिंदे यांची घोर नाराजी By : Admin रुई प्रतिनिधी माधव पवार  नायगाव,दि.14 डिसेंबर 2021 :  महाराष्ट्र राज्यातल्या राजकीय नेते मंडळीना मोठ्या प्रमाणात राजकारणाचा छंद झडला असल्यामुळे राजकारणी फक्त कोणत्याही निवडणूका असो लोकसभेच्या असो विधानसभेच्या असो अथवा नगरपंचायतीच्या निवडणूका असो त्याच बरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, असो आमदार असो यांनी निवडणुकीकडे जास्तीचे लक्ष घालून निवडणुकीचा रणसंग्राम घडवून आणतात परंतु अतिशय महत्वाचा खेळ  म्हणजे यात्रेतील कुस्त्याचा फडासाठी व यात्रेसाठी परवानगी नाकारून सदरच्या यात्रेवर बंदी घातली असल्यामुळे राजकारणातील राजकीय सोंगाड्यासह प्रशासनावर बरबड्याचे नामांकित पैलवान चक्रधर शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे  नायगाव तालुक्यासह ग्रामी...
इमेज
  नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर इंटर सॉफ्टवेअर वाहनाद्वारे वाहने कॅच ; कंट्रोल स्पीड वाहन धारकानो सावधान सावकाश वाहने चालवा. रुई बु. (माधव पवार) नायगाव ,दि.१० डिसेंबर : नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या रस्त्यावर व जिल्ह्यातील अनेक मार्गावर मोठ्या वेगाने वाहन चालकांनी चारचाकी वाहन तीनचाकी वाहन दुचाकी वाहने सदर चालकांनी शासनाने दिलेल्या नियमाचे कसल्याच प्रकारचे काटेकोरपणे कायद्याचे पालन करण्या ऐवजी त्या नियमाचे उल्लंघन करून वाहन स्पीडने चालवित असल्यामुळे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्यामुळे जिल्ह्यात इंटरसॉफ्टवेअर वाहनाच्याद्वारे वाहन धारका कडून दंड आकारला जात असल्यामुळे वाहन धारकानो कंट्रोल स्पीड सावधपणे आपले वाहने कमी स्पीडने चालविने गरजेचे असून पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार इंटर सॉफ्टवेअर वहानाच्या द्वारे पि एस आय शिवानंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पॉका महेंद्रसिंग कोठीतीर्थवाले, पॉका अतुल नागरगोजे, पॉका राजेश झुंबाड यांनी मशीनचे नियंत्रन ठेवले असल्यामुळे वाहन धारकानो आता सावधान स्पीडवर ताबा लावा असे सांगण्यात येत आहे  जिल्ह्यातील...
इमेज
भीषण अपघात : सिडीएस बिपिन रावत यांना घेऊन जाणारं लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश;11 जणांचा मृत्यू सीडीएस बिपिन रावत यांना घेऊन जाणारं लष्कराचं हेलिकॉप्टर क्रॅश, सोबत होते पत्नी सह 14 जण;11 जणांचा मृत्यू. मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात घडला. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत आणि त्यांची पत्नीही होती. संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांना संपूर्ण घडामोडींची माहिती दिली असून मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह सिडीएस बिपिन रावत यांच्या घरी दाखल. तामिळनाडू,दि.08 डिसेंबर 2021 : तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सांगण्यात येते, की सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 14 जण या हेलिकॉप्टरमध्ये होते.जखमींना वेलिंग्टन बेसमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते.या अपघातात 3 जण जखमी झाल्याची माहिती होती.परंतु आताच मिळालेल्या माहितीनुसार 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. खराब हवामानामुळे हा अपघात घडला आहे की हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्य...
इमेज
भास्करराव धर्माधिकारी आगामी काळातील बरबडा जिल्हा परिषदच्या निवडणुकीत संधी मिळाल्यास इच्छुक रुई वार्ताहर (माधव पवार) रुई बु. नायगाव,दि.०८ डिसेंबर २०२१ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकररावजी चव्हाण यांच्या काळापासून महोनराव गंगाजीराव धर्मधिकारी बरबडेकर यांचे अतिशय निकटचे संबंध होते आणि गेल्या पन्नास वर्षाखाली महोनराव धर्माधिकारी यांनी दिवंगत शंकरराव चव्हाण यांना काहाळा येथून बरबडा येथे घोड्यावर बसून आणले होते आणि गावांत बैलगाडीवर चव्हाण यांची मिरवणूक ही काढण्यात आली होती बरबड्याचे दिवंगत महोनराव गंगाजीराव धर्माधिकारी यांचे चिरंजीव भास्करराव महोनराव धर्माधिकारी यांनी आगामी काळातील बरबडा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जर सर्वसाधारण पुरुषासाठी सुटल्यास काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास भास्करराव धर्माधिकारी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले भास्करराव महोनराव धर्माधिकारी यांचे वडील मोहनराव धर्माधिकारी हे दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या सानिध्यात राहून गावच्या विकासासाठी प्रयत्न केले असल्यामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्र...
इमेज
 महालाचखोर लोकसेवक मंडळ अधिकारी गब्बरसिंग गारळे याच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मुसक्या आवळल्या; तलाठ्याविरुद्धच्या तक्रारीच्या सुनावणीचा निकाल बाजूने देण्यासाठी मागितली होती लाच @७५ : सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे कारवाई होतेय हे लक्षात येताच तासगावच्या 'मंडलाधिकाऱ्या'ने ठोकली धूम, 'एसीबी'ने पाठलाग करून केले जेरबंद पुणे,दि.०७ डिसेंबर २०२१ : लोकसेवक गब्बरसिंग तुकाराम गारळे वय ३७ वर्ष मंडल अधिकारी तासगांव, मंडल अधिकारी कार्यालय तासगांव ता. तासगांव जि. सांगली रा. मु.पो. वासुंबे ता. तासगांव जि. सांगली याचे विरूध्द लाच स्विकारले बाबत कारवाई सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. तक्रारदार यांनी त्यांचे गावातील सोसायटीमध्ये जमीनीवर कर्ज मिळणेबाबत अर्ज केला आहे. सदर कर्जासाठी जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर ई कराराची नोंद होणे आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी ई करार नोंद होणे बाबत तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. सदर अर्जावर ई करार न होण्यासाठी मंडल अधिकारी कार्यालय तासगांव या ठिकाणी तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारीची सुनावणी गारळे, मंडल अधिकारी तासगांव यांचे समक्ष सुरू होती...
इमेज
  प्रशासनातील लाचखोर लोकसेवकांना लागलेली लाचखोरीची सवय समाजासाठी वाळवी आहे पत्रकार संजय ब्रम्हानंद पाटील चिखले यांचे प्रतिपादन लाच या विषयावर विशेष लेख लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे. शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे. जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करेल. भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती, समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल. हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकेल. समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतीसाठी सज्ज आहे. प्रशासनाला लाचखोरीची कशी वाळवी लागली आहे,त्याचे मुर्तीमंत उदाहरण...