नांदेड जिल्ह्यात 53 व्यक्ती कोरोना बाधित, एकाचा मृत्यू तर 92 कोरोना बाधित झाले बरे



नांदेड,दि.16 जून 2021 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 684 अहवालापैकी  53 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 14 तर अँटिजेन तपासणीद्वारे 39 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 993 एवढी झाली असून यातील 88 हजार 173 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 362 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

16 जून रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे अर्धापूर तालुक्यातील दिग्रस येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 900 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 9, नांदेड ग्रामीण 6, भोकर 1, कंधार 14, लोहा 1, मुदखेड 2, उमरी 1, किनवट 2, यवतमाळ 2, बीड 1 असे एकूण 53 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 92 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 3,  मुखेड कोविड रुग्णालय 1,  बिलोली तालुक्यातर्गंत 1, हिमायतनगर तालुक्यातर्गत 3किनवट कोविड रुग्णालय 4, कंधार तालुक्यातर्गत 1, अर्धापूर तालुक्यातर्गंत 2,  मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 68, हदगाव कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 2 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 362 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  23हदगाव कोविड रुग्णालय 1किनवट कोविड रुग्णालय 6देगलूर कोविड रुग्णालय 3,   मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 2,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 252, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 57, खाजगी रुग्णालय 10  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 126, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 131 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 82 हजार 880

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 80 हजार 403

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 993

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 173

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 900

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.90 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-164

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 362

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझगाव येथील राज्यकर आयुक्त कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर; माहिती अधिकारात धक्कादायक बाबी उघड!

मरवाळी: शासकीय रस्त्यावरील अतिक्रमणांचा विळखा दूर करण्यास ग्रामपंचायत, बांधकाम विभाग अपयशी

‘आपले सरकार’पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस