पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Constitution Day : मरवाळी/कोपरा गट ग्रामपंचायत मध्ये २६ नोव्हेंबर रोजी ७३ वा संविधान दिन उत्साहात साजरा

इमेज
  नायगाव/मरवाळी,दि २६ नोव्हेंबर २०२१ : ग्रा.पं. कार्यालय मरवाळी/कोपरा येथे दिनांक 26/11/2021 रोजी सकाळी 11 वाजता संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.घटनातज्ञ मसुदा समितीचे अध्यक्ष,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले,त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. या वेळी गावातील सर्व जाती धर्माचे नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे गावातील महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. संविधानाबद्दल जनजागृती २६ नोव्हेंबर १९४९ आणि २६ जानेवारी १९५०.... भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे दोन दिवस. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीनं भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला तर २६ जानेवारी १९५० रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली . त्यानंतर भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं. त्यामुळं या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन '२६ नोव्हेंबर' हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय संविधानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी व सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी या करीता  संविधान दिनाच्या निमित्ताने ग्रामस...

कृष्णर एमआयडिसी येथील कीर्ती गोल्ड कंपनीवर अवैध वृक्षतोड व वाहतूक प्रकरणी कारवाई करावी अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल-सोनाली पाटील हंबर्डे व अंकुशकुमार देगावकर

इमेज
  नायगाव,दि.24 नोव्हेंबर 2021 :  तालुक्यातील कृष्णूर येथील औद्योगिक वसाहतीत किर्ती गोल्ड ही तेल निर्मिती करणारी कंपनी आहे.कीर्ती गोल्ड ही गेल्या अनेक वर्षा पासून तालुक्यातील सोयाबीनची खरेदी करून शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात लूट करत आहे.नायगाव तालुक्यातील वृक्षाची या तेल निर्मिती करणाऱ्या कंपनीने चांगलीच वाट लावली असल्यामुळे या कंपनीवर कार्यावाही करण्यात यावी या मागणीसाठी सोनाली पाटील हंबर्डे व अंकुशकुमार देगावकर यांनी नायागावच्या तहसीलदारांना 24 नोव्हेंबर रोजी निवेदन दिले आहे. तालुक्यातील कृष्णूर येथील कीर्ती गोल्ड कंपनी ही एका धनदांडग्या भांडवलदाराची असल्याने वनविभागाचे अधिकारी कंपनीत जाऊन पाहणी केल्याचा बनावटी कांगावा करत आर्थिक तडजोड करत कंपनीत लाकूडच सापडले नसल्याचा खोटा देखावा करून वनपाल ग्रुपवार हे उडवा उडावीची उत्तरं देऊन कीर्ती गोल्ड कंपनीला पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचे सरळ सरळ दिसून येत असल्यामुळे वनविभाग अधिकाऱ्यासह कंपनीवर तात्काळ कार्यावाही करण्यात यावी असी मागणी सोनाली पाटील हंबर्डे व अंकुशकुमार देगावकर यांनी केली असून कठोर कार्यावाही न झाल्यास बेमुदत आंदोलन कर...

ब्रेकिंग न्यूज : महालाचखोर तालुका कृषी अधिकारी 5 हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या

इमेज
  **==**प्रेसनोट**==** *यशस्वी सापळा अहवाल* ▶️ *युनिट* -नाशिक ▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-29, रा- मु. करंजाळी तालुका पेठ जिल्हा नाशिक ▶️ *आलोसे*   1.श्री. अरविंद पगारे , वय- 57 वर्ष, तालुका कृषी अधिकारी पेठ , वर्ग-2, रा. जगताप मळा,नाशिक रोड, नाशिक.                                                ▶️ *लाचेची मागणी*- 5,000/-रू. ▶️ *लाच स्वीकारली*-5,000/-रु. ▶️ *लाचेची मागणी दिनांक* 15/11/2021     ▶️ *लाच स्वीकारली दिनांक* 24/11/2021    ▶️ *लाचेचे कारण -*.       तक्रारदार यांच्या मु. करंजाळी तालुका पेठ, जिल्हा नाशिक येथील कृषी केंद्राचे,शेती उपयोगी बी बियाणे, रासायनिक खते व कीटक नाशके यांचा स्टॉक योग्य असल्याचे दाखवणे तसेच कृषी केंद्राच्या परवाना नूतनीकरणासाठी अडचण येवू न देण्यासाठी यातील आलोसे अरविंद पगारे यांनी तक्रारदार यांच्याकडे 50...

आज दोन सत्रात जिल्ह्यात 57 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणा-या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) केंद्र परिसरात कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश

इमेज
नांदेड, दि. 21/11/21 :-  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा-2021 परीक्षा रविवार 21 नोव्हेंबर 2021 रोजी ही दोन सत्रात जिल्ह्यात 57 परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 या वेळेत घेण्यात येणार आहेत. या परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये व परीक्षा स्वच्छ सुसंगत पार पाडण्याच्यादृष्टिने या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत.   या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात रविवार 21 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता येणार नाही. परीक्षा कालावधीत या परीसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वणी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.    Tags :  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१

विदेशी दारुचा खप वाढावण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लढविली नामी शक्कल ! विदेशी दारुवरील १५०% टॅक्स केला कमी ; पण पेट्रोल डिझेल वरील टॅक्स कमी करुन गोरगरीबांना दिलासा देण्यास महाराष्ट्र शासन तयार नाही

इमेज
  थोडक्यात पण महत्त्वाचे महाराष्ट्रात विदेशी दारू झाली स्वस्त महाराष्ट्र शासनाने विदेशी दारूवरील एक्साइज ड्युटी इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ५० टक्क्यांनी कमी केली महाराष्ट्रात विदेशी दारूवर १५० टक्के एक्साइज ड्युटी लागू आयात केल्या जाणाऱ्या विदेशी दारूवर महाराष्ट्रात ३०० टक्के एक्साइज ड्युटी होती मुंबई,दि. 21/11/21 : महाराष्ट्र शासनाने विदेशी दारूवरील एक्साइज ड्युटी इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ५० टक्क्यांनी कमी केली. आयात केल्या जाणाऱ्या विदेशी दारूवर महाराष्ट्रात ३०० टक्के एक्साइज ड्युटी होती. आता महाराष्ट्रात विदेशी दारूवर १५० टक्के एक्साइज ड्युटी लागू होईल.  एक्साइज ड्युटीवरील कपातीमुळे विदेशी दारूचा राज्यातील खप एक लाख बाटल्यांवरुन अडीच लाख बाटल्यांपर्यंत पोहोचेल, असा महाराष्ट्र शासनाचा अंदाज आहे. खप वाढल्यामुळे एक्साइज ड्युटीत कपात केली तरी राज्याच्या महसुलात वाढ होईल, असा विश्वास महाराष्ट्र शासनाने व्यक्त केला. विदेशी दारूवर ३०० टक्के एक्साइज लागू करुन महाराष्ट्र शासन वर्षभरात १०० कोटींची कमाई करत होते. आता कर कपात करुनही राज्य अडीचशे कोटींची कमाई करेल, अ...

अभावीत पदोन्नत्या प्रकरण : नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार उघड

इमेज
  शिक्षण विभागाने सात वर्षांपासून आदेशात बदलच केला नाही   जिल्ह्यात शेकडो केंद्रप्रमुखांची पदे रिक्त... पदवीधर शिक्षकांची जिल्ह्यात शेकडो पदे रिक्त... गणित-विज्ञानाची 400 पेक्षा जास्त पदे रिक्त... नांदेड,दि 19 नोव्हेंबर 2021 :  तात्पुरत्या 11 महिन्यासाठी पदोन्नती दिलेल्या विस्तार अधिकार्यांना थेट गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार..जिल्ह्यात सेवाजेष्टता डावलून गेली 5 ते 7 वर्षं झाले पात्रता नसलेले कर्मचारी हे विस्तार अधिकारी व आता थेट गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळत आहेत..सदर बाबी ह्या जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियमाशी विसंगत आहे पण नांदेड जिल्ह्यात कोणताही गैरप्रकार झाला तरि अद्याप कोणताही फरक पडत नाही. गैरकारभाराला पाठिंबा देणारे पदाधिकारी व अधिकारी असंख्य आहेत..   17 जुलै 2015 व 7 ऑगस्ट 2015 रोजी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या स्वाक्षरिने हे आदेश देण्यात आले होते. पुढे 11 महिन्यानंतर नव्याने आदेश काढणे किंवा पदोन्नती दिलेल्यांना मूळ पदावर आणणे अपेक्षित होते. त्याचवेळी हा विषय पदोन्नती समितीपुढेही जाणे गरजेचे होते..सदर पदावर कार्यरत असणार्या कर्म...

(Gram Panchayat By Election) : राज्यातील 34 जिल्ह्यातील 4554 ग्रामंपचांतीमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7130 जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

इमेज
  मुंबई 18 नोव्हेंबर 2021 : राज्यातील 34 जिल्ह्यातील 4554 ग्रामंपचांतीमध्ये पोटनिवडणुकीचा (Gram Panchayat By Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या ग्रामपंचायतीच्या एकूण 7130 रिक्त जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांसी पत्रव्यवहार केला आहे. इच्छूकांना 30 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.  राज्यातील ग्रामपंचायतीत विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7130 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुका पारंपरिक पद्धतीने पार पाडल्या जाव्यात, असे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकाच्या मागास प्रवर्गाच्या रिक्त जागा भरण्यापुर्वी त्या ग्रामपंचायतीचे एकूण आरक्षण 50 टक्क्याच्या मर्यादेत ठेवणे. नागरिकाच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण 27 टक्यापर्यत ठेवणे. आरक्षण मर्यादेची अंमलबजावणी करताना ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्य संख्येची गणणा विचारात घ्यावी, आदी सुचनाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, निवडणूक क...

नांदेड प्राथमिक शिक्षण विभागाचं मोठं दुर्दैव ! २०१७ मध्ये ४ लाख लाच घेताना एसीबीने मुसक्या आवळलेल्या महालाचखोर नांदेड जि.प. ची तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी सविता बिरगे पुन्हा पुर्व पदावर रुजू😡

इमेज
मार्च २०१७ मध्ये एक महिना आधी लाचखोर समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकरवर एसीबीने ट्रॅप केला होता. नांदेड, 18 नोव्हेंबर 2021 :- दोन शिक्षीकांचे थकीत वेतन काढण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रभारी शिक्षणाधिकारी सविता सिदगोंडा बिरगे यांना ४ लाख रुपयाची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या पथकाने ७ एप्रिल २०१७ रोजी रंगेहात पकडले होते त्या अगोदर काही दिवसापूर्वीच म्हणजे १० मार्च २०१७ ला लाचखोर समाज कल्याण अधिकारी खमितकर याला अटक झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच हा दुसरा एक लाचखोर अधिकारी या सापळ्यात अडकल्याने नांदेड जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली होती. नांदेड जि.प.शिक्षण विभागांतर्गत सेवा कार्यरत असलेल्या दोन शिक्षीकांची सेवा सन २००६ ते २००८ या कार्यकाळात काही कारणाने खंडीत होती.म्हणून या कार्यकाळातील वेतन व भत्ता अनुक्रमे ६,२२,०००/- व ६,४९,०००/- असे एकूण १२,७१,०००/-रुपये येणे शिल्लक होते. ते अदा करण्यासाठी या दोन महिला शिक्षीकांनी जि.प.माध्यमिक शिक्षण विभाग नांदेड यांच्याकडे रितसर मागणी अर्ज केला होता. हे थकीत वेतन व भत्त्यापोटीची दोघींची एकूण रक्कम काढण्यासाठी नांदेड जि.प.श...

Restoration of unreserved trains the details mentioned in below letter, this for passenger information

इमेज
प्रवाशांच्या्या माहितीसाठी खाली दिलेल्या पत्रात नमूद केलेल्या अनारक्षित गाड्यांची पुनर्स्थापना Restoration of unreserved trains the details mentioned in below letter, this for passenger information pic.twitter.com/4M9QJcL6mv — DRM Nanded (@drmned) November 15, 2021

पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्फत नांदेडमधील सर्व जनतेस आवाहन

इमेज
  खाली दिलेल्या twitter लिंकवर लॉंग प्रेस करा म्हणजेच लिंंकवर थोडावेळ बोट धरून ठेवा.पुर्ण लिंक सिलेक्ट होईल त्यानंतर वरती ट्विटरचे चिन्ह ,चिन्हाच्या बाजूला ओपन,त्याच्या बाजूला कॉपी ,त्याच्या बाजूला शेअर अशा प्रकारची पट्टी दिसेल. ओपन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नांदेड पोलीसच्या ट्विटर अकाऊंटवर घेऊन जाईल.त्यासाठी आपल्याकडे twitter App डाऊनलोड असणे आवश्यक आहे तरच लिंक ओपन होऊन ट्विटरवर घेऊन जाईल,तुमच्याकडे Twitter App नसेल तर लिंक ओपन होणार नाही.त्यासाठी प्ले स्टोअर वर अगोदर Twitter App डाऊनलोड करा. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्फत नांदेडमधील सर्व जनतेस आवाहन .(व्हिडिओ) खालील लिंकवर लॉंग प्रेस करून नंतर ओपन वर क्लिक करा.नंतर तुम्हाला डायरेक्ट नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या twitter account वर घेऊन जाईल.तेथे हा ओरिजनल व्हिडिओ ट्विट पहायला मिळेल.👇 https://twitter.com/NandedPolice/status/1459923405847896076?t=7zVgw2yUgDBXVLQVI1DjLw&s=19 किंवा खाली दिसत असलेल्या नांदेड पोलीसच्या नावावर क्लिक करा. नंतर तुम्हाला डायरेक्ट नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच...

Modi Government | CBI आणि ED च्या संचालकांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवला ! मोदी सरकारनं आणला अध्यादेश

इमेज
  नवी दिल्ली : Modi Government | केंद्रीय अन्वेषण विभाग Central Bureau of Investigation (CBI) आणि सक्तवसुली संचालनालयाच्या Enforcement Directorate (ED) संचालकांचा कार्यकाळ आता 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. मोदी सरकारनं (Modi Government) याबाबत अध्यादेश (Ordinance) जारी केला आहे. सध्या केंद्रीय एजन्सीच्या (central agency) प्रमुखांचा कार्यकाळ हा 2 वर्षासाठी आहे. आतापर्यंत दोन्ही केंद्रीय एजन्सीच्या प्रमुखांचा कार्यकाळ हा 2 वर्षासाठी कायम करण्यात आला होता. काही अपवाद सोडता कार्यकाळ संपेपर्यंत केंद्रीय एजन्सीच्या प्रमुखांना हटवलं जाऊ शकत नाही. मोदी सरकार (Modi Government) एक वर्षासाठी त्यांना मुदतवाढ देखील देऊ शकतं. गतवर्षी केंद्र सरकारनं ED चे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ एक वर्षांनी वाढवला होता. मिश्रा यांचा 1 वर्षाचा कार्यकाळ नोव्हेंबर 2020 मध्ये संपला. सन 1997 पुर्वी सीबीआयच्या संचालकाचा (CBI Director) कार्यकाळ ठरलेला नव्हता आणि कोणत्याही प्रकारे केंद्र सरकार (Modi Government) त्यांना पदावरून हटवू शकत होती. सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) विनीत नरैन प्रकरणी (Vinee...

शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे नोंदविली जाणार_सहसचिव राजेंद्र पवार

इमेज
  मुंबई : सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजीटल पद्धतीने नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. MahaStudent ॲपद्वारे ही माहिती नोंदवावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती तात्काळ कळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.   राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षकांची आणि डिजीटल शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे. भारत सरकारने ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ हा निर्देशांक विकसित केला असून यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांची डिजीटल पद्धतीने उपस्थिती यासाठी गुण देण्यात येणार आहेत. यादृष्टीने राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणालीमध्ये ही उपस्थिती नोंदविण्यास मान्यता देण्यात आली आहे.   हे ॲप हे गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून यामध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थि...

न्युमोनिया नियंत्रणासाठी ‘साँस’ अभियानाचे आयोजन ; अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या हस्ते उद्घाटन

इमेज
  मुंबई, दि. १२ : न्युमोनियापासून संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार यासाठी ‘जागतिक न्युमोनिया दिनाचे’ औचित्य साधून ‘साँस’ मोहिमेचे राज्यस्तरीय उद्घाटन सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. डॉ. प्रदीप व्यास यांनी महाराष्ट्रात अर्भक मृत्यूदर १९ वरून १७ वर आल्याबद्दल आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांचे अभिनंदन केले. ‘साँस’ मोहीम राबविण्याकरिता ‘न्युमोनिया नाही तर बालपण सही’ या घोषवाक्यासह शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ .अर्चना पाटील यांनी ‘साँस’ कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रम तसेच राज्य व जिल्हास्तरावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. डॉ. मृदुला फडके यांनी बालकांमधील न्युमोनियाचा आजार कसा होतो, न्युमोनियापासून संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार यावरील माहिती सांगितली. तसेच गंभीर न्युमोनिया असतानाच्या स्थितीत आशा, ए.एन.एम , सी.एच.ओ यांनी कुठल्या प्रकारची विशेष काळजी घेतली पाहिज...

सर्पदंश आणि त्यावरील उपचारांबाबत जागृती करणे गरजेचे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

इमेज
  मुंबई, दि. ११ :-  ग्रामीण भागात सर्पदंश ही आजही एक मोठी समस्या आहे. सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सजग झाले पाहिजे. त्याचबरोबर सर्पदंशाबाबत व त्यावरील उपचारांबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. विघ्नहर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आयोजित शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या मिशन इम्पॉसिबल माहितीपटाचे अनावरण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार अतुल बेनके, अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, प्रधान सचिव डॉ.निलीमा करकेट्टा, आयसीएमआरच्या संचालिका डॉ.गीतांजली सचदेव, आयएमएचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे आदी उपस्थित होते. गृहमंत्री श्री.दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ग्रामीण भागात सर्पदंश ही एक मोठी समस्या आहे. सर्पदंशाबाबत काही गैरसमजुती आहेत. या दूर करण्यासाठी शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्प उपयुक्त ठरेल. सर्पदंशावरील लशी महाग आहेत. सर्पदंशाबाबत जनजागृतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची आवश्यकता आहे...

शिक्षकाकडून पदस्थापनेसाठी लाच घेणारा हा कसला कनिष्ठ प्रशासन अधिकारी ? हा तर अपचारी ! याला लाचखोर म्हणावे ; तीन दिवसांत जि.प चे दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

इमेज
  सोलापूर झेडपीमध्ये शिक्षकाकडून पंधरा हजाराची लाच मागणाऱ्या लाचखोराला अटक सोलापूर : मुख्याध्यापकाकडे पद स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. सुहास अण्णाराव चेळेकर असे अटक करण्यात आलेल्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कारवाई झाली. यातील तक्रारदार यांनी राज्यसरकारच्या पती-पत्नी एकत्रीकरण योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करणेकरीता यातील आरोपी चेळेकर यांनी २५ हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूरकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी जवळच्या रिक्त शाळेत मुख्याध्यापकपदी बदलीकरीता अर्ज दिला होता.सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता यातील आरोपी करून, तडजोडी अंती १५,००० रु. लाच मागणी केली आहे. याची शहानिशा झाल्यानंतर बुधवारी अँटी करप्शन विभागाच्या पथकाने या प्रकरणात आरोपी लोकसेवक सुहास चेळेकर यांना अटक केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये केवळ तीन दिवसात ही अँटी करप्शनची दुसरी का...

लाच प्रकरण : महा लाचखोर पोलीस उपनिरीक्षक मारोती नंदे मागत होता लाचेचा मेवा ! एसीबी पथकाने खाऊ घातली जेलची हवा ; लाचखोरने केले मुखेड तालुक्याचे नाव बदनाम

इमेज
  Respected sir/madam  ➡युनिट      :- हिंगोली ➡तक्रारदार :- पुरुष वय 29 वर्ष  ➡आरोपी  लोकसेवक  - मारोती खुशालराव नंदे, वय 35 वर्ष, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. गोरेगाव रा. चोंढी ता मुखेड जि नांदेड ➡ लाचमागणी पडताळणी दिनांक :- 02/11/2021 ,  ➡ गुन्हा दाखल दिनांक :- 11/11/2021 ➡ लाचेची रक्कम:-   मागणी 10,000/- रु. ➡ कारण:- यातील तक्रारदार यांना दिवाळी निमित्त एक महिना कल्ब चालू देण्यासाठी व त्यावर कार्यवाही न कारण्यासाठी यातील लोकसेवक यांनी 10,000/- मागणी करून पडताळणी दरम्यान तक्रारदारकडून 3000/- रू. स्वीकारले व उर्वरित 7,000/- रू लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली म्हणून गुन्हा  ➡  मार्गदर्शक:- मा.श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड. ➡  कार्यवाही पथक-श्री . निलेश सुरडकर, पोलिस उपअधीक्षक, ,HC विजय उपरे, NPC रुद्रा कबाडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, तान्हाजी मुंढे, अविनाश किर्तनकार हिमतराव सरनाईक सर्व ACB हिंगोली

नगराध्यक्षा सह पत्नीच्या नावावरील ज्ञात,कायदेशीर उत्पन्नापेक्षा विसंगत अपसंपदेवर एसीबीची टाच(८१२.८९%) ! पती, पत्नी दोघांवर गुन्हा दाखल

इमेज
  *लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा* *अपसंपदा अहवाल* ▶️ *युनिट -* बुलडाणा ▶️ *फिर्यादी-* श्री संजय चौधरी, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा. ▶️ *आरोपी-*  १) श्री. कासम पिरु गवळी ,  वय- ५८ वर्षे ,   पद- नगराध्यक्ष, नगरपरिषद- मेहकर जिल्हा- बुलढाणा. २) सौ हसीनाबी कासम गवळी , वय- ३८ वर्षे, दोघे रा. - गवळीपुरा, मेहकर. ता-् मेहकर, जि. बुलढाणा.                                                                              ▶️ *अपसंपदा रक्कम*-  रु ५,०९,८८,४९५ /- (८१२.८९%) अक्षरी पाच कोटी नऊ लाख अठ्ठयांशी हजार चारशे पंच्यान्नव रुपये. ▶️ *परिक्षण कालावधी*- दि. २१/१२/२००६ ते २२/०९/२०२०. ▶️ *थोडक्यात हकिगत -*.   यातील लोकसेवक श्री कासम पिरु गवळी, नगराध्यक्ष, मेहकर यांनी नमूद परीक्षण कालावधीदरम्यान नगरपरिषद,मेहकर येथे लोकसेवक पदावर कार्यरत असताना, ...