लाच प्रकरण : महा लाचखोर उपायुक्ताला (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग) 25,000 हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या



उद्योजकता विभागीय मुख्यालयाचा उपायुक्त सुनील काळबांडे जेरबंद २५ हजारांची लाच स्वीकारली: एसीबीने आवळल्या मुसक्या.

चंद्रपूर : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय मुख्यालयाचा उपायुक्त सुनील रामभाऊ काळबांडे (वय ५५) याला २५ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या. विशेष म्हणजे, त्याने चंद्रपूरच्या बालाजी वॉर्डात राहणाऱ्या आणि याच विभागात कार्यरत असलेल्या लिपिकाला लाचेसाठी वेठीस धरले होते.

 संबंधित लिपिकाने कनिष्ठ अधिकारी म्हणून पदोन्नती व पदस्थापना मिळण्यासाठी चंद्रपूर कार्यालयातील वरिष्ठांमार्फत फेब्रुवारी २०२१ मध्ये कागदोपत्री अहवाल पाठवला होता. १६ मार्चला आरोपी सुनील काळबांडेने लिपिकाला फोन केला. हा अहवाल मुंबई कार्यालयात पाठवून तेथील अधिकाऱ्यांशी आपण बोलणी केल्याचे सांगून हे काम करून देण्यासाठी २५ हजारांची लाच मागितली. आपल्या हक्काची पदोन्नती आणि पदस्थापना मागत असल्यामुळे लाच द्यायची नाही, असे ठरवून लिपिकाने कायदेशीर मार्ग अवलंबला; मात्र काळबांडेने लाच मिळावी म्हणून खोडा घातल्याने त्यांनी सरळ एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्याकडे तक्रार नोंदवली. उपअधीक्षक योगिता चाफले यांच्याकडून तक्रारीची शहानिशा करून घेतल्यानंतर सापळा लावण्यात आला. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी लाचेची रक्कम घेऊन लिपिक नागपुरातील काळबांडेच्या कार्यालयात गेले. तेथे त्याच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझगाव येथील राज्यकर आयुक्त कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर; माहिती अधिकारात धक्कादायक बाबी उघड!

मरवाळी: शासकीय रस्त्यावरील अतिक्रमणांचा विळखा दूर करण्यास ग्रामपंचायत, बांधकाम विभाग अपयशी

‘आपले सरकार’पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस