बुधवार, एप्रिल ०७, २०२१

नांदेड जिल्हा बँक निवडणूकीत भाजपाशी गद्दारी करणा-या आ.रातोळीकरचा पक्षश्रेष्ठीने राजीनामा घ्यावा आणि त्या जागी सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांला संधी द्यावी अन्यथा आम्ही सर्व कार्यकर्ते राजीनामे देणार-गजानन पा.चव्हाण

 नायगाव,दि 7 एप्रिल : गद्दार आ. राम पाटील रातोळीकर यांना पक्षश्रेष्ठींनी जाब विचारावा व राजीनामा घ्यावा आणि भारतीय जनता पार्टीच्या सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांला विधानपरिषदेवर संधी द्यावी अन्यथा माझ्यासह सर्वच कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देणार अशी मागणी गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांनी भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांना व महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या मेल द्वारे केली आहे.

 नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या काही मंडळींनी काँग्रेसशी हातमिळवणी केल्यामुळे नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला . गेल्या अनेक वर्षापासून भाजपात राहून भाजपाशी गद्दारी करणारे आमदार राम पाटील रातोळीकर यांनी याही निवडणुकीत पक्षाशी बेईमानी केली आहे. भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष पदापासून ते थेट आमदार पदापर्यंत रातोळीकर यांना पदे दिली असतानाही रातोळीकर मात्र पक्षाशी कधीही इमानदारीने वागले नसल्याचे अनेक वेळा दिसून आले. जेव्हा विधानसभा निवडणूक लढण्याची वेळ आली होती त्यावेळी राम पाटील रातोळीकर यांनी काँग्रेसचे पैसे घेऊन विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून ऐन वेळेला पळ काढला होता. पळपुट्या रातोळीकर यांच्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपची नाचक्की होऊ नये यासाठी लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी निवडणुकीचा किल्ला लढवला,भलेही ठक्करवाड यांना निवडणूक जिंकता आली नसली तरी जनमानसात भाजपची प्रतिमा त्यांनी मलिन होऊ दिली नव्हती.

त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राम पाटील रातोळीकर यांनी काँग्रेसला मदत केली होती.राम पाटील रातोळीकर यांच्यामध्ये काँग्रेस लपली आहे .नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी स्वाभिमानाने उभी राहू नये यासाठी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी वेळोवेळी काँग्रेसशी हातमिळवणी केली. प्रचंड पैसा कमावला. परिणामी नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला रातोळीकर यांनी स्वतंत्र चेहरा मिळवू दिला नाही. नुकत्याच झालेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार राम पाटील रातोळीकर यांनी काँग्रेसचे पैसे घेऊन भाजपाच्या उमेदवारांना निवडून देऊ नका असा भ्रमणध्वनीवर साधलेला संवाद सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या विषयांमध्ये तालुक्यातील इतर जबाबदार काही नेते पण आहेत ते योग्य वेळी पुरावा सापडल्या नंतर आपल्यापुुढे ठेेेवूू. आमदार राम पाटील रातोळीकर गावच्या ग्रामपंचायती चा सरपंच म्हणून निवडून येण्याची ऐपत नसलेल्या रातोळीकर यांना भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेचे सदस्यत्व दिले आहे.पण नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी वाढली पाहिजे या अनुषंगाने रातोळीकर यांना देण्यात आलेली आमदारकी पक्षाच्या पायावर कुऱ्हाड मारणारी ठरत असल्याची चर्चा आहे.



एकीकडे भाजपाचा लोगो तर दुसरीकडे काँग्रेसला सरळ-सरळ मदत करणाऱ्या रातोळीकर यांची भाजपातून हकालपट्टी करावी अथवा आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्त्यांचा राजीनामा घ्यावा व भाारती जनता पक्षाच्यया सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याला विधान परिषदेवर घेऊन न्याय द्यावा अशी मागणी गजानन शंकराव पाटील चव्हाण सह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे. जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार राम पाटील रातोळीकर यांच्याबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा साहेब,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे बोलवून राजीनामा घ्यावा तसेच आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या बेईमानीचा पर्दाफाश करत त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी.अशी मागणी गजानन शंकरराव पाटील चव्हाण, भाऊराव पाटील चव्हाण, गंगाधर बापूराव कल्याण, संजय तेजराव चव्हाण, राजेश सोनकांबळे, धनंजय पाटील चव्हाण, अतुल मंगरूळे, गणेश पाटील देगावे यांच्यासह नायगाव मतदार संघातील भारतीय जनता पार्टी चे सर्व कार्यकर्ते आवाज उठवित आहेेत.लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पक्ष श्रेष्ठी काय निर्णय घेते याकडे लक्ष लावून आहेत.


https://www.bjp.org/

BJP State Websites


४ टिप्पण्या:

  1. खरोखरच पहिल्यापासून गद्दारी त्याच्या रक्तात आहे पक्षाने तात्काळ पक्षातून बडतर्फ करावे अश्या लोकांमुळे पक्ष वाढत नाही

    उत्तर द्याहटवा
  2. खरोखरच पहिल्यापासून गद्दारी त्याच्या रक्तात आहे पक्षाने तात्काळ पक्षातून बडतर्फ करावे अश्या लोकांमुळे पक्ष वाढत नाही

    उत्तर द्याहटवा
  3. Karvaichi magni yogya pan sarvaani rajinaame denyachi bhasha chukichi paksh adchanit aalelq Astana ase vethis dharnyachi bhasha yogya naahi

    उत्तर द्याहटवा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता